Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, January 10, 2017

    Views
    शाळा सिद्धी आॅनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया

       प्रिय शिक्षक बंधू भगिनी 
           इंटरनेट सुरु करा.

    •  Google Chrome ओपन करा.
    •  Address बार मध्ये "14.139.60.151/sse/login.php" टाईप करुन Enter  दाबा.
    • NPSSE ची विंडो ओपन होईल. त्यामध्ये Login च्या box मध्ये "Create New Account" या पर्यायावर क्लिक करा.
    •  Add User ची विंडो ओपन होईल. त्यामध्ये "User Name / UDISE" च्या पुढे आपल्या शाळेचा UDISE कोड टाईप करा.
    •  त्याखाली असलेल्या *"Password" च्या समोर आपल्या आठवणीत राहील असा पासवर्ड टाईप करा. *लक्षात ठेवा : प्रत्येक लॉगीनच्या वेळी हा पासवर्ड आपल्याला टाकावा लागणार असल्यामुळे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे.
    •  त्याखाली "E-mail" च्या समोर आपल्या शाळेचा ई-मेल आय डी टाईप करा. शाळेचा ई-मेल आय डी तयार नसेल तर तो Gmail. Com वर जाऊन तयार करुन घ्या. किंवा आपल्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या.
    • त्याखाली "Role Type" या पर्यायासमोर "School User" हा पर्याय निवडा.
    • वरिल सर्व बाबी बरोबर नमुद केल्याची खात्री झाल्यावर सर्वात खाली असलेल्या "Submit" या पर्यायावर क्लिक करा.
    • आपल्या शाळेची नोंदणी शाळा सिद्धी साठी झालेली आहे.* ✨
    •  आता आपल्या शाळेचा "DASHBOARD" बघूया.
    • डेस्कटॉपवर वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या "LOGIN" या पर्यायावर क्लिक करा.
    • LOGIN विंडो दिसेल. त्यामध्ये "USER TYPE" च्या समोर  "School User" हा पर्याय निवडा.

    • त्याखाली आपल्या शाळेचा "UDISE Code" टाईप करा.
    • पासवर्ड टाकून "Submit" या पर्यायावर क्लिक करा.
    •  आपल्या शाळेचा Dashboard समोर दिसू लागेल.
    • शाळेची Basic Information भरणे.* ✨
    • आपल्या शाळेचा Dashboard समोर दिसल्यावर त्याच्या डाव्या बाजूला "Basic information"* दिसते. त्यामध्ये Learner's या पर्यायाखाली :
         1) Demographic Profile
         2) Attendance Rate
         3) Performance in key subjects
         4) Learning Outcomes
     Teachers या पर्यायाखाली
        1) Numbers of Teachers
        2) Teacher's Attendance
        वरील प्रत्येक पर्यायासमोर क्लिक केल्यावर           त्यामध्ये भरावयाच्या माहीतीची विंडो ओपन         होते. ती सर्व माहिती भरुन झाल्यावर खात्री           करुन Submit पर्यायावर क्लिक करायला             विसरु नका.


    • 7 क्षेत्र व 45 मानकांची माहीती भरुन स्वमूल्यमापन अहवाल भरणे. 

    बंधू भगिनींनो!  Learners व Teachers ची माहीती भरल्यावर त्याच विंडोमध्ये आपल्याला "7 KEY DOMAINS AS CRITICAL PERFORMANCE AREAS OF SCHOOL च्या खाली सर्व 7 क्षेत्र दिसतील.

    • शाळा सिद्धी मध्ये आपण चर्चा करीत असलेल्या प्रत्येक क्षेत्रातील मानकांची चांगल्या पद्धतीने उपलब्धता वाटल्यास तशी नोंद स्वयं - मूल्यमापन अहवालात करावी. उगाच खोट्या नोंदी करु नये.*

    स्वयं मूल्यमापन करतांना प्रत्येक क्षेत्र विकसित करणे आवश्यक आहे. ते कसे करावे या साठी आपण प्रत्यक्ष चर्चेत भाग घेणे आवश्यक आहे.

    • बंधू भगिनींनो! आजच आपल्या शाळेची नोंदणी शाळा सिद्धी साठी करून आपल्या परिसरातील शाळांसाठी आपली शाळा आदर्श बनवूया.

     सर्वांना उज्ज्वल भविष्याच्या हार्दीक शुभेच्छा!



    •  अतिशय महत्त्वाचेLearners आणि Teachers याची माहिती भरतांना ती 2015-16 व 2016-17 या दोन्ही सत्रांची भरावी.

    No comments:

    Post a Comment