Current affairs | Evening News Marathi
Current affairs 2 March 2020 Marathi |
2 मार्च 2020 मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स“RaIDer-X”: DRDO आणि IISc बंगळुरू यांनी तयार केलेले नवे स्फोटक शोधन यंत्र | “RaIDer-X”: a new explosive detection device created by DRDO and IISc Bangalore
पुणे (महाराष्ट्र) या शहरात झालेल्या राष्ट्रीय स्फोटक शोधन कार्यशाळेत “RaIDer-X” नावाचे एक नवीन स्फोटक शोधन यंत्र सादर करण्यात आले. हे यंत्र दूर अंतरावरून देखील स्फोटके शोधू शकते.
शुद्ध स्वरुपातली तसेच मिश्रण असलेली रसायने वापरून बनवलेल्या स्फोटकांबद्दल या यंत्राच्या माहितीकोषात माहिती भरल्यास तशी अनेक प्रकारची स्फोटके हे यंत्र शोधू शकते. आवरणाखाली असलेली स्फोटके शोधण्यातही हे यंत्र सक्षम आहे.
पुण्याची संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) यांची उच्च ऊर्जा सामुग्री संशोधन प्रयोगशाळा आणि बंगळुरूची भारतीय विज्ञान संस्था यांनी संयुक्तपणे हे यंत्र विकसित केले आहे.
संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)
या संस्थेची स्थापना 1958 साली झाली. पंतप्रधानांच्या शास्त्रीय सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था राष्ट्रीय सुरक्षेसाठी लागणार्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि उपकरणांचा विकास करणे, संशोधन करणे, संशोधन कार्यक्रम राबवणे इ. कार्य करते. उड्डयण शास्त्र, अग्निबाण व क्षेपणास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, वाहन, अभियांत्रीकी यंत्रणा इत्यादी क्षेत्रात काम करते. संस्थेमध्ये 52 प्रगत प्रयोगशाळा आहेत.
बंगळुरूमध्ये 19 वी ‘जागतिक उत्पादकता परिषद’ भरणार | 19th 'World Productivity Conference' to be organized in Bengaluru
6 मे ते 8 मे 2020 या कालावधीत बंगळुरू (कर्नाटक) या शहरात 19 वी ‘जागतिक उत्पादकता परिषद’ आयोजित केली जाणार आहे. हा कार्यक्रम जागतिक उत्पादकता विज्ञान महासंघ (WCPS) यांच्या नेतृत्वाखाली "इंडस्ट्री 4.0 - इनोव्हेशन अँड प्रोडक्टिव्हिटी" या विषयाखाली आयोजित केला जाणार आहे.
उत्पादन क्षमतेच्या विकासासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही जगातले सर्वात मोठे मंच आहे. तब्बल 45 वर्षांनंतर पुन्हा एकदा ही परिषद भारतात होणार आहे. यावर्षी चर्चेत चौथ्या औद्योगिक क्रांतीवर भर दिला जाणार आहे.
जागतिक उत्पादकता विज्ञान महासंघ (WCPS) 1969 सालापासून हा कार्यक्रम आयोजित करीत आहे. त्याचे मुख्यालय मॉन्ट्रियल (कॅनडा) येथे आहे. नावीन्यपूर्ण आणि जागतिक पातळीवरील पद्धतींवर विचारपूर्वक चर्चा करण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्त्वाचा व्यासपीठ आहे. या कार्यक्रमात उद्योगपती, विद्वान, प्रशासक तसेच उद्योग, वाणिज्य आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातले कार्यकर्ते एकत्र येतात.
‘इंडस्ट्री 4.0’ म्हणजे काय?
‘इंडस्ट्री 4.0’ हा चौथ्या औद्योगिक क्रांतीचा उपसंच आहे जो उद्योगाशी निगडीत आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये मानवाने तयार केलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर निर्मिती, सेवा, कृषी अश्या प्रमुख क्षेत्रांमध्ये दैनंदिन वापरासाठी केला जाणार आहे. ‘स्मार्ट शहर’ उपक्रम हा याच संकल्पनेचा एक भाग आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे, ज्यामार्फत मानवाच्या जागी यंत्रांची बसवणी केली जाणार. सगळ्या प्रक्रिया या संगणकाच्या माध्यमातून नियंत्रित होणार.
यासंबंधीची संकल्पना 2011 साली जर्मनीने एका प्रकल्पाच्या माध्यमातून जगापुढे मांडली. पुढे 2012 साली त्याच्या अंमलबजावणीबाबत काही शिफारसी देण्यात आल्या.
No comments:
Post a Comment