Current affairs | Evening News Marathi
Current affairs 5 March 2020 Marathi |
5 मार्च 2020 मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
राष्ट्रीय ललित कला पुरस्कार 2020 | National Fine Arts Awards 2020
राष्ट्रपती राम नाथ कोविंद ह्यांच्या हस्ते 4 मार्च 2020 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात 15 गुणवंत कलाकारांना 61वे ‘वार्षिक ललित कला अकादमी पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. विजेत्यांना पुरस्कारस्वरूपात थाळी, शाल आणि एक लक्ष रुपये रोख बक्षीस देण्यात आले.
पुरस्कार विजेते कलाकारांमध्ये अनुप कुमार मनझुखी गोपी, डेव्हिड मलाकार, देवेंद्र कुमार खरे, दिनेश पंड्या, फारुक अहमद हलदर, हरी राम कुंभावत, केशरी नंदन प्रसाद, मोहन कुमार टी., रतन कृष्ण सहा, सागर वसंत कांबळे, सतविंदर कौर, सुनील थिरूवायूर, तेजस्वी नारायण सोनावणे, यशपाल सिंग आणि यशवंत सिंग यांचा समावेश आहे.
या कलाकारांच्या कलाकृती 22 मार्च 2020 पर्यंत नवी दिल्लीत ललित कला अकादमीच्या कलादालनात 61 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनीत ठेवण्यात आल्या आहेत.
ललित कला अकादमी | Academy of Fine Arts
ललित कला अकादमी याची स्थापना 5 ऑगस्ट 1954 रोजी एक स्वायत्त संस्था म्हणून करण्यात आली, ज्याला 1957 साली वैधानिक दर्जा दिला गेला.
ललित कला अकादमी दरवर्षी कलेला आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कला प्रदर्शन आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करते.
नागरी उड्डयण क्षेत्रातल्या 100 टक्के थेट परकीय गुंतवणूकीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता| Union Cabinet approves 100 percent FDI in civil aviation
नागरी उड्डयण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सरकारी एअर इंडिया लिमिटेड या कंपनीच्या बाबतीत गुंतवणुकीचे धोरण बदलण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्रिमंडळाने सध्याच्या थेट परकीय गुंतवणूक (FDI) धोरणात दुरुस्ती करण्यास मान्यता दिली आहे.
ठळक बाबी
- या निर्णयामुळे एअर इंडियामध्ये अनिवासी भारतीयांना स्वयंचलित मार्गाने 100 टक्के परकीय गुंतवणूकीला परवानगी देण्यात येणार.
- एअर इंडिया लिमिटेडच्या विद्यमान धोरणानुसार, एअर इंडिया या कंपनीमध्ये 49 टक्क्यांपेक्षा जास्त परकीय गुंतवणूकीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या परवानगी नाही आणि कंपनीमध्ये पुरेसे मालकी आणि प्रभावी नियंत्रण हे भारतीय नागरिकांना असावे अशी अट आहे. अनुसूचित हवाई वाहतूक सेवा / स्थानिक अनुसूचीत प्रवासी विमान कंपनीमध्ये अनिवासी भारतीयांना स्वयंचलित मार्गाने 100 टक्के गुंतवणूक करण्यास परवानगी असली तरी एअर इंडियाच्या बाबतीत ते प्रमाण 49 टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे.
- नव्या निर्णयामुळे एअर इंडियामध्ये सरकारचा कोणताही हिस्सा नसणार आणि ती संपूर्ण खासगी मालकीची बनणार. म्हणूनच, एअर इंडियाला परदेशी गुंतवणूकीच्या मार्गाने इतर अनुसूचित विमान कंपनींच्या श्रेणीत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गुंतवणूक, उत्पन्न आणि रोजगार यांच्या विकासाला चालना देणार्या सर्वात मोठ्या परदेशी गुंतवणूकीचा मार्ग मोकळा होणार.
थेट परकीय गुंतवणूक (FDI)
थेट परकीय गुंतवणूक (FDI) हा आर्थिक विकासाचा प्रमुख वाहक आहे आणि देशाच्या आर्थिक विकासासाठी कर्जविरहीत वित्तपुरवठ्याचा स्रोत आहे. सरकारने गुंतवणूकीसाठी अनुकूल FDI धोरण तयार केले आहे ज्याच्या अंतर्गत बहुतेक भागात/ कामांमध्ये स्वयंचलित मार्गाने 100 टक्क्यांपर्यंत FDI ला परवानगी देण्यात आली आहे.
2017-18 या वर्षात भारतात थेट परदेशी गुंतवणूक 60.97 अब्ज डॉलर एवढी झाली होती.
No comments:
Post a Comment