Current affairs | Evening News Marathi
Current affairs 28 October Marathi |
28 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स
‘हवामानातले बदल विषयक BASIC मंत्रिस्तरीय बैठक 2019’ बिजींगमध्ये संपन्न
26 ऑक्टोबर 2019 रोजी चीनची राजधानी बिजींग येथे 29 वी ‘हवामानातले बदल विषयक BASIC मंत्रिस्तरीय बैठक’ या कार्यक्रमाचा समारोप झाला. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर ह्यांनी सभेत भारताचे प्रतिनिधित्व केले.
BASIC गट
28 नोव्हेंबर 2009 रोजी झालेल्या करारामधून BASIC समूह जन्माला आला, जो ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत आणि चीन या चार मोठ्या नव्या औद्योगिक देशांचा एक गट आहे. कोपेनहेगन हवामान परिषदेदरम्यान चारही देशांनी एकत्रितपणे बदलत्या हवामानाच्या विरोधात कार्य करण्यास वचनबद्धता दर्शवली आणि हा गट अस्तित्वात आला.
बैठकीत चर्चा झालेले मुद्दे
- अमेरिका पुढच्या वर्षी पॅरिस हवामान करारामधून माघार घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर BASIC देशांच्या पर्यावरण मंत्र्यांनी कराराच्या ‘व्यापक’ अंमलबजावणीची मागणी केली.
- हवामानविषयक कृती योजनेच्या अंमलबजावणीत होणारे नुकसान कमी करण्यासाठी विकसनशील देशांना 100 अब्ज डॉलर एवढा वित्तपुरवठा करण्याची आपली वचनबद्धता पूर्ण करण्यास विकसित देशांना आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ 10 ते 20 अब्ज डॉलर एवढीच रक्कम वितरित करण्यात आलेली आहे.
- BASIC देशांनी त्यांच्या राष्ट्रीय परिस्थितीच्या आधारे महत्वाकांक्षी हवामान कृती राबवित आहेत आणि त्यात मोठी प्रगती साधली आहे. 2018 साली चीनने राष्ट्रीय GDPच्या एका युनिट कार्बन डाय-ऑक्साईड वायूच्या उत्सर्जनाचे प्रमाण 2005 सालाच्या तुलनेत 45.8 टक्क्यांनी कमी केले आहे तर भारताने याबाबतीत सन 2005 ते सन 2014 या कालावधीत उत्सर्जनाचे प्रमाण 21 टक्क्यांनी कमी केले आणि ब्राझीलने हे प्रमाण 58 टक्क्यांनी कमी केले. दक्षिण आफ्रिकेनी नवा कार्बन कर लागू केला.
‘कृत्रिम पान’ CO2 आणि पाण्यापासून इंधन म्हणून स्वच्छ वायू तयार करण्यास सक्षम
ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातल्या संशोधकांनी सुधारित कृत्रिम पान (आर्टिफिशियल लीफ) विकसित करण्यात यश मिळविले आहे. संशोधकांच्या मतानुसार नैसर्गिक पानापेक्षा हे कृत्रिम पान दहापटीने जास्त परिणामकारक असून हवेतून मुक्तपणे CO2 शोषणारे आहे. तसेच CO2 वायूला ऑक्सिजन आणि कार्बन मोनोऑक्साईड मध्येही बदलण्यास मदत करणारे आहे.
हे कृत्रिम पान हवेतला कार्बन डाय-ऑक्साईड वायू शोषून ऑक्सिजन वायू सोडण्यात सक्षम ठरले असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
कृत्रिम पान कार्बन डायऑक्साईडचे कार्बन मोनोऑक्साईड आणि ऑक्सिजनमध्ये रूपांतर करते आणि कार्बन मोनोऑक्साईडपासून पेट्रोलला पर्याय ठरणारे वायू स्वरूपातले इंधन (syngas) विकसित करता येऊ शकते.
अमेरिकेच्या इलिनॉईस विद्यापीठातल्या संशोधकांनी देखील याबाबत यशस्वीपणे संशोधन केलेले आहे.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment