Current affairs | Evening News Marathi
Current affairs 4 February 2019 Marathi | 4 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी
इराणच्या बेहरूज बुचानीला ऑस्ट्रेलियाचा सर्वात मौल्यवान साहित्य पुरस्कार मिळाला
इराणच्या बेहरूज बुचानी या पत्रकाराला "नो फ्रेंड बट द माउंटन्स: राईटिंग फ्रॉम मॅनस प्रिझन" या पुस्तकासाठी ऑस्ट्रेलियाच्या सरकारकडून 100,000 ऑस्ट्रेलियाई डॉलर्स (US$ 72,600) इतक्या सर्वाधिक रकमेचा ‘विक्टोरियन प्राइज फॉर लिटरेचर’ हा पुरस्कार देण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या निर्वासित कायद्याच्या अंतर्गत 2013 साली पापुआ न्यू गिनीमध्ये अटक करण्यात आलेल्या बेहरूज बुचानीने व्हाट्सएप ही ऑनलाइन संदेश सेवा वापरुन ते पुस्तक लिहिले आहे.
ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रकुल दक्षिण गोलार्धाच्या खंडाच्या अंतर्गत असलेला एक देश आहे, जो जगातला सर्वात छोटा खंड आहे आणि जगातला सर्वात मोठा बेट देखील आहे, जो हिंद व प्रशांत महासागरात पसरलेला आहे. ऑस्ट्रेलिया हा एकमेव असा प्रदेश आहे, जो एक खंड, एक राष्ट्र आणि एक बेट आहे. कॅनबेरा हे देशाचे राजधानी शहर आहे आणि ऑस्ट्रेलियाई डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.
Current affairs 4 February 2019 Marathi | 4 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी
“जीसॅट-31”: ISROचा 40वा दळणवळण उपग्रह
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) कडून तयार करण्यात आलेला 40वा दळणवळण उपग्रह - ‘जीसॅट-31’ (GSAT-31) - दि. 6 फेब्रुवारी 2019 रोजी फ्रेंच गियानाच्या उड्डाण केंद्रावरून अवकाशात पाठवला जाणार आहे.
हा 2,535 किलोग्राम वजनी उपग्रह ‘एरियन-5’ या प्रक्षेपकाद्वारे अवकाशात पाठवला जाणार आहे. या मोहिमेचा कार्यकालावधी 15 वर्षांचा असणार आहे.
हा उपग्रह सध्या कार्यरत असलेल्या सेवांना निरंतरता प्रदान करेल आणि पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत Ku-बँड ट्रान्सपोंडर क्षमता वाढवेल. उपग्रह भारतीय भूभागात आणि बेट प्रदेशाला सेवा पुरविण्यास सक्षम आहे. तसेच त्याचा वापर VSAT नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंक, डिजिटल सॅटलाइट न्यूज गॅदरींग, DTH सेवा, सेल्युलर बॅक-हल कनेक्टिव्हिटी आणि अशा अनेक अनुप्रयोगांमध्ये केला जाईल.
ISRO चा प्रवास
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे. याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे, दिनांक 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापना करण्यात आलेल्या ISRO ने 1962 साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) संस्थेला बदलले.
ISRO ने 1999 सालापासून व्यावसायिक शाखेच्या मदतीने विदेशी उपग्रह अवकाशात सोडण्याचा कार्यक्रम सुरू केला. ISRO ने साधलेल्या प्रशंसनीय यशाचा आढावा पुढीलप्रमाणे आहे -
- 19 एप्रिल 1975 रोजी भारताने सोवियत संघाच्या मदतीने आपला पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला.
- 1980 साली पुर्णपणे स्वदेशी बनावटीच्या SLV-3 प्रक्षेपकाद्वारे ‘रोहिणी’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला.
- 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली. या मोहिमेमधून चंद्राच्या ध्रुव क्षेत्रात पाणी असण्याची पुष्टी केली.
- ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात आणि अगदी कमी खर्चात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.
- फेब्रुवारी 2017 मध्ये एकाचवेळी 7 देशांचे 104 उपग्रह अवकाशात सोडत रशियाचा 37 उपग्रहांचा विक्रम मोडीत काढला.
- ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (PSLV) आणि भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान (GSLV) विकसित केले.
- सॅटलाइट सुचालन प्रणाली ‘गगन’ आणि क्षेत्रीय सुचालन उपग्रह प्रणाली ‘IRNSS’ विकसित केले.
- यानाला पुढे नेणारे अत्यावश्यक असलेले स्वदेशी ‘क्रायोजेनिक इंजन’ तयार केले.
