Views
भारताने जिंकली आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप :
- भारताचा स्टार खेळाडू पंकज अडवाणी याने लक्ष्मण रावतच्या साथीने अंतिम फेरीत पाकिस्तानला धूळ चारतआशियाई सांघिक स्नूकर चॅम्पियनशिप जिंकली.
- सर्वात आधी अडवाणीने मोहंमद बिलालविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली. पाकिस्तानी खेळाडूने अडवाणीविरुद्ध फाऊलने पहिला गुण मिळवला; परंतु भारतीय खेळाडूने 83 च्या शानदार ब्रेकने जोरदार मुसंडी मारत बेस्ट ऑफ फाइव्ह फायनलमध्ये पहिला फ्रेम आपल्या नावावर केला.
- तसेच दुसरीकडे त्याचा सहकारी रावतनेदेखील अशाच प्रकारची सर्वोत्तम कामगिरी करताना निराश केले नाही. त्याने संधीचे सोने करताना बाबर मसिह याला धूळ चारली.
सोनलला पहिली 'कल्पना चावला' शिष्यवृत्ती प्रदान :
- अमरावतीच्या 21 वर्षीय सोनल बबेरवाल हिने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. या विद्यार्थिनीला आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठाची (इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटी) पहिली 'कल्पना चावला स्कॉलरशिप' प्रदान करण्यात आली आहे.आयर्लंडमधील कॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने ही घोषणा केली आहे.
- भारताची पहिली महिला अंतराळवीर डॉ. कल्पना चावला यांच्या स्मरणार्थ ही स्कॉलरशिप प्रदान करण्यात येते. फेब्रुवारी 2003 मध्ये कोलंबिया अंतराळयानाच्या अपघातात चावला यांचा मृत्यू झाला होता.
- बुद्धिमान भारतीय महिलांमधील तांत्रिक आणि अंतराळविषयक संशोधन कौशल्य विकसित करणे हे या शिष्यवृत्तीमागील उद्दिष्ट आहे.
- अंतराळ क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत हा कायमच महत्त्वाचा भाग राहील, असेही यावेळी युनिव्हर्सिटीने म्हटले आहे.
- विज्ञान, वैद्यकीय वा खगोलशास्त्राशी संबंधित क्षेत्रांतील भारतीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करण्याचा कॉर्क इन्स्टिट्यूटचा मानस आहे.
महिला क्रिकेट विश्वचषकात भारताचा विजयी चौकार :
- दीप्ती शर्मा आणि कर्णधार मिताली राज यांच्या शानदार अर्धशतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग चौथा विजय मिळवताना श्रीलंकेला 16 धावांनी पराभूत केले.
- भारताने प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 8 बाद 232धावा उभारल्यानंतर, श्रीलंकेने 50 षटकात 7 बाद 216धावा काढल्या.
- तसेच धावांचा पाठलाग करताना लंकेने सावध सुरुवात केली. दिलानी मनोदरा (61), शशिकला सिरिवर्देने (37) आणि निपुनी हंसिका (29) यांच्या जोरावर श्रीलंकेने आपले आव्हान कायम राखले होते.
- परंतु, अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी आणि पुनम यादव यांनी मोक्याच्यावेळी प्रत्येकी 2 बळी घेत लंकेची कोंडी केली. दीप्ती आणि एकता बिस्त यांनीही प्रत्येकी एक बळी घेत चांगला मारा करीत भारताला विजय मिळून दिला.
भारत-इस्त्रायलमध्ये सात करार समंत :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक इस्त्रायल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि इस्त्रायल यांनी विविध क्षेत्रांतील सात करारांवर स्वाक्षरी केली.
- जागतिक शांतता आणि स्थर्याला धोका असलेल्या दहशतवादाचा बिमोड करण्याचा निर्धार पंतप्रधान मोदी आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी चर्चेनंतर बोलताना व्यक्त केला.
- भारत-इस्त्रायल यांच्यातील नात्याची गाठ स्वर्गातच बांधली असल्याची टिप्पणी करत नेतान्याहू यांनी उभयपक्षी संबंध दृढ असल्याची ग्वाही दिली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावर झालेल्या जंगी स्वागताने लिहिल्या गेलेल्या नव्या अध्यायानंतर द्वीपक्षीय संबंध आणखी दृढ झाले.
- पंतप्रधान मोदी आणि नेतान्याहू यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. या वेळी भारत आणि इस्त्रायल यांच्यात अवकाश, जलव्यवस्थापन, कृषी या क्षेत्रांसह सात करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.
दिनविशेष :
- जैन संघाचे पहिले अध्यक्ष डॉ. शामाप्रसाद मुखर्जीयांचा जन्म 6 जुलै 1901 मध्ये झाला.
- 6 जुलै 1905 हा भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर यांचाजन्मदिन आहे.
- भारत व तिबेटमधील नथु ला खिंड व्यापारास 6 जुलै 2006 रोजी खुली करण्यात आली.
No comments:
Post a Comment