Current affairs | Evening News Marathi
Current affairs 11 March 2020 Marathi |
11 मार्च 2020 मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
कोरोना विषाणूमुळे जागतिक FDI यामध्ये 5-15 टक्क्यांची घट होऊ शकते: UNCTAD
Corona virus can reduce global FDI by 5-15 percent: UNCTAD
8 मार्च 2020 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषदेकडून (UNCTAD) “इन्व्हेस्टमेंट ट्रेंड मॉनिटर: इमपॅकट् ऑफ द कोरोनाव्हायरस आउटब्रेक ऑन ग्लोबल FDI” या शीर्षकाखाली एक अहवाल प्रकाशित करण्यात आला. UNCTADचे सरचिटणीस मुखीसा किटूयी ह्यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला.
अहवालानुसार,
- कोरोना विषाणूमुळे जागतिक थेट परकीय गुंतवणूकीमध्ये (FDI) 5 ते 15 टक्क्यांची घट होऊ शकते.
- हा आर्थिक परिणाम असमान असणार. जागतिक उत्पादन केंद्रे आणि पुरवठा साखळीतले प्रमुख देश असणाऱ्या चीन, कोरिया आणि जापान तसेच आग्नेय आशियाई अर्थव्यवस्थानांवर सर्वाधिक नकारात्मक प्रभाव पडणार आहे.
- UNCTAD संस्थेनी यापूर्वी 2020-21 या आर्थिक वर्षासाठी जागतिक FDI प्रवाह स्थिर राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र आता हा इशारा देण्यात आला आहे की, 2008-2009 या वर्षात आलेल्या आर्थिक संकटानंतर पुन्हा एकदा जगाला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.
- गुंतवणूकीवर होणारा नकारात्मक परिणाम हा वाहन निर्मिती, हवाई सेवा आणि ऊर्जा उद्योगांमध्ये सर्वाधिक तीव्र असणार.
UNCTAD बाबत
संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) याची स्थापना 30 डिसेंबर 1964 रोजी झाली. त्याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे. संघटनेला 16 एप्रिल 1985 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेनी स्वीकारले आणि 22 डिसेंबर 2015 रोजी त्याला सुधारित केले गेले.
ही संघटना व्यापार, गुंतवणूक आणि विकास मुद्दे संबंधित क्षेत्रातली एक प्रमुख म्हणून कार्य करते. सध्या, 194 राज्ये आणि देश UNCTAD चे सदस्य आहेत.
छतावरील सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात गुजरात अग्रेसर
Gujarat to set up rooftop solar power project
अक्षय ऊर्जा निर्मितीचे उद्दीष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने, छतावरील सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात गुजरात राज्य देशात अग्रेसर ठरला आहे. राज्यात 2 मार्च 2020 पर्यंत अश्या सुमारे 50,915 सौर यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा द्वितीय क्रमांक लागतो. महाराष्ट्रात 5,513 प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
2 मार्च 2020 पर्यंत देशभरात प्रस्थापित करण्यात आलेल्या 79,950 छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांपैकी गुजरातमध्ये 64 टक्के किंवा दोन तृतीयांश प्रकल्प आहेत. यासह राज्यातल्या सौरऊर्जा क्षमतेमध्ये वाढ होऊन ती 177.67 मेगावॅट इतकी झाली. देशभरात प्रस्थापित सर्व प्रकल्पांची एकत्रित क्षमता 322 मेगावॅट इतकी आहे.
गुजरात सरकारची “सूर्य गुजरात” योजना
वर्ष 2022 पर्यंत सुमारे आठ लक्ष वीज ग्राहकांना लाभ देण्याच्या उद्देशाने गुजरात राज्य सरकारने “सूर्य गुजरात” नावाची छतावरील सौरऊर्जा योजना स्वीकारली. राज्य सरकारने या योजनेसाठी 912 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. योजनेनुसार, अश्या प्रकाल्पापासून मिळणारी वीज घरासाठी वापरली जाते आणि अतिरिक्त ऊर्जा प्रति युनिट 2.25 रुपये या दराने राज्य खरेदी करते.
तसेच 3 किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पासाठी स्थानिक वापरकर्त्यांसाठी प्रकल्पांच्या किंमतीवर 40 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले गेले, तर 3 ते 10 किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ते अनुदान 20 टक्के केली गेले.
No comments:
Post a Comment