Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, January 9, 2017

    Views
    __________________________________________
       उपस्थिती /सेल्फी अँड्रॉइड मोबाईल App वापरताना येणाऱ्या अडचणी वरील मार्गदर्शन (FAQ)
    __________________________________________
      १) जर आपल्या शाळेतील शिक्षक रजेवर असेल तर त्या दिवसांची त्या वर्गाची हजेरी कोणी भरावी ?
    उत्तर : जर आपल्या शाळेचा एखादा शिक्षक रजेवर अथवा ट्रेनिंग साठी शाळेबाहेर असेल तर त्या वर्गाची हजेरी ही  student पोर्टलला Online  भरावी.तशी सुविधा लवकरच देण्यात   येणार आहे. सध्या ही सुविधा दिलेली नाही.
    २) एक शिक्षकी किंवा द्विशिक्षकी शाळेतील शिक्षक रजेवर असल्यास ती शाळा चालविण्यासाठी दुसऱ्या शाळेतील शिक्षक  काही दिवस त्या शाळेत  गेले, तर त्यांच्या स्वतःच्या वर्गाची हजेरी कोणी भरावी ?
    उत्तर : अशा केस मध्ये त्यांच्या मूळ शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्या वर्गाची हजेरी student पोर्टल ला लॉगिन करून भरू शकतील.तशी सुविधा लवकरच देण्यात येणार आहे.
    ३) ज्या शाळेतील शिक्षक रजेवर आहे अशा केस मध्ये त्या वर्गाची उपस्थिती मुख्यध्यापकांनी भरावी परंतु जर याच उदाहरणामध्ये   मुख्याध्यापक देखील रजेवर असतील तर त्या  वर्गांची हजेरी कोणी भरावी?
    उत्तर : शाळेतील ज्या शिक्षकाकडे मुख्याध्यापकाचा चार्ज असेल अशा शिक्षकांनी अथवा शाळेत उपलब्ध असेल अशा इतर कोणत्याही शिक्षकांने रजेवर असतील अशा शिक्षकांच्या वर्गाची हजेरी student पोर्टल ला जाऊन online पद्धतीने भरावी. 
    ४) उपस्थिती  App द्वारे  कोणत्या वर्गापर्यंत पर्यंत उपस्थितीची नोंद घ्यायची आहे ?
    उत्तर : उपस्थिती  App हे  सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी इयत्ता १   ली ते १२ वी पर्यंतच्या सर्व वर्गासाठी वापरावयाचे आहे.
    ५) एखाद्या दिवशी काही कारणास्तव उपस्थिती नोंद घेता आली नाही तर दुसऱ्या दिवशी भरता येईल काय?
    उत्तर : कोणत्याही कारणास्तव अँप मध्ये उपस्थिती नोंद करावयाची राहून गेल्यास ती उपस्थिती दुसऱ्या दिवशी नोंदवता येईल. ही सुविधा फक्त सुरुवातीला काही दिवसच  देण्यात येणार आहे.परंतु सेल्फीसह उपस्थिती नोंदवताना मात्र ही सुविधा देण्यात आलेली नाही आहे हे लक्षात घ्यावे.सेल्फीसह उपस्थितीची नोंद घेताना विद्यार्थ्यांचे सेल्फी काढून ते त्याच दिवशी save करावे,इतर दिवशी save करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही. save केलेले सेल्फी हे त्याच दिवशी किंवा वर्गशिक्षक जेंव्हा Network जातील तेंव्हा कोणत्याही दिवशी submit करता येईल,याची काळजी system कडून घेण्यात आलेली आहे.
    ६) ज्या शिक्षकाकडे अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्या वर्गाची हजेरी कोणी भरावी ?
    उत्तर :  जर मुख्याध्यापकाकडे अथवा अन्य कोणत्याही शिक्षकाकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर अशा वर्गाची उपस्थिती ही त्यांनी नोंद करावी.अशा प्रकारे उपस्थिती नोंद करण्यासाठी अशा अँड्रॉइड मोबाईल असलेल्या शिक्षकाचा student पोर्टल ला रजिस्टर असलेला mobile क्रमांक  अँड्रॉइड मोबाईल नसलेल्या वर्ग शिक्षकाच्या नावासमोर student पोर्टल च्या शाळेच्या लॉगीन मध्ये जाऊन  टाकावा लागेल.त्यामुळे अँड्रॉइड मोबाईल असलेल्या शिक्षकाच्या उपस्थिती app मध्ये अँड्रॉइड मोबाईल नसलेल्या वर्ग शिक्षकांचे वर्ग देखील दिसून येईल. परंतु कोणत्याही शिक्षकाकडे  कडे अँड्रॉइड मोबाईल नसेल तर त्यांच्या वर्गाची हजेरी मुख्याध्यापकाने online पद्धतीने student पोर्टल ला जाऊन भरावी. तशी सुविधा लवकरच देण्यात येणार आहे.
    ७)  एखाद्या  शाळेतील महिला शिक्षिका प्रसुती रजेवर अथवा इतर कोणताही शिक्षक दीर्घ मुदतीच्या रजेवर गेल्याने तेथे एका शिक्षकाची तात्पुरती नियुक्ती केली आहे .अशा दीर्घ मुदतीच्या रजेवर गेलेल्या वर्ग शिक्षकांच्या वर्गाची माहिती कोणी भरावी?
    उत्तर : अशा उदाहरणामध्ये तात्पुरती नियुक्ती केलेल्या शिक्षकांनी अँप द्वारे उपस्थिती नोंद करावी. त्यासाठी ज्या शाळेत या शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती केलेली आहे अशा शाळेच्या student पोर्टल ला या शिक्षकाने आपले नाव तात्पुरते नोंदवावे आणि त्या वर्गाला assign करून घेऊन अँप रजिस्टर करावे.जर असा शिक्षक त्याच्या मुळ शाळेत वर्गशिक्षक म्हणून एखाद्या वर्गाला रजिस्टर असेल तर त्यांनी त्या वर्गाची हजेरी भरू नये,त्यांच्या मुळ शाळेच्या वर्गाची हजेरी भरण्याची जबाबदारी त्यांच्या मुळ शाळेच्या मुख्याध्यापकांची राहील. ज्या वेळी तात्पुरती नियुक्ती झालेला शिक्षक आपल्या मुळ शाळेत जाईल त्या वेळी अशा शिक्षकास या शाळेतून delete करावे.
    ८)  मोबाईल हँग होणे, डिस्चार्ज होणे, नेटवर्क प्रॉब्लेम अथवा तांत्रिक अडचणीमुळे त्या दिवशी सेल्फी घेता आली नाही तर संबंधीत वर्गशिक्षकाने  काय करावे ?
    उत्तर : अशा उदाहरणामध्ये  मुख्याध्यापकाने  अथवा सेल्फी घेण्याची सुविधा असलेल्या आपल्याच शाळेतील एखाद्या शिक्षकाने  संबंधीत वर्गशिक्षकाचा वर्ग स्वतःला assign करावा आणी आपल्या mobile मधून सेल्फीसह उपस्थितीची नोंद करावी.
    ९) सेल्फी घेण्याची वेळ कोणती आहे ?
    उत्तर : सेल्फी घेण्यासाठी अशी कोणतीही वेळ निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र सेल्फी ही शाळेच्या वेळेतच घेऊन save करावी याबाबत बंधन घालण्यात आलेले आहे.आपल्या वर्गातील जास्तीत जास्त  मुले जेंव्हा शाळेत येतील आणि वर्ग शिक्षकास जेंव्हा वाटेल की यानंतर मुले आता येऊ शकणार नाही त्यावेळी सेल्फी घ्यावा व save करून ठेवावा.त्यानंतरही काही मुले शाळेत आलेच तर ते जेंव्हा येतील त्या वेळेला त्यांचा सेल्फी काढावा आणी जेंव्हा वाटेल की आता यानंतर मुले येऊ शकणार नाही त्या वेळेला save केलेले सेल्फी submit करावेत.
    १०) सेल्फी/उपस्थिती submit केल्यानंतर एखादा विद्यार्थी दुपार नंतर उपस्थित राहिल्यास त्यांच्या उपस्थितीचे काय करावे?
