Current affairs | Evening News Marathi
Current affairs 16 March 2020 Marathi |
16 मार्च 2020 मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
RBIने शहरी सहकारी बँकांसाठीच्या एक्सपोजर मर्यादेत कपात केली | RBI cuts exposure limits for urban co-operative banks
भारतीय रिझर्व्ह बँकेनी टियर-1 भांडवलाच्या एकट्या कर्जदाराच्या आणि कर्जदारांच्या गटासाठी शहरी सहकारी बँकांसाठी एक्सपोजर मर्यादा अनुक्रमे 15 टक्के आणि 25 टक्क्यांपर्यंत खाली आणली.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पूर्वीच्या परवानगीप्रमाणे असलेली मर्यादा ही एकट्या कर्जदारांसाठी टियर-1 आणि टियर-2 भांडवलासह बँकेच्या भांडवलाच्या 15 टक्के आणि कर्जदारांच्या गटासाठी 40 टक्के मान्य आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेनी प्राधान्य असलेल्या क्षेत्रासाठीचे कर्जाचे लक्ष्य देखील सुधारित केले गेले, जे ऑफ-बॅलन्स शीट एक्सपोजरच्या समायोजित निव्वळ बँक पत किंवा पत समतुल्य रकमेच्या 40 टक्क्यांवरून 75 टक्के केले.
सुधारित मर्यादेच्या अंमलबजावणीसाठी UCB बँकांना 31 मार्च 2023 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) | Reserve Bank of India (RBI)
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातली केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते. ‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 1 जानेवारी 1949 रोजी RBIचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. RBIचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) या शहरात आहे.
RBIच्या मुख्यालयी एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार उप गव्हर्नर नियुक्त केले जातात. सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते. सर सी. डी. देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.
No comments:
Post a Comment