Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, March 7, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 7 March 2020 Marathi | 7 मार्च 2020 मराठी करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 7 March 2020  Marathi |
       7 मार्च 2020 मराठी करेंट अफेयर्स


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स,

    फ्रीडम इन द वर्ल्ड 2020’ अहवाल; भारत जगात 83व्या क्रमांकावर

    "Freedom in the World 2020" Report;  India ranks 83rd in the world

    अमेरिकेच्या ‘फ्रिडम हाऊस’ या संस्थेकडून “फ्रीडम इन द वर्ल्ड 2020’ अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात भौगोलिकदृष्ट्या राजकीय आणि नागरी स्वातंत्र्यांच्या संदर्भात विविध देशांमधल्या स्वतंत्रतेचा आढावा दिला गेला आहे.
    स्वतंत्रतेच्या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आलेल्या 210 देशांमध्ये भारताचा 83 वा क्रमांक लागतो. भारत तिमोर-लेस्ते आणि सेनेगल या देशांसह “स्वतंत्र लोकशाही” या श्रेणीत शेवटच्या पांच क्रमांकामध्ये आहे.
    अहवलातल्या ठळक बाबी|Highlights from the report
    भारत | India
    • भारताला मिळालेले एकूण गुण 2019 सालाच्या 75 वरून 2020 साली 71 पर्यंत कमी झाले आहेत.
    • इंटरनेट स्वातंत्र्याच्या बाबतीत, भारताला 55 गुण मिळाले आणि देशाला "पार्टली फ्री" श्रेणीत वर्गीकृत केले.
    जागतिक | World

    • मूल्यांकन करण्यात आलेल्या 195 देशांपैकी 83 (43 टक्के) देश ‘फ्री’ श्रेणीत, 63 देश (32 टक्के) ‘पार्टली फ्री’ श्रेणीत, तर 49 देश (25 टक्के) ‘नॉट फ्री’ श्रेणीत समाविष्ट झाले आहेत.
    • गेल्या दशकात ‘फ्री’ श्रेणीतल्या देशांचा वाटा तीन टक्क्यांनी कमी झाला आहे, तर ‘पार्टली फ्री’ आणि ‘नॉट फ्री’ श्रेणीत देशांची टक्केवारी अनुक्रमे दोन आणि एक टक्क्यांनी वाढली आहे.
    • 'फ्री' श्रेणीत फिनलँड, नॉर्वे, स्वीडन, नेदरलँड आणि लक्झेमबर्ग ही राष्ट्रे अनुक्रमे प्रथम पाच क्रमांकावर आहेत.
    • अहवालात, ट्युनिशिया हा एकमेव असा देश आहे की ज्याने 85 राष्ट्रांच्या 'फ्री' श्रेणीत भारतापेक्षा कमी गुण मिळवले आहेत.
    • फ्रीडम हाऊसच्या मते, वर्ष 2019 हे जागतिक स्वातंत्र्यामध्ये आलेल्या घसरणीचे सलग 14 वे वर्ष होते.
    • 2019 साली 64 देशांमधल्या लोकांना त्यांचे राजकीय हक्क आणि नागरी स्वातंत्र्य हिरावण्याचा अनुभव आला, तर केवळ 37 देशांमध्ये लोकांच्या अनुभवात सुधारणा झाली.
    • जगातल्या 41 प्रस्थापित लोकशाहीपैकी 25 मध्ये इंटरनेटवरील बंदी सहन करावी लागली.

    जनऔषधी दिन 2020 |People's Medicine Day 2020

    ‘प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना’ याच्या कामगिरीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने दिनांक 7 जानेवारी 2020 रोजी भारतात ‘जनऔषधी दिन’ साजरा करण्यात आला.
    प्रधानमंत्री भारतीय जनधी परियोजना (PMBJP)
    Prime Minister of India Jan Aushadhi Project (PMBJP)
    भारत सरकारच्या औषधी (फार्मास्यूटिकल) विभागाने सुरू 
    केलेली एक मोहीम आहे. “सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण औषधे स्वस्त दरात उपलब्ध व्हावीत” या उद्देशाने 2008 साली ही योजना “जनऔषधी योजना” या नावाने सादर करण्यात आली.
    सप्टेंबर 2015 मध्ये योजनेचे रूपांतर 'प्रधानमंत्री जन औषधी योजना' म्हणून केले गेले. नोव्हेंबर 2016 मध्ये या योजनेचा विस्तार करण्यासाठी नाव पुन्हा बदलून “प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना” (PMBJP) ठेवले.
    या योजनेच्या अंतर्गत जन औषधी केंद्रांची देशभरात ठिकठिकाणी स्थापना करण्यात आली. त्या केंद्रांवर जेनेरिक औषधांची विक्री केली जाते. ही केंद्रे जेनेरिक औषधांबद्दल जागृती निर्माण करतात जी नामांकित औषधे नाहीत, मात्र तितकेच सुरक्षित आहेत. त्या नामांकित औषधांपेक्षा खूपच स्वस्त दरात उपलब्ध होतात.
    • आज भारतामध्ये 6200 हून अधिक केंद्रे आहेत. ही केंद्रे देशातल्या 700 जिल्ह्यांमध्ये आहेत, ज्यामुळे ती जगातली सर्वात मोठी किरकोळ औषधालय शृंखला ठरते.
    • 2019-20 या वर्षात या दुकानांमध्ये झालेली विक्री ही जवळपास 390 कोटी रुपये आहे आणि ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या 2200 कोटी रुपयांची बचत झाली.
    • पहिले “जनऔषधी केंद्र” 25 नोव्हेंबर 2008 रोजी अमृतसर (पंजाब) या शहरात उघडले गेले.


    No comments:

    Post a Comment