    उत्तर : एकदा सेल्फी/उपस्थिती submit केली की त्यानंतर अशा विद्यार्थ्यांची उपस्थिती submit करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही आहे.या साठी जेंव्हा आपणास खात्री होईल की आता या वेळेनंतर कोणताही विद्यार्थी शाळेत येणार नाही त्याच वेळी आपण आपली उपस्थिती submit करावी.
    ११) एखादा  विद्यार्थी  दुसऱ्या शाळेत दाखल झाला परंतु  ऑनलाईन पहिल्या शाळेत दिसतोय अशा वेळी दोन्ही शाळेनी कोणती भूमिका घ्यावी ?
    उत्तर : विद्यार्थी ज्या शाळेत सध्या दाखल आहे अशा शाळेने जुन्या शाळेकडे विद्यार्थी ट्रान्स्फर Request पाठवून त्या विद्यार्थ्यास ट्रान्स्फर करून घ्यावे आणि त्याची उपस्थिती घेण्यास सुरुवात करावी.
    १२) *काही शाळांनी एखादा विद्यार्थी दुसऱ्या शाळेतून आपल्याकडे शिकायला आला असता त्या शाळेला ट्रान्स्फर Request न पाठवता New एन्ट्री द्वारे अशा विद्यार्थ्याची नोंद करून घेतली आहे.अशा केस मध्ये सदर विद्यार्थी दोन्ही शाळेत दिसून येत आहे.जुन्या शाळेने अशा विद्यार्थ्याच्या बाबतीत उपस्थिती बाबत काय करावे ?
    उत्तर : अशा केस मध्ये जुन्या शाळेने अशा विद्यार्थ्यांच्या नोंदी या  Not Known तुकडीत ट्रान्स्फर कराव्यात .
    १३) एखाद्या शिक्षकाकडे जर फ्रंट कॅमेरा असलेला mobile नसेल परंतु back कॅमेरा असलेला mobile असेल तर अशा mobile मधून सेल्फीसह उपस्थिती कशी घ्यावी ?
    *उत्तर* : या केस मध्ये वर्ग शिक्षक फ्रंट कॅमेरा द्वारे सेल्फी सह उपस्थिती घेऊ शकत नाही.परंतु आपल्या सेल्फी सह उपस्थिती घेण्याच्या प्रक्रियेत असे नाही आहे की फ्रंट कॅमेराच वापरावा,उपस्थिती नोंदवत असताना विद्यार्थ्या सह वर्ग शिक्षक त्या फोटो मध्ये असावा असे अपेक्षित आहे. त्यामुळे back कॅमेराचा उपयोग करून जरी आपण फोटो काढला तरी सुद्धा चालणार आहे.सेल्फी हा त्या वर्ग शिक्षकांनीच काढावा असे नसून इतर कोणीही काढला तरी चालेल मात्र त्या फोटोत विद्यार्थी आणि वर्ग शिक्षक असावा असे अपेक्षित आहे.
    १४) *उपस्थिती App हे विंडोज आणि Apple किंवा इतर कोणत्याही mobile operating system  ला चालू शकेल का ?*
    *उत्तर* : नाही.उपस्थिती app हे फक्त Android operating system   असलेल्या mobile मध्येच चालणार आहे.
    १५) *उपस्थिती app इंस्टाल करताना There was a problem while parsing the package अशी समस्या येत असेल तर काय करावे?*
    *उत्तर* : mobile द्वारे student पोर्टल ला लॉगीन करून आपण उपस्थिती app download करतो.ही क्रिया करताना सर्वानी एक बाब लक्षात घ्यावे एकी आपल्या mobile कंपनीने इंटरनेट ब्राउज करण्यासाठी जे ब्राऊजर दिलेले आहे त्याचाच वापर करावा.तरीही आपणास समस्या येतच असेल तर अशा वेळी पुढील लिंक चा वापर करून आपण उपस्थिती app हे download करावे.
    १६) *एकाच वर्ग शिक्षकाकडे अनेक वर वर्ग असेल म्हणजेच एकच शिक्षक अनेक वर्गाचा वर्ग शिक्षक असेल तर अशा वेळी उपस्थिती app मध्ये उपस्थिती कशी नोंद करावी?*
    *उत्तर* : एकाच वर्ग शिक्षकाकडे अनेक वर वर्ग असेल म्हणजेच एकच शिक्षक अनेक वर्गाचा वर्ग शिक्षक असेल (एक/दोन शिक्षक असलेली शाळा) तर सर्व वर्गाची उपस्थिती ही उपस्थिती app द्वारे भरणे सहज शक्य आहे.यासाठी जेवढे वर्ग आहे तेवढ्या प्रमाणात app इंस्टाल करणे गरजेचे नाही आहे.यासाठी student पोर्टल ला जेंव्हा आपण वर्गशिक्षकाला तो ज्या वर्गाला वर शिक्षक म्हणून काम करतो त्या वर्गाला  assign करतो,त्या वेळी तो ज्या वर्गाला वर्ग शिक्षक म्हणून  आहे तेवढे वर्ग assign करणे गरजेचे आहे.म्हणजे जेंव्हा आपण app मध्ये उपस्थिती भरू त्या वेळी तेवढे वर्ग/तुकडी आपणास दिसून येईल.अशा वर्गाची उपस्थिती नोंद घेताना उपस्थिती app मध्ये एक  वर्गाची उपस्थिती submit करावी आणि त्या नंतर दुसऱ्या वर्गाची उपस्थिती submit करावी.
    १७) *ज्या दिवशी सेल्फी सह उपस्थिती नोंद करावयाची आहे त्याच  दिवशी उपस्थिती देखील घ्यावयाची आहे काय ?*
    *उत्तर* : हो.ज्या दिवशी सेल्फी सह उपस्थिती घ्यावयाची आहे त्या दिवशी उपस्थिती घेऊन submit करावयाची आहे.
    १८) *सेल्फी सह उपस्थिती कोणत्या दिवशी घ्यायची आहे ?*
    *उत्तर* :  महाराष्ट्र शासनाच्या ३ नोव्हेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार जानेवारी महिन्याच्या दर  सोमवारी शाळेच्या पटावर असलेल्या सर्व मुलांची १० च्या गटात वर्ग शिक्षकासोबत सेल्फी घेण्यात यावी असे अपेक्षित आहे. सुरुवातीला दोन सोमवार नंतर फक्त अनियमित राहणाऱ्या मुलांचे सेल्फी घेण्यात यावे असे निर्देश देण्यात आलेले आहेत.
    १९)  *सुरुवातीला दोन सोमवार नंतर फक्त अनियमित राहणाऱ्या मुलांचे सेल्फी घेण्यात यावे असे शासन निर्णयात निर्देश दिलेले आहेत.मग अनियमित मुले कोणाला समजावे ?*
    *उत्तर* : एका आठवड्यात ३ किंवा ३ पेक्षा अधिक दिवस गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यास अनियमित विद्यार्थी समजण्यात येणार आहे.अशा विद्यार्थ्यांची यादी दोन आठवड्यानंतर आपल्या लॉगीन ला दाखवण्यात येणार आहे.दोन आठवड्यानंतर अशाच मुलांची सेल्फी सह उपस्थिती नोंद घ्यायची आहे. त्यानंतर याच मुलांवर लक्ष केंद्रित करून या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्व स्तरावरून कार्य करावयाचे आहे.मात्र उपस्थिती द्वारे हजेरी नोंद घेताना सर्व मुलांची उपस्थिती रोजच्या रोज घेतली जाणार आहे.
    २०)  *जर सोमवारी सेल्फीसह उपस्थिती घ्यायची आहे आणि याच    दिवशी वर्ग शिक्षक रजेवर असेल तर मग अशा वेळी काय करावे ?*
    *उत्तर* :  जर सोमवारी सेल्फीसह उपस्थिती घ्यायची आहे आणि याच दिवशी वर्ग शिक्षक रजेवर असेल तर अशा उदाहरणामध्ये प्रथमतः मुख्याध्यापक व मुख्याध्यापक नसेल तर  शाळेतील अन्य कोणताही शिक्षक की ज्याला त्या वर्गाची जाबाबदारी दिलेली आहे ते  त्या वर्गाला स्वतः ला assign करून घेईल व त्या वर्गाची सेल्फी सह उपस्थितीची नोंद करेल.कोणत्याही परिस्थितीत सोमवारी सेल्फी सह उपस्थितीची नोंद केली जावी अशी अपेक्षा आहे.
