Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, September 8, 2017

    अशी करा स्पर्धा परीक्षेची तयारी, व्हाल यशस्वी

    Views
    अशी करा स्पर्धा परीक्षेची तयारी, व्हाल यशस्वी



    स्पर्धा परीक्षा देणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. या परीक्षेत काहींना एक-दोन प्रयत्नातच यश मिळते. तर काही शेवटच्या संधीत पास होतात. खूप अभ्यास करुनही पेपर अवघड गेल्याचे विद्यार्थ्यांकडून ऐकायला मिळते. या सगळ्याचे गुपित तुमच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीत दडले आहे. जर तुम्ही पुढील पद्धतीने अभ्यास केला तर नक्कीच स्पर्धा परीक्षेत पास व्हाल…

    स्पर्धा परीक्षेची चांगली सुरुवात करणे म्हणजेच अर्धे काम फत्ते झाल्यासारखे असते. तुम्ही जशी सुरुवात करता तसाचा शेवट होतो. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी शाळा-कॉलेज पासूनच करणे गरजेचे आहे. पुढे जाऊन एमपीएससी, यूपीएससी, बॅंकिंग आदी परीक्षा सोपी बनवायची असेल तर इंग्लीशकडे विशेष लक्ष द्यावे. शिक्षण घेत असतांना बातम्या पहाणे व वाचणे महत्त्वाचे आहे. देश-विदेशातील घडणाऱ्या घटनांचा होणारा परिणाम आणि प्रभाव अभ्यासणे आवश्‍यक आहे. विषयांमधून उमेदवारांचे सर्वंकष ज्ञान तपासले जाते, जे कुठल्याही शॉर्टकट किंवा फास्ट फॉरवर्ड अभ्यास पद्धतीने मिळत नाही. यामुळे लवकर तयारीला सुरुवात करणे योग्य आहे.

    विविध पॅटर्न्सची आठवी ते बारावी पर्यंतची पुस्तके वाचणे फायद्याचे ठरेल. या पुस्तकांमधील मूलभूत माहिती खूप महत्त्वाची आहे ती एक प्रकारचा पायाच आहे. स्पर्धा परीक्षेत गणिताचा स्तर हा दहावीपर्यंतचा असतो.

    इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविणे खूप महत्त्वाचे आहे. इंग्रजी लिहिण्याची व बोलण्याची सवय केलीच पाहिजे. यासाठी ग्रामरकडे लक्ष दयावे, इंग्लिश वर्तमानपत्र वाचा नंतर हळूहळू लहान-मोठ्या पुस्तकांकडे मोर्चा वळवावा. इंग्रजी चॅनेल्स वरील विविध विषयांवरील कार्यक्रम, परिसंवाद व चर्चा ऐकण्याने आपले शब्दोच्चार, बोलण्याची शैली इत्यादी सुधारण्यास मदत होईल.

    प्रत्येक गोष्टींसाठी वेळेचे योग्य नियोजन हवे. कुठला विषय अधिक व कुठला कमी महत्त्वाचा, कुठला सोपा व कुठला कठीण इत्यादी बाबी डोळ्यांसमोर ठेवून वेळेचे नियोजन करता आले पाहिजे. प्रशासकीय सेवा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर फेसबुक, ट्‌विट्टर इंटरनेटसारख्या वैज्ञानिक व इतर वेळखाऊ मोहांवर विजय मिळविता यायलाच हवा.

    बुद्धिमत्ता चाचणीवर भर शैक्षणिक वर्षांपासूनच द्यावा कारण कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील एक अविभाज्य घटक म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. यासाठी गतिमान आकडेमोड करणे, पाढे, वर्ग, घनसंख्या यांचे पाठांतर असावे. वाचनातूनच आजूबाजूच्या घटनांचा वेध घेता येतो, विचार प्रगल्भ होतात.

    गणित हा कठीण वाटणारा विषय आहे. परंतु स्पर्धा परीक्षेत कलाटणी मिळवून देऊ शकतो. शाळेत असतानाच गणिताचा पाया मजबूत करायला हवा. यामधे काळ, काम, वेग, नाते संबंध, दिशा, तर्कशुद्ध युक्तिवाद आदी बाबींवर प्रश्न विचारले जातात.

    स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून करिअर सापेक्ष विकास फार महत्त्वाचा आहे व तो केल्यास यश सहज साध्य आहे. करिअरशी निगडित अभ्यास आणि ज्ञान, करिअरसाठी आवश्‍यक गुणकौशल्ये, करिअरला पूरक अशा वृत्तीत बदल करणे उदा- पोलीस बनण्यासाठी तल्लख बुद्धिमत्ता, डिटेक्‍टिव्ह माइंड, तन्दरुस्त व चपळ शरीर असावे लागते. जर तुम्ही वरील पद्धतीने प्रामाणिपणे अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल.

    Source: Dainik prabhat

    No comments:

    Post a Comment