GSAT (geosynchronous satellite/जीसॅट) हे उपग्रह भारताच्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) कडून विकसित करण्यात आलेला उपग्रह आहे. हा मुख्यतः चलचित्रांचे प्रक्षेपण, माहितीचे दळणवळण याकरिता उपयोगात आणला जातो. GSAT पृथ्वीच्या 3500 किलोमीटर अंतरावर असलेल्या भूस्थिर कक्षेत पाठवले जाते.
भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक (Geostationary satellite launch vehicle -GSLV) - GSLV हे प्रामुख्याने पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत (साधारणतः 3500 किलोमीटर) उपग्रहाच्या INSAT वर्गातील उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याकरिता विकसित केले गेले. GSLV हे उपग्रहाच्या GSAT मालिकेच्या प्रक्षेपणासाठी वापरले जात आहे. GSLV मध्ये तीन टप्पे आहेत - घन इंधन वापरणारे रॉकेट मोटर स्टेज, अर्थ स्टोअरेबल लिकुइड स्टेज आणि क्रायोजेणीक स्टेज. या वाहनाची 49.13 मीटर उंची आहे. GSLV चे प्रथम उड्डाण 18 एप्रिल 2001 रोजी केले गेले होते.
2017 साली तयार करण्यात आलेला ‘जियोसिंक्रोनस सॅटलाइट लॉंच व्हेइकल मार्क-III’ (GSLV Mk-III) हा भारताने आतापर्यंत बनविलेले सर्वात भारी अग्निबाण आहे आणि हे सर्वाधिक वजनी उपग्रह प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे. याला ‘फॅट बॉय’ असे टोपणनाव दिले आहे. भारताने आतापर्यंत बनविलेले हे जवळपास 640 टन वजनी सर्वात भारी अग्निबाण आहे आणि हे सर्वाधिक वजनी उपग्रह प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे. हा अग्निबाण पृथ्वीच्या वातावरणाच्या खालच्या परिभ्रमन कक्षेत 8 टन वजनापर्यंतचे अंतराळ केंद्र पोहोचवण्यास सक्षम आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 4 February 2019 Marathi | 4 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठीमॅकेडोनिया NATOचा 30वा सदस्य बनणार
उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) याच्या 29 सदस्य देशांनी नुकतेच नाव बदललेल्या मॅकेडोनिया या देशाला समुहाचा 30वा सदस्य म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. या 6 फेब्रुवारीला याबाबत औपचारिकपणे घोषणा केली जाणार आहे.
उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO)
उत्तर अटलांटिक करार संघटना (North Atlantic Treaty Organization -NATO) हे दि. 4 एप्रिल 1949 रोजी उत्तर अटलांटिक कराराच्या आधारावर उत्तर अमेरिकेतल्या व युरोपीय राज्यांनी तयार केलेली आंतर-सरकारी सैन्य युती आहे. NATO चे मुख्यालय ब्रुसेल्स (बेल्जियम) मध्ये आहे. आता 30 देश या गटाचे सदस्य आहेत.
मॅकेडोनिया
मॅकेडोनिया हा दक्षिण यूरोप खंडातील मध्य बाल्कन बेटावर असलेला एक देश आहे. हा भू-परिवेष्टित देश आहे आणि याला कोसोवो, सर्बिया, बल्गेरिया, ग्रीस आणि अल्बानिया या देशांच्या सीमा लागलेल्या आहेत. स्कोप्जे हे या देशाचे राजधानी शहर आहे.
1990च्या दशकात युगोस्लाविया 7 देशांमध्ये विखुरले गेले, ते म्हणजे - बोस्निया आणि हर्जेगोविना, क्रोएशिया, मॅकेडोनिया, मॉन्टेनेग्रो, सर्बिया, स्लोव्हेनिया.
पूर्वीच्या युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाच्या नावावरून 27 वर्षांपासून चालू असलेला वाद सोडविण्यासाठी ग्रीस आणि मॅकेडोनिया यांनी जानेवारी 2019 मध्ये अखेर त्यांच्यामधील ऐतिहासिक ‘प्रेस्पा’ करारास सहमती दिली. नव्या कराराच्या अंतर्गत, मॅकेडोनिया या देशाला अधिकृतपणे “उत्तर मॅकेडोनिया प्रजासत्ताक” (Republic of Northern Macedonia) म्हणून ओळखले जाणार. सध्या संयुक्त राष्ट्रसंघात हा देश ‘मॅकेडोनियाचा माजी युगोस्लाव्ह प्रजासत्ताक’ म्हणून औपचारिकपणे ज्ञात आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 4 February 2019 Marathi | 4 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठीउपकर्णधार स्मृती मंधाना: ICC ODI मधील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू
भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिला यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) याचे मानाचे 'सर्वोत्तम क्रिकेटपटू' आणि 'एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) यातली सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू' असे दोन पुरस्कार लाभले आहेत.
