Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, February 5, 2019

    Current affairs 5 February 2019 Marathi | 5 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219
    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 5 February 2019 Marathi | 5 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    प्रमुख युरोपीय देशांनी जुआन गुएदो यांना व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती म्हणून मान्यता दिली

    दिनांक 4 फेब्रुवारी 2019 रोजी अमेरिकेच्या पाठोपाठ आता आठ युरोपीय देशांनी व्हेनेझुएला देशाचे अंतरिम राष्ट्रपती म्हणून विरोधी पक्षनेता जुआन गुएदो (ऊर्फ जुआन ग्वेडो) यांना मान्यता दिली.
    हे देश म्हणजे - ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, स्वीडन, डेन्मार्क, ऑस्ट्रिया आणि जर्मनी. या देशांनी व्हेनेझुएलात नवीन निवडणूक लढवण्याकरिता दबाव टाकला आहे.
    व्हेनेझुएलाचे वर्तमान राष्ट्रपती निकोलस मदुरो यांच्यावर व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था नष्ट केल्याचा आरोप तसेच देश तानाशाही पद्धतीने चालवत आहेत असा आरोप करण्यात आला आहे.
    पार्श्वभूमी
    मे 2018 मध्ये व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीपदी निकोलस मदुरो यांची पुन्हा एकदा सहा वर्षांसाठी निवड झाली. मात्र त्यांची ही निवड अवैध आहे, असे देशाच्या संसदेने ठरविले. त्यानंतर विरोधी पक्षनेते जुआन ग्वेडो यांनी स्वत:ला देशाचे राष्ट्रपती घोषित केले. त्यामुळे देशात अस्थिरतेचे वातावरण तयार झाले आहे.
    त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधी पक्षनेते जुआन ग्वेडो यांना दक्षिण अमेरिकेच्या व्हेनेझुएला या देशाचे अंतरिम राष्ट्रपती म्हणून आपली मान्यता दिली. व्हेनेझुएलामधील माडूरो यांची सत्ता उलथवून लावण्याचा अमेरिकेच्या प्रयत्नामुळे दिनांक 23 जानेवारी 2019 रोजी व्हेनेझुएलाचे वर्तमान राष्ट्रपती निकोलस माडूरो यांनी अमेरिकेशी राजनैतिक संबंध तोडण्यात येत असल्याची घोषणा केली.
    व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागातला एक देश आहे. काराकास ही देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. या देशाची राष्ट्रीय भाषा स्पॅनिश आहे. व्हेनेझुएलन बोलिव्हर हे राष्ट्रीय चलन आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 5 February 2019 Marathi | 5 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    पृथ्वीचा चुंबकीय उत्तर ध्रुव दरवर्षी 55 किमीने सरकत आहे: WMMचे निष्कर्ष


    पृथ्वीच्या गर्भात गरम लाव्हाच्या प्रवाहामुळे चालणार्‍या क्रियांच्या परिणामी, पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर ध्रुवाची स्थिती बदललेली असून ती कॅनडापासून सरकत सायबेरियाकडे हलते आहे, असे एका अभ्यासात आढळून आले आहे.

    अमेरिकेच्या कोलोरॅडो बौल्डर विद्यापीठ आणि नॅशनल ओशोनीक अँड अॅटमोस्फीयरिक अॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) याच्या नॅशनल सेंटर फॉर एन्विरोंमेंटल इन्फॉर्मेशन येथील तज्ञांनी तसेच जागतिक भूगर्भ तज्ज्ञांनी त्याबाबत ‘वर्ल्ड मॅगनेटिक मॉडेल’मधील अद्ययावत केलेल्या माहितीत असे दिसून आले आहे की, पृथ्वीचा चुंबकीय उत्तर ध्रुव दरवर्षी 55 किलोमीटर (34 मैल) एवढ्या फरकाने आपली जागा बदलत आहे आणि गेल्या 100 वर्षांपासून हे बदल अप्रत्याशित झाले आहे. हे असे का घडत आहे याविषयी संशोधकांकडे ठोस पुरावा अजूनही नाही.
    माहितीत पुढील बदल 2020 सालापर्यंत होणार नाही, परंतु उत्तर ध्रुवाच्या अचानक हालचालीमुळे संशोधकांना ही बातमी प्रकाशात आणणे आवश्यक झाले आहे.