    २१) *उपस्थिती मध्ये फक्त गैरहजर मुलांची नोंद घ्यायची आहे आणि सेल्फी सह उपस्थिती मध्ये मात्र सेल्फी मध्ये असलेल्या हजर मुलांची उपस्थिती घ्यायची आहे.तर अशा वेळी जर उपस्थिती मध्ये गैरहजर म्हणून नोंद केलेले विद्यार्थी सेल्फी मध्ये हजर म्हणून दाखवले जातात.अशा वेळी चुकून जर उपस्थिती मध्ये एखादा मुलगा गैरहजर म्हणून दाखवला गेला आणि सेल्फी मध्ये तोच मुलगा हजर म्हणून दाखवला गेला किंवा याउलट झाले तर काय करावे ?*
    *उत्तर* : अशा उदाहरणामध्ये उपस्थिती मध्ये गैरहजर विद्यार्थी select  करताना काळजीपूर्वक select करावेत.जेणेकरून अशा चुका होणार नाही याची काळजी घ्यावी.अशा केस मध्ये इतर कोणताही उपाय नाही आहे हे लक्षात घ्यावे.कोणत्याही सुविधेमधून विद्यार्थी उपस्थिती एकदा submit झाली की त्यात कोणताही बदल करता येत नाही.
    २२) *उपस्थिती app मध्ये हजेरी भरताना ती शाळेत जाऊनच भरावी असे अपेक्षित आहे काय ?*
    *उत्तर* : विद्यार्थ्यांची उपस्थिती हे शाळेतून जाऊनच भरावी असे अपेक्षित आहे.परंतु ज्या शाळेत कोणत्याही प्रकारचे network नाही अशा शाळांना मात्र यात खालीलप्रमाणे सवलत देण्यात आलेली आहे.
    उपस्थिती app द्वारे उपस्थिती नोंद करताना जर शाळेत network नसेल तर अशा केस मध्ये त्या शाळेच्या वर्गशिक्षकांनी network मध्ये गेल्यावर उपस्थिती भरावी.जर वर्ग शिक्षक त्याच दिवशी network मध्ये जाणे शक्य नसेल तर अशा केस मध्ये तो वर्गशिक्षक जेंव्हा network मध्ये जाईल त्या दिवशी त्यांनी मागील सर्व दिवसांची उपस्थिती submit करावी.परंतु अशा network नसलेल्या शाळा कोणत्या आहेत आणि अशा कोणत्या शाळांना ही सुविधा उपलब्ध करून द्यायची अथवा नाही याविषयीची सुविधा वरिष्ठ कार्यालयाला देण्यात येणार आहे हे लक्षात घ्यावे.वरिष्ठ कार्यालयाने Map केलेल्या अशाच शाळांना ही  सुविधा  देण्यात येणार आहे.
      सेल्फी सह उपस्थितीची नोंद करताना मात्र वेगळ्या प्रकारची सुविधा देण्यात आलेली आहे.या मध्ये वर्गशिक्षकाने network मध्ये नसले तरी सेल्फी काढून त्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती रोजच्या रोज save करावी.network नसल्याने ही save केलेली उपस्थिती त्यांना submit करता येणार नाही.ज्या दिवशी वर्गशिक्षक network मध्ये जाईल त्या दिवशी त्यांनी ही save केलेली सेल्फीसह उपस्थिती submit करावी.हे करत असताना एक बाब लक्षात घ्यावी की ज्या वेळेला आपण विद्यार्थ्यांचे सेल्फी काढतो व save करतो त्याच वेळेला त्या सेल्फी सोबत आपण काढत असलेल्या सेल्फी सोबत आपल्या ठिकाणाचे अक्षांश-रेखांश म्हणजेच Lat-Long हे save केले जाते.म्हणजेच यावरून विद्यार्थ्याचे काढलेले सेल्फी हे शाळेमधूनच काढलेले आहे अथवा नाही हे समजून येते.आपल्या शाळेचे अक्षांश-रेखांश म्हणजेच Lat-Long हे system मध्ये आगोदरच save करण्यात आलेले आहे. या  Lat-Long चा आणि सेल्फी काढलेल्या Lat-Long ची तुलना करून सदर उपस्थिती ही शाळेमध्येच save केलेली आहे अथवा नाही याचा रिपोर्ट हा वरिष्ठ कार्यालयाला online उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.त्यामुळे सेल्फी सह उपस्थिती नोंद करताना network नसणाऱ्या शाळांनी सेल्फी हा शालेतच काढावा परंतु submit करताना कोठूनही केला तरी चालणार आहे.सेल्फी सह उपस्थिती ही फक्त सोमावारी घ्यायची आहे परंतु सोमवार वगळता इतर दिवशी उपस्थितीची  नोंद करताना देखील system कडून  Lat-Long ची नोंद घेतली जाणार आहे व अशा केस मध्ये network नसलेल्या किंवा शाळेतून उपस्थितीची नोंद न केलेल्या वर्ग शिक्षकांची व शाळांच्या माहितीचा रिपोर्ट हा गटशिक्षणाधिकारी,शिक्षणाधिकारी व इतर वरिष्ठ लॉगीन ला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
    २३) *उपस्थिती app द्वारे विद्यार्थी  उपस्थिती एकदा submit केली की त्यानंतर त्यात काही बदल करता येईल का ?*
    *उत्तर* : नाही.एकदा submit केलेली उपस्थिती कोणत्याही परिस्थितीत पुन्हा बदलण्याची सुविधा देण्यात आलेली नाही.त्यामुळे submit करताना या बाबत काळजी घ्यावी.
    २४) *उपस्थिती app द्वारे उपस्थित विद्यार्थी नोंद केल्यावर ही उपस्थिती शालेय पोषण आहार app मध्ये घेतली जाणार आहे,हे खरे आहे काय ?*
    *उत्तर* : हो.पुढील काही दिवसानंतर ही उपस्थिती शालेय पोषण आहार माहिती साठी घेतली जाणार आहे.त्या बाबतची कार्यवाही सुरु आहे.योग्य वेळी याविषयीची सुचना सर्वांना देण्यात येईल.
    २५) *आपल्या शाळेत काही शिक्षक हे अनुदानित तुकडीवर काम करत आहेत तसेच काही शिक्षक हे मात्र विनानुदानित तुकडीवर देखील आहेत.विनानुदानित तुकडीवर काम करणाऱ्या शिक्षकांची वैयक्तिक मान्यता नसल्याने त्यांना student पोर्टल मध्ये उपस्थिती app साठी रजिस्टर केले तर चालेल का ?*
    *उत्तर* : उपस्थिती app द्वारे उपस्थिती नोंदवण्यासाठी त्या वर्गाच्या वर्ग शिक्षकाची आवश्यकता आहे.वर्ग शिक्षकाला वैयक्तिक मान्यता असणे किंवा नसणे ही बाब त्यासाठी महत्वाची नाही आहे.भविष्यात तो शिक्षक शाळेत असेल नसेल अथवा त्यांना वैयक्तिक मान्यता मिळेल अथवा न मिळेल याचा आणि उपस्थिती app ला रजिस्टर करण्याचा काहीही संबंध नाही.कोणत्याही वर्ग शिक्षकाला आपण उपस्थिती app साठी रजिस्टर करू शकता.
    २६) *उपस्थिती app हे फक्त student पोर्टल लॉगीन करून घेतले तरच चालेल अथवा चालणार नाही हे कितपत सत्य आहे?*
    *उत्तर* : उपस्थिती app हे सर्व शाळांच्या student पोर्टल ला उपलब्ध करून दिलेले आहे.तेथून आपण download करू शकता.तसेच आपण आपल्या इतर शिक्षकांच्या mobile मधून सुद्धा शेअर करून घेऊ शकता.तसेच राज्यस्तरीय whatsapp समूह school.com या ग्रुप मधून दिलेल्या लिंक द्वारे देखील घेऊ शकाल.
    २७) *सोमवारी सेल्फी आणि उपस्थिती या दोन्ही प्रकारे उपस्थिती नोंद करावयाची आहे.परंतु या दोन्ही प्रकारात आधी उपस्थिती घ्यावी की सेल्फी?*
    *उत्तर* : सोमवारी सेल्फी आणि उपस्थिती या दोन्ही प्रकारे उपस्थिती नोंद करावयाची आहे. यात कोणता प्रकार आधी करावा याचे आपणावर कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही.परंतु सर्वांनी आधी उपस्थिती द्वारे हजेरी नोंद करावी आणि आणि मग त्यानंतर सेल्फी द्वारे नोंद घ्यावी.
    २८) *उपस्थिती app च्या विद्यार्थी यादी मध्ये काही विद्यार्थ्यांचे दोन वेळा नाव दिसते परंतु student पोर्टल मध्ये पाहिले तर एकदाच नाव दिसत आहे,असे झाल्यास काय करावे ?*
    *उत्तर* : अशा उदाहरणामध्ये उपस्थिती app मध्ये refresh student list या बटनाला क्लिक करा.थोड्याच वेळात आपली समस्या सुटेल.
    २९) *नेटवर्क/इंटरनेट कनेक्शन नसताना उपस्थिती app ओपन होते का ?*
    *उत्तर* : उपस्थिती app रजिस्टर करताना आणि उपस्थिती submit करताना  नेटवर्क/इंटरनेट कनेक्शन ची आवश्यकता असते.त्यामुळे उपस्थिती app ओपन करण्यासाठी नेटवर्क/इंटरनेट कनेक्शन ची आवश्यकता नाही. नेटवर्क/इंटरनेट कनेक्शन नसतानाही आपण सेल्फी save करू शकणार आहोत हे लक्षात घ्यावे.फक्त save केलेली सेल्फी submit करण्यासाठी आपणास  नेटवर्क/इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता आहे.
    ३०) *उपस्थिती app एकदा mobile मध्ये इंस्टाल करून रजिस्टर केले ,  त्यानंतर जर mobile हरवला अथवा खराब झाला तर दुसऱ्या mobile वर app इंस्टाल करून उपस्थिती भरता येणे शक्य होईल का ?*
    *उत्तर* :   होय. उपस्थिती app एकदा mobile मध्ये इंस्टाल करून रजिस्टर केले ,  त्यानंतर जर mobile हरवला अथवा खराब झाला तर दुसऱ्या mobile वर app इंस्टाल करून उपस्थिती भरता येणे शक्य आहे.फक्त यासाठी आपणास आपल्या शाळेच्या student लॉगीन ला जाऊन Attendance App या Tab मधील Unregister Teacher या बटनावर क्लिक करून स्वतः ला पूर्वीच्या mobile मधून unregister करून घ्यावे लागेल आणि त्यानंतरच आपण दुसऱ्या mobile वर उपस्थिती app वापरू शकाल.
    ३१) एकाच वेळी एका वर्गाची उपस्थिती वेगवेगळ्या  mobile  चा वापर करून भरता येते का ?
     
    *उत्तर : नाही.एका वेळी एकाच mobile वर उपस्थिती भरता येते.जर दुसऱ्या mobile द्वारे  आपणास उपस्थिती भरावयाची असल्यास आधीच्या mobile वरून आपणास unregister व्हावे लागते.
    ३२) *सोमावारी उपस्थिती नोंद करताना सेल्फी सह उपस्थिती नोंद करावयाची आहे.जर काही कारणास्तव सोमवारी उपस्थिती ची नोंद करता आली नाही तर दुसऱ्या दिवशी नोंद घेतली तर चालेल का ?*
    *उत्तर* : नाही.उपस्थिती app मध्ये सेल्फी सह उपस्थिती घेण्याची सुविधा फक्त आणि फक्त सोमवारीच उपलब्ध होते.इतर दिवशी आपणास सेल्फी सह उपस्थिती  नोंद करन्याक्घी सुविधा देण्यात येत नाही.त्यामुळे सोमवारीच सेल्फी सह उपस्थितीची नोंद घ्यावी.मात्र सोमवारी save केलेली सेल्फी ही submit करण्यासाठी आपण कोणत्याही दिवशी करू शकाल ही बाब महत्वाची आहे.
    ३३- सेल्फी सह उपस्थिती घेताना एकदा save केलेला फोटो पुन्हा काढून टाकता येईल का ?
    उत्तर : नाही.एकदा save केलेला फोटो सेल्फी Gallery मधून काढून टाकता येत नाही.
    __________________________________________
         उपस्थिती/सेल्फी App बाबत सविस्तर माहितीचे Manual डाउनलोड करण्यासाठीची  येथे क्लिक करा __________________________________________

    No comments:

    Post a Comment