Current affairs | Evening News Marathi
Current affairs 5 June 2020 Marathi |
5 जून मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
“ट्युलिप”: शहरी स्थानिक संस्था आणि स्मार्ट शहरांमध्ये नव्या पदवीधरांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम
“Tulip”: Training programs for new graduates in urban local bodies and smart cities
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ आणि गृहनिर्माण तसेच शहरी कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप एस. पुरी यांच्या हस्ते नवी दिल्लीत दिनांक 4 जून 2020 रोजी संयुक्तपणे “ट्युलिप (द अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्राम - TULIP)” (म्हणजेच नागरी शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम)या नावाने एक नवा उपक्रम आरंभ करण्यात आला आहे.
अशा प्रकारचा उपक्रम देशात प्रथमच सुरु होत असून, “ट्युलिप” कार्यक्रमाद्वारे देशभरातल्या सर्व शहरी स्थानिक संस्था आणि स्मार्ट शहरांमध्ये नव्याने पदवीधर झालेल्या उमेदवारांना इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमासाठीच्या विशेष संकेतस्थळाचे देखील या प्रसंगी उद्घाटन करण्यात आले.
ठळक बाबी
- राष्ट्रउभारणीच्या कामात देशातील युवकांमध्ये असलेली क्षमता वापरण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला अनुसरून या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. ट्युलिप उपक्रमामुळे देशातल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवता येणार आणि विद्यार्थ्यांकडील नव्या कल्पनांचा तसेच अभिनव विचारांचा नव्या भारताच्या उभारणीत पुरेपूर उपयोग करून घेता येणार.
- ट्युलिप उपक्रम देशभरातल्या 4400 शहरी स्थानिक संस्था आणि स्मार्ट शहरांच्या यंत्रणेत उपलब्ध असलेल्या इंटर्नशिपच्या संधी मिळवून देणार आहे. तसेच या मंचाद्वारे तरुणांना शहरी स्थानिक संस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि अभिनव पद्धतींच्या माध्यमातून सुधारणा घडवून आणण्यासाठी नव्या कल्पना राबवता येणार.
- ट्युलिप उपक्रमाद्वारे पहिल्याच वर्षी 25000 नव्या पदवीधरांना इंटर्नशिप करता येणार अशी अपेक्षा आहे. त्यातून विविध उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाचा उत्तम स्त्रोत निर्माण होणार.
- मनुष्यबळ विकास विभाग आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळाने 2025 सालापर्यंत 1 कोटी उमेदवारांसाठी इंटर्नशिप कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ते पूर्ण करण्याच्या दिशेने ट्युलिप उपक्रम हे अत्यंत महत्त्वाचे पाउल आहे.
जागतिक पर्यावरण दिन: 5 जून
World Environment Day: 5 June
दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. 1974 सालापासून दरवर्षी ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा केला जातो. जगातल्या प्रत्येक मनुष्यामध्ये पर्यावरणाविषयी जागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा यामागील मुख्य उद्देश्य आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) आणि कोलंबिया सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने 2020 सालाचा ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा केला जात असून यावर्षीची ‘जैवविविधता (Biodiversity)’ ही संकल्पना आहे.
पार्श्वभूमी
1972 साली 5-16 जून दरम्यान स्टॉकहोम (स्वीडन) येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात पर्यावरणविषयक मुद्द्यांवर पहिली प्रमुख परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या यशस्वीतेनंतर 15 डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून सदस्य राष्ट्रांमध्ये साजरा करणारा ठराव अंगिकारला गेला. याच दिवशी आणखी एका ठरावाला मंजूर देण्यात आली ज्यामधून संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) याच्या स्थापनेला मार्ग तयार झाला.
भारताचे प्रयत्न
भारतात कमी भूमिक्षेत्र आणि त्या तुलनेत अधिक मानव आणि पशुसंख्या असून जगाच्या 8 टक्के जैवविविधता आहे. समृद्ध जैवविविधतेने नटलेल्या या देशात हजारो प्रकारच्या प्राणी-वनस्पती प्रजाती आढळतात. जगातल्या जैव-विविधतेच्या 35 अतिमहत्वाच्या ठिकाणांपैकी (हॉटस्पॉट) 4 ठिकाणे भारतात आहेत, ज्यात अनेक स्थानिक प्रजाती आहेत.
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय पर्यावरण दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) संस्थेनी जाहीर केलेल्या संकल्पनेला अनुसरून विविध कार्यक्रम साजरे करीत आहे.
- सध्या कोविडमुळे देशभरात निर्माण झालेली परिस्थिती बघता, मंत्रालयाने या ‘नगर वन’ संकल्पनेवर आधारित कार्यक्रम आभासी माध्यमातून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
- वाढत्या शहरीकरणामुळे नगर भागातल्या जैव विविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयाने 200 महापालिका क्षेत्र आणि शहरांमध्ये “नगर-वने’ विकसित करण्याची योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, कारण या शहरांमध्ये बगीचे आहेत पण वने नाहीत. या वनांमुळे स्वच्छ प्राणवायू निर्मिती क्षमता वाढणार.
भारतीय नौदलाने ऊर्जा संवर्धन, सागरी प्रदूषणात कपात, आणि ऊर्जेच्या पर्यायी स्त्रोतांचा वापर करून पर्यावरणावरील प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
- ‘ब्लू वॉटर’ मोहिमेच्या परिचालनाला पर्यावरणस्नेही बनवण्याचे भारतीय नौदलाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘इंडियन नेव्ही एन्व्हायर्नमेन्ट कन्झर्वेशन रोडमॅप’ (INECR) एक मार्गदर्शक आणि सक्षम दस्तऐवज आहे.
- इंजिनमधून बाहेर पडणारे प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय नौदलाने इंधन वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी IOCL कंपनीसोबत सहकार्य करार केला आहे. यामधून सल्फरचे कमी प्रमाण असलेले इंधन विकसित करण्यात आले आहे, जे दीर्घकालीनदृष्टया उत्सर्जन पातळी तसेच जहाजाची देखभाल आवश्यकता देखील कमी करणार.
- भारतीय नौदलाने जहाजांमधील प्रदूषण प्रतिबंध संबंधी आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या (MRPOL) नियमनासाठी सर्व सहा वेळापत्रकांची स्वेच्छेने अंमलबजावणी केली. जहाजांवर तयार होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नौदलाच्या सर्व जहाजांमध्ये तैलीय पाण्याचे विभाजक (OWS) आणि कचरा प्रक्रिया उपकरणे (STP) सारखी प्रदूषण नियंत्रण उपकरणे बसवण्यात आली आहेत. तसेच हार्बर पाण्याची देखभाल सुनिश्चित करण्यासाठी, नेव्हल मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी (NMRL), मुंबई या संस्थेच्या माध्यमातून वेगवान बायोमेडिएशन तंत्रज्ञान देखील विकसित केले आहे.
- कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नात, ई-सायकल, ई-ट्रॉली आणि ई-स्कूटर सारख्या ई-वाहनांच्या वापरात वाढ होण्यासाठी उपाययोजना लागू केल्या आहेत. त्याचा प्रचार करण्यासाठी काही तळांवर नियमितपणे ‘नो व्हेईकल डे’ पाळला जातो आणि काही नौदल संस्थांमध्ये ‘वाहन मुक्त तळ’ ही संकल्पनादेखील अंमलात आणली जात आहे.
- गेल्या एका वर्षात अंदाजे 330 टन कार्बन डाय-ऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्यासाठी 16,500 हून अधिक वृक्ष लागवड करण्यात आली.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट विभागाच्या संकेतस्थळावर 'लिव्हिंग द नॅचरल वे' आणि 'वॅनिशिंग ग्लेशिअर' हे माहितीपट ऑनलाइन दाखविले गेले.
No comments:
Post a Comment