Current affairs | Evening News Marathi
Current affairs 14 March 2020 Marathi |
14 मार्च 2020 मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
“निर्यात वस्तूंवरील शुल्क किंवा कर माफी (RoDTEP)” योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Union Cabinet approves "Export Goods Charges or Tax Waiver" (RoDTEP) Scheme
13 मार्च 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वित्तीय व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत “निर्यात वस्तूंवरील शुल्क किंवा कर माफी (RoDTEP)” या नव्या योजनेला मंजुरी देण्यात आली.
योजनेच्या अंतर्गत भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या उत्पादनांवर कर आणि शुल्कमाफी दिली जाणार आहे. त्यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर एक वेगळी यंत्रणा उभी केली जाणार. निर्यातीसाठीच बनवल्या जाणाऱ्या ज्या उत्पादनांच्या कराचे परतावे मिळण्यासाठी सध्या कोणतीही यंत्रणा नाही, त्यांच्यासाठी नवी यंत्रणा काम करणार.
या योजनेच्या अंतर्गत, आंतर-मंत्रालयीन समिती तयार केली जाणार आहे. ज्या उत्पादनांवरचे निर्यात शुल्क/कर भरपाईच्या स्वरूपात माफ करायचा आहे, त्याचे दर आणि शुल्क निश्चित करण्याचे काम ही समिती करणार. संपूर्ण डिजिटलीकरणाच्या माध्यमातून ही योजना राबवली जाईल.
चार राज्यांमधल्या 780 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांच्या पुनर्वसनाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Union Cabinet approves rehabilitation of 780-km national highways in four states
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि आंध्रप्रदेश या चार राज्यांमध्ये असलेल्या एकूण 780 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा सुधारण्यास आणि पुनर्वसनास मंजुरी दिली. प्रस्तावानुसार, दुपदरी तसेच चौपदरी रस्त्यांच्या पुनर्वसन आणि दर्जा सुधारण्यासाठी ही मंजुरी देण्यात आली आहे.
या प्रकल्पामध्ये 7762.45 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून त्यामध्ये 3500 कोटी रुपयांच्या कर्जाचा अंतर्भाव आहे. राष्ट्रीय हरित महामार्ग मार्गिका प्रकल्प (National Highway Corridor Project -GNHCP) याच्या अंतर्गत जागतिक बँकेकडून या प्रकल्पासाठी मदत घेण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment