Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, October 25, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 25 October Marathi | 25 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 25 October  Marathi |
       25 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स



    व्यवसाय सुलभीकरणात भारत 63 स्थानावर आहेजागतिक बँक

    जागतिक बँकेनी व्यवसाय सुलभीकरणाबाबतचा ‘इज ऑफ डूइंग बिझनेस 2020’ या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात 190 देशांची तुलना करण्यात आली आहे.
    या अहवालात दिलेल्या व्यवसाय सुलभीकरणाबाबत जागतिक मानांकन यादीत भारताने 63वे स्थान पटकावले आहे, जे गेल्या वर्षी 77 व्या स्थानावर होते.
    भारताची कामगिरी
    • अहवालातल्या 10 पैकी सात वर्गांमध्ये भारताची कामगिरी सुधारली असून ती सर्वोत्तम देशांच्या जवळ पोहोचली आहे. दिवाळखोरीचा निपटारा, बांधकाम परवाने, मालमत्ता नोंदणीकरण, सीमेपलिकडील व्यापार आणि कर भुगतान या क्षेत्रांमध्ये भरघोस सुधारणा दिसून आली आहे.
    • 2015 सालापासून भारत व्यवसाय सुलभीकरणात सातत्याने भरीव कामगिरी करत असून सलग तिसऱ्या वर्षी यात प्रगती दिसून आली आहे. सलग तिसऱ्या वर्षी भारत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 10 देशांमध्ये समाविष्ट झाला आहे. गेल्या पाच वर्षात भारताने 79 स्थानांची प्रगती केली आहे.
    • दिवाळखोरीतून देण्यांची वसूली होण्याचे प्रमाण 26.5 टक्क्यांवरून 71.6 टक्क्यांवर आले आहे.
    • दिवाळखोरी अंमलात आणण्याचा कालावधी 4.3 वर्षांवरून 1.6 वर्षांवर आला आहे.
    • बांधकाम परवाने देण्याच्या प्रक्रियेतील टप्पे कमी केले गेलेत.
    • दक्षिण आशियाई देशांमध्ये भारताचे शीर्षस्थान कायम आहे. पूर्वी 2014 साली भारत सहाव्या स्थानी होता.
    जागतिक कामगिरी
    • व्यवसाय सुलभीकरणाच्या संदर्भातल्या मानांकन यादीत सर्वाधिक गुण मिळविणारा न्युझीलँड हा देश ठरला.
    • त्याच्यापाठोपाठ दहा अर्थव्यवस्थांमध्ये सिंगापूर, हाँगकाँग, डेन्मार्क, कोरिया प्रजासत्ताक, अमेरिका, जॉर्जिया, ब्रिटन, नॉर्वे आणि स्वीडन आहेत.
    • सर्वोत्तम कामगिरी दर्शविणार्‍या देशांमध्ये सामान्यत: ऑनलाइन व्यवसायाची अंतर्भूत प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कर द्यावयाचे मंच आणि मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी ऑनलाइन प्रक्रिया होते.
    • सौदी अरब, जॉर्डन, टोगो, बहरीन, ताजिकिस्तान, पाकिस्तान, कुवैत, चीन, भारत आणि नायजेरिया या दहा अर्थव्यवस्थांमध्ये व्यवसायासाठी वातावरण तयार करण्यात सर्वाधिक सुधारणा झाली.
    • दहा सर्वात सुधारित देशांपैकी चार मध्य-पूर्व, उत्तर आफ्रिका मधले देश आहेत.
    • बहरीनने सर्वाधिक सुधारणांची अंमलबजावणी केली आणि अहवालात मोजल्या गेलेल्या दहा पैकी नऊ क्षेत्रांमध्ये सुधारणा केली. त्यापाठोपाठ चीन आणि सौदी अरबने प्रत्येकी आठ सुधारणा घडवून आणल्या.
    • दक्षिण आशियाई प्रदेशातल्या बर्‍याच अर्थव्यवस्थांनी व्यवसाय नियमनाच्या संदर्भात सुधारणेचा वेग कायम ठेवला आहे, कारण भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी जगातल्या प्रथम दहा सर्वात सुधारित अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवले आणि त्यांच्या व्यवसाय सुलभतेत सुधारणा घडविली. पाकिस्तानमध्ये विद्युत जोडणी मिळविण्यासाठी लागणारा वेळ 49 दिवसांनी कमी करण्यात आला.
    • जगभरातल्या 115 अर्थव्यवस्थांच्या सरकारने त्यांच्या स्थानिक खासगी क्षेत्र, अधिक नोकर्‍या मिळवण्याचा मार्ग प्रशस्त करणे, विस्तारीत व्यवसायिक क्रियाकलाप आणि बर्‍याच लोकांना उच्च उत्पन्न देणे अश्या बाबींच्या संदर्भात व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी गेल्या वर्षभरात एकूण 294 सुधारणा घडवून आणल्या.


    तमन्ना’: CBSE आणि NCERT यांची ऑनलाइन योग्यता चाचणी परीक्षा

    विद्यार्थ्यांना योग्य कार्यक्षेत्राची निवड करण्यास मदत करण्याच्या उद्देशाने, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) या संस्थांनी 'तमन्ना' (ट्राय अँड मेझर अ‍ॅप्टीट्यूड अँड नॅचरल अॅबिलिटी) या नावाने एक ऑनलाइन योग्यता चाचणी परीक्षा सादर केली आहे.
    परीक्षेविषयी
    • या परीक्षेचा हेतू इयत्ता 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांना विषयांची अधिक योग्य पद्धतीने निवड करण्यात मदत करणे आणि अखेरीस त्यांना इयत्ता 11 वी व 12 वी मधल्या विषयांची निवड करताना माहिती देऊन निर्णय घेण्यात मदत करणे आहे.
    • ‘CBSE (नो युवर अ‍ॅप्टीट्यूड) KYA परीक्षा’ हा उपक्रम विद्यार्थ्यांचा शैक्षणिक क्षेत्रातली कमजोर बाजू आणि भक्कम बाजू यांचे मूल्यांकन करणार.
    • KYAची नोंदणी प्रक्रिया 29 जानेवारी 2020 पासून CBSEच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार आहे.
    • विद्यार्थी कोणत्याही कामाच्या दिवशी शाळेचा लॉग-इन आयडी वापरून चाचणी देऊ शकतात. ही परीक्षा केवळ विद्यार्थ्याच्या मानसिक तयारीविषयी माहिती प्रदान करते आणि या परीक्षेत उत्तीर्ण किंवा अपयश अशी बाब नाही, जी इच्छुक विद्यार्थी स्वेच्छेने देतील.

    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स, 

    No comments:

    Post a Comment