Current affairs | Evening News Marathi
Current affairs 14 January 2020 Marathi |
14 जानेवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
SCOच्या 8 आश्चर्यांमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा समावेश
जगातला सर्वात उंच पुतळा म्हणजेच गुजरातमधले ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ याचा शंघाई सहकार संघटना (SCO) यांच्या '8 वंडर्स ऑफ SCO' या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
गुजरात राज्यात केवडिया येथे “स्टॅच्यू ऑफ युनिटी” या नावाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा 182 मीटर (597 फूट) उंचीचा आहे. हा नर्मदा नदीच्या किनारी उभारण्यात आलेला जगातला सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे.
ए. पी. माहेश्वरी: CRPFचे नवे महानिदेशक
केंद्रीय IPS अधिकारी ए. पी. माहेश्वरी ह्यांची 13 जानेवारी 2020 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली. 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
31 डिसेंबर 2019 रोजी आर. आर. भटनागर निवृत्त झाल्यानंतर CRPF महानिदेशक हे पद रिक्त होते.
.Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment