Views बाहुली माझी छान ग, फिरवी गरगर मान ग कुरळे कुरळे केस काळे हत्ती सारखे बारीक डोळे हात पाय इवले इवले मोठे मोठे कान ग बाहुली माझी छान ग, फिरवी गरगर मान ग काना मध्ये डूल घालती केसा मध्ये फुल माळती सर्वांना ती आवडते अश्शी गोरीपान ग बाहुली माझी छान ग, फिरवी गरगर मान ग रुसत नाही फुगत नाही खाऊ साठी रडत नाही पैसा सुद्धा मागत नाही असता अगदी वाण ग बाहुली माझी छान ग, फिरवी गरगर मान ग ओठ दाबता गाणे गाई मांडीवरती झोपून जाई शहाणी माझी सोना ग बाहुली माझी छान ग, फिरवी गरगर मान ग