Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, October 23, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 23 October Marathi | 23 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 23 October  Marathi |
       23 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स

    गोव्यात रोजगाराच्या निर्मितीसाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाचा पुढाकार

    गोव्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) आणि गोवा सरकार यांच्यात करार झाला आहे.
    या उपक्रमांनी KVICने यापूर्वीच 1000 लोकांना रोजगार मिळवून देण्यात मदत केली आहे.
    या कराराच्या अंतर्गत खाली दिलेल्या बाबींचे वाटप केले गेले -
    • 160 कुटुंबांना इलेक्ट्रिक पॉटर व्हील
    • 50 प्रशिक्षित महिलांना नव्या पद्धतीचे चरखे (स्पिनिंग व्हील्स)
    त्यामुळे 700 लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार. त्यासाठी मोरझिम, जुना गोवा, पंजिम, बिचोलीम, साखाली, मप्पासा, दाभाल आणि मडगाव अशा अनेक खेड्यांमधल्या लाभार्थींना ओळखले गेले आहे.
    याशिवाय, गोव्यात लिज्जत पापड उद्योगाचे एक केंद्र उभारले जाणार आहे, ज्यामुळे स्थानिक महिलांना 200 थेट रोजगार उपलब्ध होणार आहे.
    KVIC बाबत
    खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) हे एक वैधानिक मंडळ आहे, ज्याअंतर्गत ग्रामीण विकासात गुंतलेल्या इतर संस्थासह समन्वयाचे ग्रामीण भागात खादी व इतर ग्रामोद्योगांच्या विकासासाठी कार्यक्रमांचे नियोजन, जाहिरात, आयोजन व अंमलबजावणी करण्यास सदैव कार्यरत असते. KVIC ची स्थापना 1956 साली झाली आणि त्याचे मुंबईमध्ये मुख्यालय आहे.


    भारतात कुपोषणाच्या विरोधात UNWFPच्या 'फीड अवर फ्यूचर' मोहीमेचा प्रारंभ

    जागतिक अन्न दिनानिमित्त 21 ऑक्टोबर 2019 रोजी भारतात उपासमार व कुपोषण या गंभीर बाबींविषयी जागृती निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक अन्न कार्यक्रमाने (UNWFP) 'फीड अवर फ्यूचर' नावाच्या सिनेमा जाहिरात मोहीमेचा प्रारंभ केला आहे.
    ठळक बाबी
    • या मोहिमेच्या प्रारंभामध्ये टीव्ही होस्ट मिनी माथुर यांच्याकडून संचालित सिनेमा आणि सामाजिक परिवर्तनाबद्दल चर्चासत्र आयोजित केले जाणार.
    • शून्य उपासमारीचे जग तयार करण्याच्या उद्देशाने UFO मूव्हीज संस्थेच्या पाठिंब्याने हे अभियान चालवले जाणार आहे.
    • शिवाय, WFPचे ‘शेयर द मील’ हे जागतिक उपासमारी विरोधातले जगातले पहिले मोबाइल अॅप जाहीर करण्यात आले आहे. अ‍ॅप वापरकर्त्यांना लहान देणग्या देता येणार आणि त्यातल्या प्रगतीचा मागोवा घेण्यास सक्षम करते.
    पार्श्वभूमी
    2018 साली फेसबुक, ग्लोबल सिनेमा अॅडव्हर्टायझिंग असोसिएशन (SAWA) आणि WFP यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचा प्रारंभ केला.
    सर जॉन हेगर्टी ह्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी चित्रपटाची शक्ती वापरण्याची संकल्पना मांडली होती. जाहिरातीच्या माध्यमातून डिजिटल सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर देणग्या देण्यासाठी देणगीदारांना प्रवृत्त करणे हा त्या संकल्पनेचा हेतू होता.
    UNWFP बाबत
    संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक अन्न कार्यक्रम (UNWFP) ही अन्न-पुरवठा संदर्भात सहाय्य करणारी संयुक्त राष्ट्रसंघाची (UN) एक शाखा असून ती जगातली सर्वात मोठी मानवतावादी संघटना आहे जी उपासमारी व अन्न सुरक्षा अश्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष देते. संस्थेची स्थापना 19 डिसेंबर 1961 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय रोम (इटली) येथे आहे.
    संस्था दरवर्षी 83 देशांमधल्या सरासरी 91.4 दशलक्ष लोकांना अन्न पुरवठा करून मदत करते. ही संस्था अशा लोकांना मदत करते जे स्वत: आणि त्यांच्या कुटुंबासाठी पुरेसे अन्न मिळवू शकत नाहीत. ही संस्था संयुक्त राष्ट्रसंघ विकास गटाची (UNDG) सदस्य आणि त्याच्या कार्यकारी समितीचा एक भाग आहे.

    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स,


    No comments:

    Post a Comment