Current affairs | Evening News Marathi
Current affairs 1 March 2020 Marathi |
1 मार्च 2020 मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
जादव पायेंग यांना ‘स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार’ जाहीर
‘माय होम इंडिया’ या संस्थेच्या वतीने यावर्षीच्या ‘स्वामी विवेकानंद कर्मयोगी’ पुरस्कारासाठी जादव पायेंग यांची निवड करण्यात आली आहे. मानवनिर्मित जंगल तयार करण्याच्या त्यांच्या सतत प्रयत्नांसाठी जादव पायेंग यांना सहावा कर्मयोगी पुरस्कार दिला जात आहे.
पायेंग यांना हा पुरस्कार 29 फेब्रुवारी 2020 रोजी नवी दिल्लीत एका सोहळ्यात दिला जाणार आहे.
जादव पायेंग (द फॉरेस्ट मॅन)
जादव पायेंग हे भारतातले फॉरेस्ट मॅन म्हणून लोकप्रिय आहेत. ते एक पर्यावरणवादी आणि वन कामगार आहे. ते आसाम राज्याच्या जोरहाट गावाचे रहिवासी आहेत. गेल्या 30 वर्षांपासून त्यांनी वाळवंटीकरणाला आळा घालण्यासाठी ब्रह्मपुत्र नदीच्या लगत एकट्यानेच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करीत आहेत. त्यांच्या त्या प्रयत्नातून मिळालेले फलित म्हणजे आज तिथली भूमी वन आच्छादित असून ते अनेक नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वन्य प्राण्यांचे घर आहे.
1 मे पर्यंत महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त होणार: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
1 मे 2020 पर्यंत महाराष्ट्राला एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टीकच्या वापरापासून परावृत्त करण्याचे लक्ष महाराष्ट्र राज्य सरकारने निश्चित केले आहे. याविषयीची घोषणा पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.
येत्या 1 मे 2020 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्ष पूर्ण होणार आहेत. याच पार्श्वभुमीवर राज्याला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. शहरांसह ग्रामीण भागांमध्ये देखील यावर भर देण्यात येणार आहे. प्लास्टीक ऐवजी विघटन होणारी आवरणे, कापडी थैली, लाकडी वस्तू अश्या पर्यायी वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे.
1 मार्च 2020 पासून मुंबईत प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने यासाठी कर्मचाऱ्यांची विशेष पथके नेमली असून कोणीही बंदी योग्य प्लास्टिकचा वापर करताना आढळल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार यापूर्वीच संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) वर बंदी घातलेली आहे. त्यामधून प्लास्टिकची पिशवी, ताट, वाटी, चमचे, वेष्टण, पाणी पाऊच, इत्यादी वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment