Current affairs | Evening News Marathi
Current affairs 3 March 2020 Marathi |
3 मार्च 2020 मराठी करेंट अफेयर्स
दिल्लीत 11 वी ‘राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र (KVK) परिषद’ संपन्न झाली
The 11th 'National Agricultural Science Center (KVK) Conference' was held in Delhi
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास व पंचायती राज मंत्री नरेंद्र सिंग तोमार ह्यांच्या हस्ते दि. 28 फेब्रुवारी 2020 रोजी 11 व्या ‘राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र (KVK) परिषद’ या कार्यक्रमाचे उद्घाटन दिल्लीत झाले.कृषी क्षेत्रातले KVKचे योगदान
- कृषी क्षेत्रात संशोधन व विकास करण्यात कृषी विज्ञान केंद्राचा मोठा हातखंडा आहे. आतापर्यंत पिकांचे अनेक उत्तम वाण विकसित करण्यात आले आहेत. शिवाय मार्गदर्शनासाठी 171 मोबाइल अॅप तयार करण्यात आले आणि 3 लक्षाहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटर उघडण्यात आले आहेत.
- शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी ‘eNAM’ ही डिजिटल व्यासपीठ तयार करण्यात आले. आज यावर 585 मंडई उपलब्ध आहेत आणि आणखी 415 मंडई उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहेत.
- प्रत्येक विभागामध्ये किमान दोन फॉर्मर्स प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन (FPO) स्थापन करण्याचे केंद्र सरकारचे उद्दीष्ट आहे.
अर्मेनियाचा भारतासोबत 40 दशलक्ष डॉलरचा संरक्षण करार झाला
Armenia has a $ 40 million defense pact with India
युरोपमधल्या अर्मेनिया या देशाने शस्त्रास्त्रे शोधणारे रडार याचे चार संच पुरवण्यासाठी भारताची निवड केली आहे. हा 40 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा संरक्षण करार आहे.
या करारानुसार भारत देशातच तयार करण्यात आलेले 4 ‘SWATHI’ रडार अर्मेनियाला पुरवेल.
‘SWATHI’ रडार संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) यांनी विकसित केले असून भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) निर्मित आहे. हे रडार त्याच्या 50 किलोमीटरच्या क्षेत्रात शत्रुची शस्त्रास्त्रे शोधण्यास सक्षम आहे.
अर्मेनिया हा पश्चिम आशिया आणि युरोपच्या काकेशस क्षेत्रात वसलेला एक पर्वतीय देश आहे. देशाची राजधानी येरेवन हे शहर आहे आणि द्राम हे राष्ट्रीय चलन आहे.
No comments:
Post a Comment