Current affairs | Evening News Marathi
Current affairs 26 October Marathi |
26 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स
उत्तरप्रदेश राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना’
दिनांक 25 ऑक्टोबर 2019 रोजी उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी नव्या ‘मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना’ची घोषणा केली.
ठळक मुद्दे
- राज्यातल्या मुलींना सक्षम बनविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
- ज्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला त्या प्रत्येकाला 15 हजार रुपयांची मदत दिली जाणार.
- रक्कम DBT पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे.
- योजनेची रक्कम टप्प्याटप्प्याने हस्तांतरित केली जाणार आहे. मुलीचे लसीकरण, इयत्ता 1, 5, 9 व पदवी मधील त्यांचा प्रवेश असे विविध टप्पे पूर्ण केल्यानंतर रक्कम दिली जाणार.
- योजनेसाठी डिजिटल व्यासपीठ देखील तयार करण्यात आले आहे.
उत्तरप्रदेश राज्य
उत्तरप्रदेश हे भारताचे उत्तरेकडील एक प्रमुख राज्य आहे. लोकसंख्येनुसार उत्तरप्रदेश भारताचे पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरते. लखनऊ ही राज्याची राजधानी तर कानपूर हे राज्यातले सर्वात मोठे शहर आहे. राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी झाली.
कर्नाटकने ‘विजय हजारे चषक 2019-20’ जिंकला
अभिमन्यू मिथुनच्या शेवटच्या षटकातल्या हॅट्ट्रिकच्या बळावर यजमान कर्नाटकने विजय हजारे चषक स्पर्धा जिंकली. बेंगळूरू येथे ही स्पर्धा खेळवली गेली.
तामिळनाडूने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात सर्वबाद 252 धावा जमवल्या तर प्रत्युत्तरात कर्नाटकने 23 षटकात 1 बाद 146 धावा केल्या असताना पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबला. या लढतीत डकवर्थ लुईसऐवजी जयवर्धन (व्हीजेडी) मेथडने कर्नाटकला 60 धावांनी विजयी घोषित केले गेले.
स्पर्धेविषयी
विजय हजारे चषक या स्पर्धेला ‘रणजी एकदिवसीय करंडक’ म्हणून देखील ओळखले जाते. ही क्रिडास्पर्धा मर्यादित षटकांसह सन 2002-03 पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर खेळली जात आहे. या स्पर्धेचे नाव प्रसिद्ध भारतीय क्रिकेट विजय हजारे यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. यामध्ये 27 संघ खेळतात.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment