Current affairs | Evening News Marathi
Current affairs 6 March 2020 Marathi |
6 मार्च 2020 मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
भारत सरकारने ‘जीनोम इंडिया’ प्रकल्पाला मंजूरी दिली
The Government of India approved the 'Genome India' project
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या जैवतंत्रज्ञान विभागाने ‘जीनोम इंडिया प्रकल्प’ भारतात राबविण्यास त्यांची परवानगी दिली. भारतीय विज्ञान संस्था (IISc) बेंगळुरू आणि इतर 20 आघाडीच्या संस्था या प्रकल्पाचा भाग असणार आहेत.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात संदर्भ जीनोम (जनुकीय संरचना) माहिती तयार करण्यासाठी 10,000 व्यक्तींचे नमुने गोळा केले जाणार.
मानवी जनुकीय रचनेचा नकाशा बनविणे आणि गुणसूत्रांचा संपूर्ण क्रम मिळविण्यासाठी त्यांना एकत्रित करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे.
ARCI संस्थेनी आपत्कालीन परिस्थितीत वीज उपलब्धतेसाठी ‘फ्युल सेल’ तंत्रज्ञान विकसित केले
ARCI institute developed 'full cell' technology to provide electricity in case of emergency
हैदराबादच्या इंटरनॅशनल अॅडव्हान्स्ड रिसर्च फॉर पावडर मेटलर्जी अँड न्यू मटेरियल्स (ARCI) या संस्थेतल्या संशोधकांनी पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युल सेल्स (PEMFC) नावाचे ‘फ्युल सेल्स’ तंत्रज्ञान विकसित केले. हे तंत्रज्ञान 1 ते 20 किलोवॅट (kW) या दरम्यान ऊर्जा निर्माण करण्यास सक्षम आहे.
फ्युल सेल्स प्रणाली पारंपारिक बॅटरी बॅकअप प्रणालीद्वारे आवश्यकतेनुसार ग्रीड पावरची आवश्यकता न बाळगता हायड्रोजन गॅस वापरुन शाश्वत स्वच्छ वीज प्रदान करते.
No comments:
Post a Comment