Current affairs | Evening News Marathi
Current affairs 10 January 2020 Marathi |
10 जानेवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
जागतिक बँकेचा “ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स” अहवाल
जागतिक बँकेचा ताजा ‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये वर्तवविलेल्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनाचा (GDP) वृद्धिदर हा 5 टक्क्यांवर सीमित राहणार.
अहवालातल्या ठळक बाबी
भारताविषयी
- जागतिक बँकेचा अंदाज खरा ठरल्यास भारतीय विकासदराचा तो 11 वर्षांतला नीचांक ठरणार.
- GDP दरातल्या घसरणीस कारणीभूत असणारे घटकही जागतिक बँकेने नमूद केले आहेत. भारतात खासगी क्षेत्रातून होणाऱ्या पतपुरवठ्यामध्ये सध्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. याशिवाय देशांतर्गत क्रयशक्तीही घटल्याचे दिसत असून त्याचाही विकासदरास फटका बसणार.
- पुढील आर्थिक वर्षात वृद्धिदर वेग धरणार व आर्थिक वर्ष 2020-21 अखेर हा दर 5.8 टक्क्यांवर पोहोचणार.
जागतिक
- वर्ष 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेची अंदाजित वाढ 2.5 टक्के राहणार असा अंदाज आहे.
- दक्षिण आशियाचा GDP वृद्धीदर 2019-20 या वर्षी 5.5 टक्क्यांपर्यंत राहण्याचे अपेक्षित आहे.
- 2020 या वर्षी प्रगत अर्थव्यवस्थांचा एकत्रित वृद्धीदर 1.4 टक्क्यांपर्यंत खालावणार असा अंदाज आहे.
- उदयोन्मुख बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा वृद्धीदर यंदा 4.1 टक्क्यांपर्यंत वाढण्याचे अपेक्षित आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 10 January 2020 Marathi |
10 जानेवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
मिलन 2020
यावर्षी मार्च महिन्यात भारतात ‘मिलन’ (MILAN) नावाचा जगभरातल्या नौदलांचा वार्षिक आंतरराष्ट्रीय सराव होणार आहे. ‘सिनर्जी अक्रॉस द सीज’ या विषयाखाली यंदाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या बहुपक्षीय सागरी सरावासाठी आमंत्रित केलेल्या 41 देशांच्या नौदलांपैकी तीसने आपली उपस्थिती राहणार असे आश्वासन दिले आहे.
ठळक बाबी
- हा सराव विशाखापट्टणम येथे होणार आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2016 मध्ये हा सराव विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आला होता.
- हा कार्यक्रम एक आठवडा चालणार आहे.
- या कार्यक्रमामुळे परदेशी नौदलांसोबतचे मैत्रीपूर्ण संबंध आणखीन वृद्धीगत करण्यास वाव मिळतो. तसेच समान हितसंबंध असलेल्या क्षेत्रात परस्पर संवाद साधण्याची एक उत्कृष्ट संधी मिळू शकते.
- हा कार्यक्रम व्यवसायिक संबंध वाढवण्याच्या उद्देशाने आणि सागरी क्षेत्रामधील एकमेकांचे सामर्थ्य आणि उत्कृष्ट पद्धतींमधून शिकण्याच्या उद्देशाने आहे.
‘मिलन’ विषयी
मिलन हा बहुपक्षीय नौदल सराव 1995 साली पहिल्यांदा आयोजित करण्यात आला होता. भारतीय नौदलाकडून अंदमान व निकोबार कमांडच्या अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
निमंत्रणकर्त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून यंदा सरावाचे ठिकाण अंदमान व निकोबार येथून तार्किक व प्रशासकीय सोयीसाठी विशाखापट्टणम येथे हलविण्यात आले आहे.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment