Current affairs | Evening News Marathi
Current affairs 13 March 2020 Marathi |
13 मार्च 2020 मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव मिळणार
Mumbai Central Railway Station will get the name of Nana Shankar Sheth
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात येणार असून स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
नाना शंकरशेठ कोण होते?
नाना शंकरशेठ हे भारतातली पहिली रेल्वे कंपनी ‘ग्रेट ईस्टर्न रेल्वे’ याचे पहिले संचालक होते. त्यामुळे त्यांना ‘भारतीय रेल्वेचे पितामह’ असेही म्हटले जाते. मुंबई ते ठाणेदरम्यान धावलेल्या पहिल्या लोकलसाठी नाना शंकरशेट यांनी शेकडो हेक्टर जमीन दान केली होती. त्याबदल्यात त्यांनी कोणताही मोबदला घेतला नव्हता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या 150 व्या पुण्यतिथीनिमित्त स्थानकाला त्यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली.
नाना शंकरशेठ व्यवसायाने एक व्यापारी होते. त्यांनी सती प्रथा बंदीच्या कायद्यालाही पाठिंबा दिला होता. तसेच 1848 साली त्यांनी मुलींसाठी शाळा सुरु केली होती.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक
मुंबई सेंट्रल हे पश्चिम मार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे, जे महाराष्ट्रातल्या मुंबई या शहरात आहे. ब्रिटीश वास्तुकार क्लेड बॅटले यांनी स्थानकाच्या मुख्य इमारतीची रचना केली होती. 18 डिसेंबर 1930 रोजी ही स्थानक लोकांसाठी उघडले गेले.
‘महामारी कायदा-1897’ लागू करण्याविषयी राज्यांना सूचना
Instructions to States on Implementation of 'Epidemic Act-1897'
COVID-19 विषाणूचा प्रसार थांबावा यासाठी उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना ‘महामारी कायदा-1897’ याच्या कलम 2 मधील तरतुदींना लागू करण्याविषयी सूचना केली आहे.
या तरतुदींमुळे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय किंवा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकार यांच्याकडून वेळोवेळी येणाऱ्या सर्व सुचनांची सक्तीने अंमलबजावणी करण्यात येते. तसेच धोकादायक साथीच्या रोगांच्या विरूद्ध विशेष उपाययोजना करण्याचे आणि नियम आखण्याची शक्ती प्रदान करते. यामुळे लोकांच्या हितासाठी सरकारला रोगाचा प्रसार रोखण्यासाठी कोणत्याही आवश्यक (सक्तीच्या) पद्धतीचा अवलंब करण्यास ताकद मिळते.
या तरतुदींमुळे रेल्वेने किंवा इतर मार्गाने प्रवास करणाऱ्या कोणत्याही व्यक्तींची तपासणी करण्याचे अधिकार तसेच संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तीला लोकांपासून वेगळे करणे, रुग्णालयात, तात्पुरत्या निवासस्थानात स्थलांतरित करणे अश्या सक्तीच्या उपाययोजना करण्याचे अधिकार देखील सरकारला देते.
पार्श्वभूमी
11 मार्च 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेनी COVID-19 विषाणू ‘महामारी’ म्हणून घोषित केले. आतापर्यंत भारतातल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनी 70 हा आकडा पार केला आहे. तर जगभरात याचे 1 लक्षाहून अधिक रुग्ण आढळले आहेत.
‘महामारी रोग कायदा-1897’ पहिल्यांदा पूर्वीच्या बॉम्बे राज्यात ब्यूबोनिक प्लेगच्या वेळी लागू करण्यात आला होता.
No comments:
Post a Comment