Current affairs | Evening News Marathi
Current affairs 4 January 2020 Marathi |
4 जानेवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
14 वैज्ञानिकांना भारत सरकारची ‘स्वर्ण जयंती पाठ्यवृत्ती’ मिळाली
नाविन्यपूर्ण संशोधनाच्या कल्पना असलेल्या प्रकल्पांमध्ये सहभाग आणि संबंधित शाखांमधल्या संशोधन आणि विकास कार्यावर प्रभाव पाडण्याची क्षमता असलेल्या 14 वैज्ञानिकांना 2018-19 या वर्षासाठी भारत सरकारची ‘स्वर्ण जयंती पाठ्यवृत्ती’ (फेलोशिप) देण्यात आली आहे.
पाठ्यवृत्ती मिळविणारे
- डॉ. शीतल गंडोत्रा (CSIR-IGIB, दिल्ली)
- डॉ. जितेंद्र गिरी (नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट जीनोम रिसर्च)
- डॉ. राकेश सिंग लैशराम (राजीव गांधी बायोटेक्नॉलॉजी सेंटर, तिरुवनंतपुरम)
- डॉ. विशाल राय (IISER, भोपाळ)
- डॉ. कनिष्क विश्वास (जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर एडवांस्ड सायंटिफिक रिसर्च, बेंगळुरू)
- डॉ. गोपालन राजारामन (IIT मुंबई)
- डॉ. अपूर्वा खरे (IISc बेंगळुरू)
- डॉ. महेंदर सिंग (IISER, मोहाली)
- डॉ. सबिमल घोष (IIT मुंबई)
- डॉ. स्मरजित करमाकर (TIFR हैदराबाद)
- डॉ. अर्जुन बागची (IIT कानपूर)
- डॉ. अनिंद्य दास (IISc बेंगळुरू)
- डॉ. योगेश सिम्हान (IISc बेंगळुरू)
- डॉ. श्वेता अग्रवाल (IIT चेन्नई)
स्वर्ण जयंती पाठ्यवृत्ती योजना
देशाच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारने स्वर्ण जयंती पाठ्यवृत्ती योजना सुरु केली होती. या योजनेच्या अंतर्गत निवडक युवा वैज्ञानिकांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मूलभूत संशोधनासाठी विशेष मदत पुरवली जाते.
पाठ्यवृत्ती आणि संशोधनासाठी निवडण्यात आलेल्या वैज्ञानिकांना विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून मदत दिली जाते. संशोधनासाठी दरमहा 25 हजार रुपये पाठ्यवृत्तीचा यात समावेश आहे. तसेच वैज्ञानिकांना त्यांच्या वेतनाव्यतिरिक्त 5 वर्षांसाठी वार्षिक 5 लक्ष रुपये एवढे संशोधन अनुदान देखील दिले जाते.
“नवीन, उदयोन्मुख आणि धोरणात्मक तंत्रज्ञान (NEST)” : परराष्ट्र मंत्रालयातला नवा विभाग
भारत सरकारच्या केंद्रीय परराष्ट्र कल्याण मंत्रालयाने 1 जानेवारी 2020 रोजी घोषणा केली की नवी दिल्लीत मंत्रालयात “नवीन, उदयोन्मुख आणि धोरणात्मक तंत्रज्ञान (NEST)” नावाने एका नव्या विभागाची स्थापना करण्यात येणार आहे.
वेगाने वाढणार्या भारतीय अर्थव्यवस्थेत अश्या पुढाकाराने परकीय संबंधातून तंत्रज्ञान क्षेत्रात होणार्या गुंतवणुकीला आकर्षित करण्याला प्रोत्साहन मिळणार. सध्या भारत देशात 5G नेटवर्क तंत्रज्ञान आणण्यासाठी त्याच्या क्षेत्रात चाचण्यांमध्ये भाग घेण्यासाठी ह्यूवेई कंपनीसारख्या मोठ्या उद्योगांना परवानगी देण्याच्या विचारार्थ सरकार आहे.
ठळक बाबी
- NEST विभाग नवीन व उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी संबंधित मुद्द्यांकरिता मंत्रालयात एक केंद्र म्हणून काम करणार.
- 5G आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रांमध्ये परदेशी भागीदारांचे सहकार्य घेण्यामध्ये नवा विभाग मदत करणार.
- स्थानिक भागधारक आणि परदेशी भागधारक यांच्यादरम्यान समन्वय ठेवण्यासाठी तसेच भारताच्या विकासाची प्राथमिकता आणि राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊन धोरणे ठरविण्यामध्ये या विभागाची मदत होणार आहे.
- नवा विभाग नवीन व उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित संसाधनांविषयीची परकीय धोरणे आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर चौकट अश्या बाबींचे मूल्यांकन करणार आणि योग्य परकीय धोरण निवड करण्याविषयीची शिफारस करण्यास देखील मदत करणार आहे.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment