🔹पोपटराव उगले यांना उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार जाहीर
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर ग्रंथालयाचे मुख्य ग्रंथपाल पोपटराव रंभाजी उगले यांना डॉ. एस. आर. रंगनाथन् उत्कृष्ट ग्रंथालय सेवक ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नाशिक विभागीय स्तरावरील हा पुरस्कार असून, राज्यस्तरीय निवड समितीने शासन निर्णयानुसार घोषित केला आहे.
उगले हे गेली 20 वर्षांपासून भेंडा (ज्ञानेश्वरनगर) येथील ज्ञानेश्वर ग्रंथालय येथे कार्यरत असून, त्यांनी जिल्ह्यातील अनेक ग्रंथालयांना भेटी देऊन ग्रंथपालांना मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ग्रंथालय चळवळ वाढण्यास मोलाचे सहकार्य झाले आहे. उगले यांना यापूर्वी गुणवंत ग्रंथपालासह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे.

No comments:
Post a Comment