    पृथ्वीचे पुरस्सरण

    सूर्य आकाशगंगेत फिरत असतो, आकाशगंगा ही वैश्विक सापेक्षतेने फिरत असते आणि अशा असंख्य आकाशगंगा ह्या त्याच्यातील ताऱ्यांसकट स्थान बदलत असतात. सूर्य स्थिर नाही आणि आपण ज्याला ध्रुव तारा म्हणतो तो ही अढळ नाही, त्याचे प्रमुख कारण आहे पृथ्वीचे पुरस्सरण. थोडक्यात अक्षाची दिशा ही सतत बदलत असते. ध्रुव तारा म्हणजे पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाच्या डोक्यावर असणारा तारा होय.
    पृथ्वीचे भौगोलिक उत्तर ध्रुव आणि चुंबकीय उत्तर ध्रुव या दोन्ही वेगवेगळ्या संज्ञा आहेत. भौगोलिक उत्तर ध्रुव हा बऱ्यापैकी स्थिर असतो. सध्याचा चुंबकीय उत्तर ध्रुव भौगोलिक दक्षिण ध्रुवाजवळ आहे. केल्या गेलेल्या अभ्यासानुसार, NASAच्या गणितानुसार तो दरवर्षी साठ ते पासष्ट किलोमीटरने सरकत आहे. चुंबकीय ध्रुवाची कित्येक वेळेला अदलाबदलही झाली आहे आणि पूर्वीच्या अदलाबदली 2.5 ते 3.5 लक्ष वर्षात झालेल्या आहेत. पण शेवटची अदलाबदल मात्र 7.5 लक्ष वर्षांपूर्वी झाली आहे. त्यामुळे ध्रुव ताऱ्याला दिशा दर्शकांमध्ये महत्वाचे स्थान आहे.
    पृथ्वीच्या पुरस्सरणामुळे त्याचा उत्तर ध्रुव वेगवेगळ्या तारकांकडे रोखला जातो आणि त्या त्या वेळेला ते ते ध्रुव तारे मानले जातात. पृथ्वीच्या पुरस्सरणाच्या एका आवर्तनाला 25770 वर्षे लागतात. सध्याचा ध्रुव तारा ‘पोलारिस’ म्हणून ओळखला जातो. 5000 वर्षांपूर्वी थुबान हा कालेय नक्षत्र समूहातील तारा ध्रुव तारा म्हणून होता. गामा सेफल हा तारा 31व्या शतकात त्या स्थानावर येईल तर त्याच समूहातील आयोटा सेफल हा 52व्या शतकात त्याच्या जागेवर येईल. तर 101व्या शतकात डेनेब हा तारा ध्रुव ताऱ्याची जागा घेईल.
    स्त्रोत: maayboli

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 5 February 2019 Marathi | 5 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    राष्ट्रीय गंगा नदी विधेयक-2018

    भारत सरकारने ‘राष्ट्रीय गंगा नदी (पुनरुज्जीवन, संरक्षण व व्यवस्थापन) विधेयक-2018’ याचा मसुदा जाहीर केला आहे.

    विधेयकाची ठळक वैशिष्ट्ये
    • केंद्र सरकारचे सशस्त्र दल म्हणून नवे ‘गंगा प्रोटेक्शन कॉर्प्स’ (गंगा सुरक्षा दल) याची रचना करणे. गंगा प्रोटेक्शन कॉर्प्सला कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचा किंवा अटक करण्याचा तसेच त्या व्यक्तीस जवळच्या पोलीस ठाण्यावर नेण्याचा अधिकार दिला जाणार.
    • प्रस्तावित कायद्याच्या अंतर्गत अधिकृत असलेल्या अधिकारांद्वारे दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर न्यायालय प्रक्रिया चालविणार.
    • कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि 2500 किलोमीटरच्या नदीच्या पात्राचे संरक्षण करण्यासाठी ‘राष्ट्रीय गंगा परिषद’ आणि ‘राष्ट्रीय गंगा पुनरुज्जीवन प्राधिकरण’ अश्या संस्थांची स्थापना केली जाणार.
    • ‘गंगा नदीचे पुनरुज्जीवन, संरक्षण व व्यवस्थापन विषयक राष्ट्रीय परिषद’ (राष्ट्रीय गंगा परिषद) यांना धरण, टेकडीवरील जंगलतोड, जलविद्युत प्रकल्प आदी प्रकल्पांमुळे आणि जवळपासच्या क्षेत्रात होणार्‍या कामांचा नदीच्या प्रवाहावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्याबाबतचे अधिकार देण्यासाठी विशिष्ट तरतुदींचा समावेश आहे.
    • नदीला प्रदूषित करणार्‍यांना तसेच प्रवाहाला अडथळा आणणारे बांधकाम करणार्‍यांना आणि व्यवसायिक पद्धतीने मासेमारी करणार्‍यांना तीन वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि पाच लक्ष रुपयांचा दंड ठोठावण्यासंबंधी शिक्षेची तरतूद आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 5 February 2019 Marathi | 5 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    UAE मध्ये ‘चर्च ऑफ सेंट फ्रान्सिस’ आणि 'ग्रँड इमाम अहमद अल-तैयब मशिद’ उभारणार

    दिनांक 4 फेब्रुवारी 2019 रोजी संयुक्त अरब अमीरातच्या (UAE) अबू धाबी शहरात ‘चर्च ऑफ सेंट फ्रान्सिस’ आणि 'ग्रँड इमाम अहमद अल-तैयब मशिद’ यांचे बांधकाम करण्यासाठी कोणशीला ठेवण्यात आली आहे.
    पोप फ्रान्सिस आणि ग्रँड इमाम डॉ. अहमद अल तैयब यांच्या UAEला दिलेल्या ऐतिहासिक भेटीच्या निमित्ताने चर्च आणि मशिदीचे बांधकाम केले जात आहे.
    या भेटीदरम्यान पोप फ्रान्सिस आणि ग्रँड इमाम डॉ. अहमद अल तैयब यांना UAE सरकारकडून पहिला ‘ह्यूमन फ्रॅटरनिटी अवॉर्ड’ दिला गेला.

    संयुक्त अरब अमीरात (UAE) हा एक अरबी द्वीपकल्प देश आहे जो प्रामुख्याने पारशी (अरब) आखाती प्रदेश आहे. हा देश 7 अमिरातीचा महासंघ आहे. अबू धाबी ही या देशाची राजधानी आहे आणि संयुक्त अरब अमीराती ‘दिरहम’ हे चलन आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 5 February 2019 Marathi | 5 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    KCC अंतर्गत आर्थिक समावेशनासाठी शेतकर्‍यांना एकत्र आणण्यासाठी केंद्र सरकारची मोहीम

    दिनांक 4 फेब्रुवारी 2019 रोजी भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने किसान क्रेडिट कार्ड (KCC) अंतर्गत आर्थिक समावेशनासाठी शेतकर्‍यांना एकत्र आणण्यासाठी एक मोहीम सुरू केली आहे.
    प्रामुख्याने पशुपालक शेतकरी आणि मच्छिमारांना भांडवल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पतपुरवठा वाढविण्यासाठी KCC योजनेचा विस्तार करण्यात आला आहे.
    राज्य सरकारांच्या सहकार्याने वित्तीय संस्थांद्वारे मोहिमेची अंमलबजावणी केली जाईल. वित्तीय सेवा विभागाकडून त्यासंबंधित मार्गदर्शके जाहीर करण्यात आली आहेत.
    किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेचा उद्देश एकाच खिडकीखाली अल्पकालीन कृषी-कर्जासाठी शेतकर्‍यांना लवचिक असे आणि सुलभतेने बँकिंग व्यवस्थेकडून पुरेसे आणि वेळेवर आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे.
    देशभरात सुमारे सात कोटी सक्रिय किसान क्रेडिट कार्ड (KCC) आहेत आणि त्यामुळे कृषी पत वाढविण्यात मदत झाली आहे. याची अन्न सुरक्षा वाढविण्यास आणि शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 5 February 2019 Marathi | 5 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    मराठी अभिनेता रमेश भाटकर यांचे निधन

    मराठी रंगमंच आणि चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे मुंबईत निधन झाले. ते 70 वर्षांचे होते.
    दूरदर्शनवरील हॅलो इन्स्पेक्टर या मालिकेतून लोकप्रिय झालेले भाटकर यांनी तीसहून अधिक मालिका आणि 50 हून अधिक नाटकांमध्ये काम केले होते. त्यांचा अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांच्यासोबतचा ‘माहेरची साडी’ हा चित्रपट आजही लोकप्रिय आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 5 February 2019 Marathi | 5 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    No comments:

    Post a Comment