Current affairs | Evening News Marathi
Current affairs 9 March 2020 Marathi |
9 मार्च 2020 मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
आयुष मंत्रालयाचा ‘आयुष ग्रिड’ प्रकल्प
AYUSH GRID project of Ministry of AYUSH
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने "आयुष ग्रिड" नावाचा देशव्यापी डिजिटल व्यासपीठ उभारण्यासाठी पावले उचलली आहेत, ज्याचा उद्देश रुग्णालये आणि प्रयोगशाळांसह आयुष (आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा रिग्पा आणि होमिओपॅथी - AYUSH) सुविधा उपलब्ध करून देणे आणि आरोग्य सेवांच्या पारंपारिक यंत्रणेला चालना देणे हा आहे.
वर्तमानात, मंत्रालयाने आयुष हॉस्पिटल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टम (A-HMIS), टेली-मेडिसिन, योगालोकेटर अॅप्लिकेशन, भुवन अॅप्लिकेशन, योग पोर्टल, केस रेजिस्ट्री पोर्टल इत्यादी प्रायोगिक प्रकल्प सुरू केले आहेत आणि पुढे आयुष ग्रिड प्रकल्पात या प्रकल्पांचा समावेश केला जाणार आहे.
वर्ष 2023-24 पर्यंत आयुष मंत्रालयाने देशभरात 12,500 आयुष आरोग्य व निरोगी केंद्रे (AYUSH HWC) उभारण्याचा प्रस्ताव देखील ठेवला आहे. या योजनेसाठी पाच वर्षांच्या कालावधीत प्रस्तावित एकूण आर्थिक खर्च 3399.35 कोटी रुपये इतका येण्याचे अपेक्षित आहे.
बांग्लादेशातली “BRAC” ही जगातलीअग्रगण्य NGO संस्था
"BRAC", the leading NGO organization in the world in Bangladesh
जिनेव्हा शहरातल्या ‘अॅडव्हायझर’ या अशासकीय संस्थेनी वर्ष 2020 साठी जागतिक पातळीवर कार्य करणाऱ्या नामांकित ठरणाऱ्या 500 स्वयंसेवी संस्थांची एक यादी प्रसिद्ध केली. त्या यादीत बांग्लादेशातली “BRAC” ही जगातली अग्रगण्य अशासकीय संस्था (NGO) ठरली.
“BRAC” ही आंतरराष्ट्रीय विकास संस्था आहे. संस्थेनी सलग पाचव्या वर्षी जगातली अव्वल स्वयंसेवी संस्था म्हणून उदयास आली आहे.
वर्ष 1971 मध्ये बांग्लादेश स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्त्वात येताच परत आलेल्या युद्धाच्या शरणार्थींच्या लहान-मोठ्या स्वरूपात मदत व पुनर्वसन करण्यासाठी या संस्थेची स्थापना सर फजल हसन आबेद यांनी वर्ष 1972 मध्ये केली होती.
फजल हसन आबेद यांचे वर्ष 2019 मध्ये निधन झाले. सध्या संस्था बांग्लादेशासह आशिया आणि आफ्रिकेतल्या 11 देशांमध्ये कार्यरत आहे. 250 दशलक्ष लोकांचे जीवन स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने संस्थेनी आपले एक नवे 2030 धोरण जाहीर केले आहे.
ही संस्था दारिद्र्य निर्मूलन, स्त्री-पुरुष समानता, आरोग्य सेवा, पोषण, पर्यावरण आणि रोजगार यासारख्या क्षेत्रात काम करीत आहे. संस्था एक विद्यापीठ, एक बँक, विमा कंपनी, एक बियाणे कंपनी देखील चालवते. संस्थेकडे सुमारे एक लक्ष पूर्णवेळ कर्मचारी आहेत.
No comments:
Post a Comment