Current affairs | Evening News Marathi
Current affairs 10 March 2020 Marathi |
10 मार्च 2020 मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
‘लाल पांडा’ या प्राण्याच्या शिकारीमध्ये घट झाली: TRAFFIC अहवाल
‘ट्रेड रेकॉर्ड अनॅलिसिस ऑफ फ्लोरा अँड फौना इन कॉमर्स’ (TRAFFIC) या संस्थेनी ‘अॅसेसमेंट ऑफ इल्लीगल – ट्रेड थ्रेट्स टू रेड पांडा इन इंडिया अँड सिलेक्टेड नेबरिंग रेंज कंट्रीज' या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला.
या अहवालानुसार, भारतात आढळणाऱ्या ‘लाल पांडा’ या पशूप्रजातीच्या शिकारीमध्ये घट झाली असली तरीही ही प्रजाती नामशेष होण्याचा धोका आहे. लाल पांडाची मागणी कमी झाल्यामुळे घट झाली असली तरीही ते इतर प्राण्यांसाठी ठेवलेल्या जाळ्यात अडकतात.
लाल पांडा हा प्राणी बांबू, पक्षी, कीटक आणि अंडी यावर जगणारा, झाडावर राहणार एक सस्तन प्राणी आहे. भारतात हा प्राणी सिक्कीम (राज्य प्राणी), मेघालय, अरुणाचल प्रदेश (सर्वाधिक संख्या) आणि पश्चिम बंगालमध्ये आढळतो.
COVID-19 विषाणू: अरुणाचल प्रदेशामध्ये परदेशी पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी
राज्यात नव्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अरुणाचल प्रदेश सरकारने परदेशी पर्यटकांना दिला जाणारा प्रोटेक्टेड एरिया परमिट (PAP) तात्पुरता रद्द केला असून परदेशी पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली.
चीनमध्ये उगम असलेला नवा कोरोना विषाणू भारतासह 97 देशांमध्ये पसरला आहे. त्याचा संसर्ग 1 लक्षाहून अधिक लोकांना झाला असून आतापर्यंत 3,500 लोक मृत्युमुखी पडल्याची वार्ता आहे आणि हा आकडा वाढत आहे.
No comments:
Post a Comment