Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, October 22, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 22 October Marathi | 22 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 22 October  Marathi |
       22 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स


    CCRTच्या -पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे उद्घाटन

    21 ऑक्टोबर 2019 रोजी नवी दिल्लीत एका कार्यक्रमात केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन राज्यमंत्री प्रह्लाद सिंग पटेल यांच्या हस्ते सांस्कृतिक स्त्रोत व प्रशिक्षण केंद्र (CCRT) याचे ‘डिजिटल भारत डिजिटल संस्कृती’ नावाचे एक ई-पोर्टल आणि ‘CCRT यूट्यूब चॅनल’ या डिजिटल उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला.
    कार्यक्रमात जीवन सिंग ठाकूर लिखित “देवास की सांस्कृतिक परंपरा” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
    उपक्रमाचे महत्त्व
    • या उपक्रमामुळे देशभरात कुठेही सादृष्यामार्फत सांस्कृतिक शिक्षणाचा प्रसार होण्यास मदत होऊ शकणार.
    • या उपक्रमासाठी गुवाहाटी, उदयपूर आणि हैदराबाद येथल्या CCRTच्या सर्व प्रादेशिक केंद्रांना अखंडपणे जोडण्यासाठी रुट्स2रूट्स या स्वयंसेवी संस्थेशी करार केला आहे.
    • भारतीय संगीत, चित्रकला, नाट्य, मार्शल आर्ट आणि इतर कला प्रकारांची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात मदत होणार.
    CCRT बाबत
    सांस्कृतिक स्त्रोत व प्रशिक्षण केंद्र (CCRT) हे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एक स्वायत्त संस्था आहे. त्याची स्थापना दिल्लीत सन 1979 मध्ये झाली.
    विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतीचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी त्याची स्थापना केली गेली. या उद्देशाने सन 1970 पासून दिल्ली विद्यापीठात एक संशोधन व उत्पादन विभाग कार्यरत करण्यात आले आहे.



    भारत-अमेरिका संरक्षण तंत्रज्ञान  व्यापार पुढाकार (DTTI) याची बैठक दिल्लीत होणार

    पुढच्या आठवड्यात नवी दिल्लीत ‘भारत-अमेरिका संरक्षण तंत्रज्ञान व व्यापार पुढाकार (DTTI) याची नववी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
    वर्तमानात DTTI उपक्रमाचे नेतृत्व अमेरिकेचे एलन एम. लॉर्ड आणि भारताचे संरक्षण सचिव अपूर्व चंद्रा हे करीत आहेत.
    DTTI म्हणजे काय?
    अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी DTTI हा उपक्रम आखण्यात आला आहे, कारण की दोन्ही देशातल्या भिन्न नोकरशाही प्रक्रिया आणि कायदेशीर आवश्यकता अस्तित्वात असल्यामुळे ती व्याख्या संकुचित होते. त्यामुळे हा उपक्रम अश्या अडथळ्यांना दूर करण्यास तसेच अमेरिकेच्या वरिष्ठ पातळीवरचा दृष्टिकोन विस्तारित करण्यास मदत करते.
    त्यामुळे ही प्रक्रिया संरक्षण क्षेत्रातली संधी बळकट करण्यासाठी दोन्ही देशातली वरिष्ठ नेते सातत्याने गुंतलेले आहेत याची खात्री करण्यासाठी असलेली एक लवचिक यंत्रणा आहे.
    ठळक नोंदी
    • दोन्ही देशांमध्ये होणार्‍या द्वैपक्षीय संरक्षण व्यापाराचे एकूण मूल्य या वर्षाच्या अखेरीस 18 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे.
    • ऑगस्ट 2018 मध्ये अमेरिकेनी भारताला ‘स्ट्रॅटेजिक ट्रेड अ‍ॅथॉरिटी टियर 1’ (STA-1) याचा दर्जा बहाल केला होता. त्यामुळे अमेरिकेच्या कंपन्यांना एका सुव्यवस्थित प्रक्रियेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर दुहेरी-वापराजोगे आणि उच्च तंत्रज्ञानाच्या वस्तू भारताकडे निर्यात करण्याची परवानगी देऊन भारतासाठी अधिकच सुलभ सुविधा प्रदान केली गेली आहे.
    • एका अंदाजानुसार, 2025 या सालापर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यातला द्वैपक्षीय व्यापार 238 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. संरक्षण, विमान, तेल व नैसर्गिक वायू, कोळसा, यंत्रसामग्री आणि इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या क्षेत्रांमध्ये भारतात अमेरिकेच्या गुंतवणूकीमध्ये संभाव्य वाढ होण्याची शक्यता आहे. तर भारतीय उद्योगाला वाहन, औषधी, सागरी अन्न, माहिती तंत्रज्ञान आणि प्रवासी सेवा अश्या क्षेत्रांमध्ये अमेरिकेच्या बाजारपेठेत वाव आहे.
    संयुक्त राज्ये अमेरिका (USA)
    उत्तर अमेरिका खंडातला संयुक्त राज्ये अमेरिका (अमेरिकेची संयुक्त संस्थाने किंवा संयुक्त संस्थाने म्हणजेच USA किंवा US) हा देश जगात सर्वत्र केवळ अमेरिका या नावाने ओळखला जातो. देशातली प्रणाली 'अध्यक्षीय लोकशाही' आहे. केंद्रीय स्तरावरील राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुखपद भूषवतो. भौगोलिकदृष्ट्या कॅनडा, मेक्सिको हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत.
    अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी.' येथे आहे आणि अमेरिकन डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.
    19 नोव्हेंबर 1493 रोजी ख्रिस्तोफर कोलंबस याला अमेरिकेचा शोध लागला. 4 जुलै 1776 रोजी अमेरिकेला ब्रिटन पासून स्वातंत्र्य मिळाले.

    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स,


    No comments:

    Post a Comment