Views या रे या सारे या खेळायला सारे या या रे या सारे या पळायला सारे या बैल होऊ सारे आपण घाण्याला मग घेऊ जोडून फिरुया फिरुया घाण्यासंगे फिरुया ! या रे या सारे या खेळायला सारे या या रे या सारे या पळायला सारे या फेरीवाला होऊ आपण फुगे खेळणी हाती घेऊन वेचुया वेचुया खेळणी वेचुया ! या रे या सारे या खेळायला सारे या या रे या सारे या पळायला सारे या माळी दादा होऊ आपण कुदळ फावडी हाती घेऊन खनुया खनुया सारी माती खनुया ! या रे या सारे या खेळायला सारे या या रे या सारे या पळायला सारे या घोडे होऊ सारे आपण टांग्याला मग घेऊ जोडून जाऊया जाऊया गावाला जाऊया ! या रे या सारे या खेळायला सारे या या रे या सारे या पळायला सारे या !