Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, September 17, 2017

    🔹संग्रामानंतरचा मराठवाडा...

    Views

    🔹संग्रामानंतरचा मराठवाडा...


    1950 नंतर जन्माला आलेल्या नव्या पिढीला मराठवाडा मुक्तिसंग्राम म्हणजे काय?हे नव्या पिढीला‘मराठवाडा जन्मा’ची कथा सांगितली पाहिजे.....

    आज 17 सप्टेंबर...हैद्रराबाद मुक्तिदिनानिमित्त..

    ‘‘निधडी छाती नि:स्पृह बाणा
    लववी ना मान अशा आमच्या मराठवाड्याचा आम्हास अभिमान’’

    असंख्य हुमात्म्यांच्या बलिदानातून,अनेकांच्या
    त्यागातून सरसेनानी स्वामी रामानंद
    तीर्थ,माणिकचंद पहाडे,गोविंदभाई श्रॉफ,विजयेेंद्र काबरा यांसारख्या समर्थ नेत्यांच्या निकरांच्या लढ्यातून निर्माण झालेला हा एक कोटी लोकसंख्येचा मराठवाडा 17 सष्टेंबर रोजी सनई- चौघड्यांच्या मंगल निनादात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत हैद्रराबाद मुक्ती संग्राम दिन साजरा करत आहोत.

    ज्यांनी त्या काळात रझाकारांचा बेछूट
    गोळीबार अनुभवला,अनन्वित छळ सोसला,निझाम नामक कसायाने सर्व तऱ्हेची दडपशाही केलेली पाहिली त्यांनी नव्या पिढीला‘मराठवाडा जन्मा’ची कथा सांगितली पाहिजे.मराठवाड्यातील
    आबालवृद्ध निर्भयपणे या लढ्यात सामील झाले होते.रझाकाराच्या लाठ्या कमी पडल्या;पण हुतात्म्यांची वाण पडली नाही.पोलिसांच्या लाठ्या मोडल्या; पण मराठवाड्यातील माणसांचे कणे मोडले नाहीत.असा हा दिव्य लढा होता.17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबादच्या निझाम
    संस्थानाच्या तावडीतून मराठवाड्याची सुटका झाली.त्या लढ्याची नुसती आठवण झाली तर अंगावर रोमांच उभे राहतात.मात्र,दुर्दैव असे की,या लढणा-
    या सेनानींनी मराठवाडा मुक्त झाल्यानंतर सारे विसरून न लढणाऱ्या मराठी बांधवांच्या हाती सत्ता दिली.

    मराठवाड्याने या देशाला हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करणारी माणसे दिली.एवढेच नव्हे,तर मराठवाड्याच्या या कसदार भूमीने या राज्याचे,देशाचे वैचारिक नेतृत्वही केले.गोविंदभाई श्रॉफ,विजयेंद्र काबरा,रफिक झकेरिया,अनंतराव भालेराव,आ.कृ.वाघमारे,शंकरराव चव्हाण,बापूसाहेब काळदाते अशा अनेक विचारवंतांनी समाजसुधारणेच्या संदर्भात व शिक्षण क्षेत्रातील मूलभूत धोरणांविषयी विचार केला.

    मराठवाडा मुक्तिसंग्रामानंतर मराठवाड्यातील अनेक स्त्रिया शिकून
    शिक्षिका,परिचारिका,डॉक्टर,लेखिका नावारूपाल आलेल्या दिसून येतात.जागतिक मराठी साहित्य
    संमेलनाचे अध्यक्षपद डॉ.गंगाधर पानतावणे यांनी भूषवले.हैद्रराबाद
    मुक्तिसंग्रामानंतर समताधिष्ठित,मूल्याधिष्ठित समाजव्यवस्था याचा जाणीवपूर्वक स्वीकारच केला गेला नाही.समाजमनावरील पडलेल्या खुणा बुजविण्यासाठी रचनात्मक नवनिर्माणशील व तरुण पिढीने समाजविधायक कार्याला स्वत:पासून सुरुवात करणे आवश्यक आहे.तीच या हैद्रराबाद मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना खरी मानवंदना ठरेल.

    -प्रा.डॉ.मीनाक्षी देव,औरंगाबाद.


    No comments:

    Post a Comment