Current affairs | Evening News Marathi
Current affairs 21 October Marathi |
21 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स
भारत 2022 साली इंटरपोल महासभेचे आयोजन करणार
सन 2022 मध्ये ‘इंटरपोल’ या संस्थेच्या 91व्या महासभेचा आयोजक म्हणून भारताची निवड करण्यात आली आहे. भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
भारताच्या केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक ऋषी कुमार शुक्ला यांनी भारताकडून याबाबत प्रस्ताव मांडला होता आणि प्रचंड बहुमताने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
इंटरपोल बाबत
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (INTERPOL) ही एक आंतरराष्ट्रीय पोलीस सहयोग संघटना आहे. जगभरात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडण्याचे कार्य इंटरपोल करते. इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्सच्या ल्योन या शहरात असून इतर 187 कार्यालये जगभरात आहेत.
इंटरपोल ही 194 सदस्य-देश असलेली आंतरराष्ट्रीय संस्था असून पोलीस क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याचा संस्थेला 100 वर्षांचा अनुभव आहे.
ही संघटना प्रामुख्याने सुरक्षा, दहशतवाद, संगठीत गुन्हेगारी, मानवता-विरोधी गुन्हे, पर्यावरण-विषयक गुन्हे, युद्ध-विषयक गुन्हे, शस्त्रास्त्र तस्करी, मानव तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, संगणक-विषयक गुन्हे यावर काम करते.
के. पारसरन यांना ‘बहुचर्चित ज्येष्ठ नागरिक’ पुरस्कार मिळाला
भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकैया नायडू यांच्या हस्ते नवी दिल्लीत एका कार्यक्रमात माजी अॅटर्नी जनरल के. पारसरन यांना ‘बहुचर्चित ज्येष्ठ नागरिक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
समाजातल्या ज्येष्ठांच्या हितासाठी काम करणार्या ‘एज केअर इंडिया’ या संस्थेनी आयोजित केलेल्या जेष्ठ दिनाच्या निमित्त एका कार्यक्रमात पारासरन यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कायदा आणि न्याय या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या अपवादात्मक योगदानासाठी हा सन्मान दिला गेला.
के. पारासरन कोण आहेत?
वय वर्षे 92 असलेले के. पारासरन हे एक भारतीय वकील आहेत. 1976 साली त्यांनी राष्ट्रपती कायद्याच्या काळात त्यांनी तामिळनाडूचे महाधिवक्ता म्हणून काम पाहिले होते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या काळात त्यांनी भारताचे अॅटर्नी जनरल म्हणूनही काम पाहिले होते. त्यांना 2003 साली पद्मभूषणने गौरविण्यात आले. 2011 साली पद्मविभूषण प्रदान करण्यात आले.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment