Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, May 18, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 18 May 2020 Marathi | 18 मे मराठी करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 18 May 2020  Marathi |
       18 मे  मराठी करेंट अफेयर्स


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स



    ISROच्या मार्गदर्शनाखाली अंतराळ तंत्रज्ञान विकास क्षेत्र खासगी उद्योगांना खुले

    आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करताना ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या अंतर्गत वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी 17 मे 2020 रोजी प्रोत्साहन निधीच्या पाचव्या आणि अंतिम भागातल्या घोषणा केल्या.
    त्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) याच्या नेतृत्वात अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात खासगी क्षेत्राला सामावून घेण्याच्या दृष्टीने अनेक सुधारणा केल्या गेल्या आहेत. यामुळे खासगी कंपन्यांना उपग्रह प्रक्षेपण आणि त्यासंबंधी कामांमध्ये समान संधी  उपलब्ध होण्यास मदत होणार. याव्यतिरिक्त, तांत्रिक उद्योजकांना रिमोट सेन्सिंग डेटा प्रदान करण्यासाठी उदार भौगोलिक धोरणाला परवानगी दिली गेली आहे.
    याच पार्श्वभूमीवर, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) देशांतर्गत स्टार्टअप उद्योगांना अंतराळवीरांकरिता अन्न आणि औषधे तसेच अंतराळयानात यंत्रांना हाताळण्यात सुलभता येण्यासाठी उत्तम साधने आणि हरित इंजिन विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे आणि त्यासंबंधी दिशानिर्देश दिले आहेत.
    या सुविधांचा भारताच्या ‘गगनयान’ या पहिल्या मानवी उड्डाण मोहिमेसाठी वापर करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यापूर्वीच संशोधन संस्था आणि शिक्षणतज्ज्ञांना या क्षेत्रात संधी देण्याची घोषणा केली गेली आहे.
    गेल्या महिन्यात, ISRO संस्थेनी खासगी उद्योगांसाठी 17 तंत्रज्ञानाची निवड केली. त्यात अन्न, औषध तसेच यानासाठी इन्फ्लॅटेबल हॅबिटेट आणि विकिरणरोधी, उष्मारोधी संरक्षणात्मक यंत्रणा व तंत्रज्ञान अश्या बाबींचा समावेश आहे.
    गगनयान मोहीम
    गगनयान मोहीम ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. गगनयान मोहीम तीन टप्प्यांची आहे. भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेची पूर्वतयारी म्हणून डिसेंबर 2020 या महिन्यात पहिली निर्मनुष्य अंतराळ मोहीम हाती घेतली जात असून तशीच दुसरी मोहीम जून 2021 या महिन्यात होणार आहे. त्यानंतर 2021 साली भारताचे अंतराळवीर ‘गगनयान’ मोहिमेतून अंतराळात पाठवले जाणार आहेत.
    भारताच्या अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यापूर्वी ‘व्योममित्र’ (व्योम म्हणजे अंतराळ) नावाने भारतात तयार करण्यात आलेल्या स्त्री अर्धयंत्रमानवास (half-humanoid) गगनयानाच्या पहिल्या निर्मनुष्य मोहिमेत अंतराळात पाठवले जाणार आहे. या अंतराळ मोहिमेत विविध घटकांचे निरीक्षण करून व्योममित्र इतरांना सतर्क करणार आहे. जीवनपूरक कृतींचे परीक्षण यात केले जाणार आहे. माणसाने अंतराळात करण्याच्या कृतींची नक्कल हा यंत्रमानव करू शकतो.


    ‘पीएम ई विद्या’: विद्यार्थ्यांना डिजीटल/ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी नवा उपक्रम

    आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करताना ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या अंतर्गत वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी 17 मे 2020 रोजी प्रोत्साहन निधीच्या अंतिम भागातल्या घोषणा केल्या.
    टाळेबंदीच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही, याची खातरजमा सरकारने केली आहे.
    • सर्व विद्यार्थ्यांना इंटरनेट उपलब्ध नाही, हे लक्षात घेत ‘स्वयम प्रभा’ DTH वाहिन्यांवरून शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रसारण सुरू करण्यात आले आहे.
    • तंत्रज्ञानाधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने ‘पीएम ई विद्या’ हा डिजीटल/ऑनलाईन शिक्षणासाठी उपयुक्त आणि विविध उपकरणांच्या माध्यमातून लाभ घेता येईल, असा कार्यक्रम तात्काळ सुरू केला जाणार आहे.
    • ‘पीएम ई विद्या’ अंतर्गत कम्युनिटी रेडियो आणि पॉडकास्टचा अधिकाधिक वापर केला जाणार आहे. दिव्यांग बालकांसाठी विशेष डिजीटल साहित्य उपलब्ध करून दिले जाणार.
    • 30 मे 2020 पर्यंत 100 अग्रणी विद्यापीठांना ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

    No comments:

    Post a Comment