12 ODIमध्ये 669 धावा, तर 25 आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 622 धावांची कामगिरी करणार्या सलामीवीर स्मृतीला 'वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू'चा मान म्हणून ‘रिचेल हेहोइ फ्लिंट’ पुरस्काराने गौरवले जाणार आहे. ICCचा मानाचा पुरस्कार पटकावणारी स्मृती ही भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. याआधी तेज गोलंदाज झुलन गोस्वामीने हा पुरस्कार जिंकला आहे.
स्मृती मंधाना ICCच्या ODI क्रमवारीमध्ये चौथ्या, तर टी-20 क्रमवारीमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक अलायसा हीलीने महिला टी-20 विश्वचषकमधील सहा लढतींमध्ये 225 धावा काढल्या. ती ICCच्या 'सर्वोत्तम महिला टी-20 खेळाडू' या पुरस्काराची मानकरी ठरली. इंग्लंडची सोफी एक्लेस्टन सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटपटू ठरली आहे. मोसमातील नऊ एकदिवसीयमध्ये 18, तर 14 टी-20मध्ये 17 बळी घेत सोफी एक्लेस्टनने हा पुरस्कार जिंकला आहे.
ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक अलायसा हीलीने महिला टी-20 विश्वचषकमधील सहा लढतींमध्ये 225 धावा काढल्या. ती ICCच्या 'सर्वोत्तम महिला टी-20 खेळाडू' या पुरस्काराची मानकरी ठरली. इंग्लंडची सोफी एक्लेस्टन सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटपटू ठरली आहे. मोसमातील नऊ एकदिवसीयमध्ये 18, तर 14 टी-20मध्ये 17 बळी घेत सोफी एक्लेस्टनने हा पुरस्कार जिंकला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)
हे क्रिकेट खेळासाठीचे आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन मंडळ आहे. सन 1990 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या प्रतिनिधींनी ICC ची ‘इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स’ या नावाने स्थापना केली होती आणि सन 1989 मध्ये याला वर्तमान नाव प्राप्त झाले. ICC चे मुख्यालय संयुक्त अरब अमिरात (UAE) देशाच्या दुबई शहरात आहे. ICCचे 105 सदस्य संघ आहेत आणि त्यात 12 पूर्ण सदस्य आहेत, जे कसोटी सामने खेळतात.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 4 February 2019 Marathi | 4 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठीन्यूझीलँडमध्ये भारताने प्रथमच ODI मालिका जिंकली
भारताने वेलिंग्टन (न्यूझीलँड) येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या व शेवटच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामन्यात यजमान देशाचा पराभव करून 4-1 अशा फरकाने विजय मिळविला आहे.
अंतिम सामन्यात 90 धावांची खेळी करणार्या अंबाती रायुडू या भारतीय फलंदाजाला सामनावीराचा तर भारताच्या मोहम्मद शमी ह्याला मालिकावीराचा किताब मिळाला.
न्यूझीलँडच्या भूमीवर मिळवलेला हा आजवरचा सर्वात मोठा मालिकाविजय आहे. अंबाती रायुडू (113 चेंडूत 90 धावा) व विजय शंकर (64 चेंडूत 45) या दोघांनी 98 धावांची भागीदारी केली आणि ही भारतीय डावातील सर्वोच्च भागीदारी ठरली.
30वा ‘राष्ट्रीय रस्ते सुरक्षा आठवडा’
भारतात 4 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या काळात 30वा ‘राष्ट्रीय रस्ते सुरक्षा आठवडा’ (National Road Safety Week) पाळला जात आहे.
याप्रसंगी, भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत उद्घाटनपर कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. तसेच शालेय विद्यार्थी, अशासकीय संस्था आणि सरकारी व उद्योगांमधील रस्ते सुरक्षेच्या संबंधित असलेले भागधारक यांच्या सहभागाने रस्ते मार्गांवर बाळगण्याविषयीची सुरक्षा याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत.
या आठवड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार. त्यामध्ये सुरक्षेसंबंधी उदयोन्मुख कल, रस्ते सुरक्षेसंबंधी अभियांत्रिकी, वाहनाचा विमा, आपातकालीन व्यवस्था, युवांची भूमिका यासंबंधी कार्यशाळा आणि परिसंवाद तसेच रस्ते सुरक्षेसंबंधी कॉर्पोरेटची भूमिका याविषयी उद्योग/कॉर्पोरेट परिषदा आयोजित करणे, अश्या उपक्रमांचा समावेश आहे.
