एक होता छब्बु
भलताच ढब्बू
नजरेचा कावळा
अगदीच बावळा
एकदा झाली गम्मत
बसली होती पंगत
जेवायला केले लाडू
छबू ला किती वाढू?
आधीच छबू खादाड
त्यात झाली वाढ
पैज लावली छबू ने
लाडू खाल्ले अठ्ठावीस
जीव झाला कासावीस
पोट लागले दुखायला
पोट लागले फुगायला
रडला!
तो रडला तरी किती
खादाड रावांची झाली फजिती
अहो! खादाड रावांची झाली फजिती