Current affairs | Evening News Marathi
Current affairs 8 March 2020 Marathi |
8 मार्च 2020 मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
आंतरराष्ट्रीय महिला दिन: 8 मार्च
International Women's Day: March 8th
दरवर्षी 8 मार्च या दिवशी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन पाळला जातो. यावर्षी "आय एम जनरेशन इक्वलिटी: रीयलाइजींग विमेन्स राइट्स" या संकल्पनेखाली हा दिन पाळला गेला.
या दिनानिमित्त भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते ‘नारी शक्ती पुरस्कार 2019’ प्रदान करण्यात आले. यावर्षी 44 महिला आणि संस्थांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यासंबंधीचा इतिहास |History regarding this
आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभरातल्या अनेक देशांमध्ये पाळला जातो. राष्ट्रीय, धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा आर्थिक अश्या अनेक क्षेत्रात महिलांनी केलेल्या असामान्य कार्यांबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे उगमस्थान उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये विसाव्या शतकाच्या सुरूवातीला चालवण्यात आलेल्या कामगार चळवळीच्या उपक्रमामध्ये आढळून येते. 1911 साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये 19 मार्चला पहिला “आंतरराष्ट्रीय महिला दिन” साजरा करण्यात आला.
त्यानंतर 1975 साली संयुक्त राष्ट्रसंघाकडून ‘8 मार्च’ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून पाळण्यास सुरुवात झाली. हा महिला आणि पुरुष दरम्यान समता या तत्त्वाच्या आधारावर भर देणारा पहिला आंतरराष्ट्रीय करार होता.
ठरविण्यात आलेली ‘2030 कार्यसूची (अजेंडा)’ची प्रमुख लक्ष्ये -Major goals of the '2030 agenda' set out -
- 2030 सालापर्यंत, सर्व मुला-मुलींना मोफत, न्यायसंगत आणि गुणवत्तापूर्ण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मिळण्याची खात्री करणे.
- 2030 सालापर्यंत, सर्व मुला-मुलींच्या गुणवत्तेसाठी बाल्यावस्थेचा विकास, घ्यावयाची काळजी आणि बालवाडीमधील शिक्षण या सुविधांना प्रवेश मिळण्याची खात्री करणे, जेणेकरून ते प्राथमिक शिक्षणास तयार असतील.
- सर्वत्र सर्व महिला आणि मुलींच्या बाबतीत असलेला सर्व प्रकारचा भेदभाव समाप्त करणे.
- तस्करी आणि लैंगिक अत्याचार आणि शोषण अश्या आणि इतर प्रकारांच्या समावेशासोबतच सार्वजनिक आणि खासगी कामाच्या वातावरणात सर्व महिला आणि मुलींच्या विरुद्ध असलेली सर्व प्रकारची हिंसा दूर करणे.
- बाल, लवकर आणि सक्तीचे विवाह आणि महिला जननेंद्रियासंबंधित विकृत प्रथा अश्या सर्व हानीकारक प्रथांना बाद करणे.
1950 साली, भारत हा त्याच्या नागरिकांना सार्वत्रिक प्रौढ (स्त्री-पुरुष) मतदान मान्य करणार्या जगातल्या काही देशांपैकी एक होता.
भारत सरकारने 1999 साली ‘नारी शक्ती पुरस्कार’ देण्याचे सुरू केले. हा पुरस्कार महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणार्या महिलांना आणि संस्थांना दिला जातो. हा पुरस्कार भारत सरकारच्या केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाकडून विविध क्षेत्रात काम करणार्या महिलांना आणि संस्थांना दिला जातो. हा भारतातल्या महिलांना मिळणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment