Current affairs | Evening News Marathi
Current affairs 29 March 2020 Marathi |
29 मार्च 2020 मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
भारत सरकारचा नवा 'आपत्कालीन परिस्थितीत नागरिक सहाय्य व मदत विषयक प्रधानमंत्री निधी'
Government of India's new 'Prime Minister's Fund on Citizen Assistance and Assistance in case of emergency'
कोविड-19 महामारीमुळे देशासमोर आरोग्य आणि आर्थिक समस्या निर्माण होत आहेत. त्यासाठी 'आपत्कालीन परिस्थितीत नागरिक सहाय्य व मदत विषयक प्रधानमंत्री निधी' (Prime Minister’s Citizen Assistance and Relief in Emergency Situations Fund / PM CARES Fund) या शीर्षकाखाली एक सार्वजनिक धर्मार्थ विश्वस्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. पंतप्रधान या विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष आहेत. इतर सदस्यांमध्ये संरक्षणमंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्री यांचा समावेश आहे.
या निधीमध्ये अगदी छोट्या रकमेची देणगी देखील देता येणार जेणेकरून जास्तीत जास्त लोक आपले योगदान देऊ शकणार. निधीमध्ये दिलेल्या देणगीला ‘कलम 80 (G)’ अंतर्गत प्राप्तिकरातून सूट देण्यात येणार.
नवी दिल्लीच्या AIIMS येथे 'कोविड-19 राष्ट्रीय सल्लामसलत केंद्र’ (CoNTeC) उघडले
The Covid-19 National Counseling Center (CoNTeC) opened at AIIMS in New Delhi
28 मार्च 2020 रोजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या हस्ते नवी दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (AIIMS) रुग्णालयात 'कोविड-19 राष्ट्रीय सल्लामसलत केंद्र’ (COVID-19 National Teleconsultation Centre / CoNTeC) या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संकल्पनेनुसार हे केंद्र तयार करण्यात आले आहे. या सेवेची अंमलबजावणी दिल्लीच्या AIIMS संस्थेद्वारे केली जात आहे.
देशभरातल्या सर्व चिकित्सकांना थेट वेळेत AIIMSच्या चिकित्सकांशी सल्लामसलत करता यावी आणि कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करता यावेत, यासाठी हे राष्ट्रीय केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून देशभरातल्या नागरिकांना 24 तास सल्ला आणि मार्गदर्शन मिळू शकणार आहे.
No comments:
Post a Comment