Current affairs | Evening News Marathi
Current affairs 4 March 2020 Marathi |
4 मार्च 2020 मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
मध्यप्रदेशाचे राष्ट्रीय चंबळ अभयारण्य ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून घोषित
राष्ट्रीय चंबळ अभयारण्य, जे मध्यप्रदेशात आहे, त्याला भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून जाहीर केले. अधिसूचनेनुसार, अभयारण्याच्या सभोवताल असलेला शून्य ते दोन किलोमीटरपर्यंत पसरलेले क्षेत्र ‘इको-सेन्सेटिव्ह झोन’ असणार.
मध्यप्रदेश राज्य सरकार क्षेत्राच्या संवर्धनासाठी एक योजना तयार करणार. पर्यावरण मंत्रालयाने राज्य सरकारला भूजल व्यवस्थापन व जलसंधारणाच्या संवर्धनासाठी योजना तयार करण्याचे निर्देश दिले आहे.
अभयारण्याविषयी
राष्ट्रीय चंबळ अभयारण्य मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सीमेवर आहे. या अभयारण्यात स्थलांतरित पक्ष्यांच्या 180 प्रजाती आणि गोड्या पाण्याच्या कासवांच्या नऊ प्रजाती आढळतात. अभयारण्य चंबळ नदीलगत विंध्य पर्वतरांगपासून सुरू होते आणि यमुना नदीवर समाप्त होते. अभयारण्य 435 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात पसरलेले आहे आणि हे मध्यप्रदेशातल्या भिंड, मोरेना आणि शेओपूर जिल्ह्यात आहे.
राष्ट्रीय चंबळ अभयारण्य हे गंगेटिक डॉल्फिन आणि देशातल्या 75 टक्के घडियाल या मगरीच्या जातीचे घर आहे.
कुपोषणमुक्त भारत तयार करण्याच्या उद्देशाने “सुपोषित माँ अभियान”
भारतात कुपोषण निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत सरकारच्या महिला व कुटुंब कल्याण मंत्रालयाने “सुपोषित माँ अभियान” राबविण्यास सुरुवात केली. लोकसभा सभापती ओम बिर्ला ह्यांच्या हस्ते या राष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्घाटन राजस्थानच्या कोटा या शहरात करण्यात आले.
या मोहिमेद्वारे किशोरवयीन मुली आणि देशातल्या गर्भवती महिलांना पोषक आहार प्राप्त व्हावा हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भावी पिढ्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या बळकट ठेवण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे.
योजनेचे स्वरूप
- कार्यक्रमाच्या प्रारंभीक टप्प्यात 1 महिना आणि 12 दिवस या कालावधीत 1000 गर्भवती महिलांना संतुलित आहार दिला जाणार आणि आवश्यक चाचण्या, अल्ट्रासाऊंड, रक्त तपासणी यासारख्या सर्व वैद्यकीय खर्चाचा भार सरकार उचलणार आहे.
- गहू, हरभरा, मका, बाजरीचे पीठ, गूळ, डाळी, मसूर, तूप, शेंगदाणे, तांदूळ आणि खजूर इ. पौष्टिक वस्तू प्रत्येक कुटुंबातल्या एका गर्भवती महिलेस देण्यात येणार.
- उद्घाटनाला 1000 गर्भवती महिलांना संतुलित आहार असलेल्या 17 किलोग्राम इतक्या वजनाच्या अन्न पदार्थांचे 1000 संच वितरित करण्यात आले.
अर्मेनियाचा भारतासोबत 40 दशलक्ष डॉलरचा संरक्षण करार झाला
युरोपमधल्या अर्मेनिया या देशाने शस्त्रास्त्रे शोधणारे रडार याचे चार संच पुरवण्यासाठी भारताची निवड केली आहे. हा 40 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा संरक्षण करार आहे.
या करारानुसार भारत देशातच तयार करण्यात आलेले 4 ‘SWATHI’ रडार अर्मेनियाला पुरवेल.
‘SWATHI’ रडार संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) यांनी विकसित केले असून भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) निर्मित आहे. हे रडार त्याच्या 50 किलोमीटरच्या क्षेत्रात शत्रुची शस्त्रास्त्रे शोधण्यास सक्षम आहे.
अर्मेनिया हा पश्चिम आशिया आणि युरोपच्या काकेशस क्षेत्रात वसलेला एक पर्वतीय देश आहे. देशाची राजधानी येरेवन हे शहर आहे आणि द्राम हे राष्ट्रीय चलन आहे.
No comments:
Post a Comment