Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, March 17, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 17 March 2020 Marathi | 17 मार्च 2020 मराठी करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 17 March 2020  Marathi |
       17 मार्च 2020 मराठी करेंट अफेयर्स


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स

    ICMR संस्थेनी ‘कोरोनाची चाचणी केंद्रे’ न वाढविण्याचा निर्णय घेतला | ICMR organization decided not to expand 'corona test centers'

    देशातल्या लोकसंख्येचा आकार पाहता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी (ICMR) नव्या कोरोना विषाणूच्या चाचण्यांचा विस्तार न करण्याचा निर्णय घेतला आहे.
    त्याऐवजी, समुदायातल्या लोकांमधून काही नमुने घेऊन लोकांवर नजर ठेवून विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. ज्या रुग्णांचा प्रवासाचा इतिहास नाही किंवा वास्तविक प्रकरणांशी संपर्क साधला गेला नाही त्यांची चाचणी करणे व्यर्थ ठरणार आहे.
    योजनेनुसार, ICMRच्या इंटेग्रेटेड डिसीज सर्वीलन्स प्रोग्राम लॅब’ या प्रयोगशाळांमध्ये दर आठवड्याला यादृच्छिकपणे 10 नमुने तपासले जाणार आहे.
    सरकारकडे सध्या दररोज 6000 चाचण्या करण्याची क्षमता असून ते 1.5 लक्ष टेस्टिंग किट मागविलेल्या आहेत तसेच आणखी दशलक्ष किट पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
    भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)
    भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) याची स्थापना 1911 साली करण्यात आली, जी जगातल्या सर्वात जुन्या वैद्यकीय संशोधन संस्थांपैकी एक आहे. त्याचे नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे. ही संस्था जागेवरच निदान, उपचार प्रक्रिया आणि पद्धती अश्या विविध वैद्यकीय पैलूंवर शोधकार्य चालवीत आहे.

    पंतप्रधानांनी SAARC नेत्यांशी संवाद साधला | The Prime Minister interacted with SAARC leaders

    दक्षिण आशियाई क्षेत्रात कोविड-19 विषाणूचा सामना करण्यासंबंधी उपाययोजना करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 मार्च 2020 रोजी SAARC नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.
    संवादादरम्यानच्या ठळक बाबी | Highlights from the dialogue
    • सहकार्याच्या भावनेनी पंतप्रधान मोदींनी सर्व देशांच्या ऐच्छिक योगदानावर आधारित ‘COVID-19 आपत्कालीन निधी’ निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडला.
    • या निधीसाठी भारताकडून 10 दशलक्ष डॉलर एवढ्या निधीसह प्रारंभिक योगदानाची घोषणा केली. हा निधी कोणत्याही भागीदार देशांद्वारे त्वरित कारवाईच्या खर्चासाठी वापरता येणार.
    • आवश्यकता भासल्यास देशांना चाचणी उपकरणे आणि इतर उपकरणेही भारताकडून उपलब्ध करून दिली जाणार.
    • पंतप्रधानांनी शेजारच्या देशांच्या आपत्कालीन प्रतिसाद दलांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण व्यवस्था करण्याची आणि संभाव्य विषाणू वाहक आणि त्यांच्याशी संपर्क आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी भारताच्या एकात्मिक रोग देखरेख पोर्टलवरील सॉफ्टवेअर सामायिक करण्याचीही तयारी दर्शवली.
    • दक्षिण आशियाई प्रदेशात साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संशोधनासाठी समन्वय साधण्यासाठी एक सामायिक संशोधन मंच तयार करण्याची शिफारस त्यांनी केली. COVID-19च्या दीर्घकालीन आर्थिक परिणामांवर आणि अंतर्गत व्यापार आणि स्थानिक मूल्याच्या साखळ्यांना त्याच्या प्रभावापासून कसे सुरक्षित ठेवावे याबद्दल तज्ञांनी आणखी मंथन करावे अशी सूचना त्यांनी केली.
    SAARC विषयी | SAARC Related
    दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकारी संघ (SAARC) ही एक प्रादेशिक आंतरशासकीय संघटना आहे आणि दक्षिण आशियातल्या देशांची भौगोलिक संघटना आहे, ज्याची अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूटान, भारत, नेपाळ, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका हे सदस्य राज्ये असून याची 8 डिसेंबर 1985 रोजी ढाकामध्ये स्थापना करण्यात आली. याचे काठमांडू (नेपाळ) येथे मुख्यालय आहे.


    No comments:

    Post a Comment