याशिवाय एक मोटारकार रॅली देखील चालवली जाणार, ज्यामधून नियोजित प्रवास कार्यक्रमामधून भारतभर प्रवास करून पुढे बांग्लादेश आणि म्यानमार या दोन शेजारी देशांना भेट दिली जाईल. महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमीत्त आयोजित केली गेलेली ही रॅली गांधीजींच्या जीवनाशी जुळलेल्या भारतामधील ऐतिहासिक ठिकाणांना भेट देत, बांग्लादेशाच्या ढाका शहराकडे जाणार आणि 24 फेब्रुवारीला म्यानमारमधील यांगून शहरात त्याचा समारोप होईल. या प्रवासात सुमारे 7250 किलोमीटरचे अंतर कापले जाईल.
Current affairs | Evening News MarathiCurrent affairs 4 February 2019 Marathi | 4 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी
जागतिक कर्करोग दिन: 4 फेब्रुवारी
दरवर्षी 4 फेब्रुवारीला जागतिक आरोग्य संस्था (WHO) याच्या नेतृत्वात जगभरात ‘जागतिक कर्करोग दिन’ पाळला जातो.
सन 2019, सन 2020, सन 2021 या तीन वर्षांसाठी 'आय एम अॅण्ड आय वील' या संकल्पनेखाली एक जागतिक मोहीम चालवली जात आहे. याबाबत जगभरात कर्करोगाविषयी जनजागृती फैलावण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात.
जागतिक कर्करोग दिन दरवर्षी 4 फेब्रुवारीला कर्करोगाबद्दल जागरुकता वाढविण्याकरिता आणि प्रतिबंध, शोध आणि उपचारांना प्रोत्साहित करण्याकरिता आयोजित केला जातो. या दिनाची स्थापना आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना (UICC) याने सन 2008 मध्ये लिहिलेल्या ‘जागतिक कर्करोग घोषणापत्र’चे समर्थन करण्यासंदर्भात केली होती.
कर्करोगासंबंधी जागतिक दृष्य
- दरवर्षी जगभरात जवळपास 9.6 दशलक्ष लोकांचा कर्करोगाने मृत्यू होतो.
- सामान्य कर्करोगांमध्ये आढळून येणारे किमान एक तृतीयांश प्रकार प्रतिबंधित केले जाऊ शकते.
- कर्करोग हा जगभरात होणार्या मृत्यूसाठी दुसरा अग्रगण्य कारक आहे.
- 70% कर्करोगासंबंधी मृत्यू कमी-ते-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात.
- कर्करोगाचा एकूण वार्षिक आर्थिक खर्च अंदाजे USD 1.16 लक्ष कोटी (ट्रिलियन) एवढा आहे.
कर्करोगाशी लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना (UICC) ही संस्था निरंतर कार्यरत आहे. त्यांच्या सूचनेनुसार, सर्वप्रकारच्या कर्करोगामध्ये सुमारे एक तृतीयांश प्रकार आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून अधिकाधिक शारीरिक कामे करून आणि बैठे काम कमीतकमी करून रोखले जाऊ शकतात. मोठ्या संख्येने असेही दिसून आले आहे की उपचारादरम्यान किंवा त्यानंतर व्यायामामुळे चांगले परिणाम दिसून येतात.
आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना (UICC)
आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना (UICC) ही कर्करोगाविरुद्धच्या लढ्यातील सर्वात मोठी आणि जगभरात जवळपास 155 देशांमध्ये 800 हून अधिक सदस्य संस्थांची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. 1933 साली या संघटनेची स्थापना झाली आणि याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे.
ही संघटना जागतिक आरोग्य आणि विकास उद्दिष्टे यामध्ये जागतिक कर्करोगाचा भार कमी करण्यासाठी, अधिकाधीक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कर्करोग नियंत्रण एकाग्रीत करण्यासाठी कर्करोग समुदायांना एकत्र आणण्यासाठी क्षमता बांधणी करण्यासाठी आणि पुढाकारामध्ये आघाडी घेण्यासाठी समर्पित आहे. UICC आणि त्याचे बहू-क्षेत्रातील भागीदार हे जगातील सरकारांना यादृष्टीने गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत कार्यक्रम चालवण्यासाठी उत्तेजन देण्यास बांधील आहेत.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 4 February 2019 Marathi | 4 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी
No comments:
Post a Comment