Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, October 18, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 18 Marathi | 18 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 18 Marathi |
       18 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स



    NITI आयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2019मध्ये कर्नाटक अव्वल

    राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था (NITI) आयोगाने या वर्षीचा ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2019’ प्रसिद्ध केले आहे. ही यादी तयार करण्यात इंस्टीट्यूट फॉर कॉम्पटेटिवनेस या संस्थेनी नॉलेज पार्टनर म्हणून काम केले.
    या अभ्यासात नवकल्पनात्मक शोधांसाठी वातावरण तयार करण्यासाठी भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे या प्रयत्नांमध्ये येणारी आव्हाने आणि अडथळे दूर करून आर्थिक वाढीसाठी धोरणे आखण्यास मदत मिळते.
    मनुष्यबळ, गुंतवणूक, ज्ञानी कामगार, व्यवसायासाठी वातावरण, सुरक्षितता व कायदेशीर वातावरण, नॉलेज आउटपुट आणि नॉलेज डिफ्यूजन अश्या सात स्तंभावर हा अभ्यास केला गेला आहे.
    ठळक बाबी
    • कर्नाटक हे नवकल्पनात्मक शोधाच्या क्षेत्रात भारतातले अव्वल राज्य ठरले. पायाभूत सुविधा, ज्ञानी कामगार, नॉलेज आऊटपुट आणि व्यवसायासाठी वातावरण या क्षेत्रात राज्याने सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
    • शीर्ष 10 मध्ये समाविष्ट होणारी इतर राज्ये (अनुक्रमे) - तामिळनाडू, महाराष्ट्र, तेलंगणा, हरियाणा, केरळ, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात आणि आंध्रप्रदेश.
    • ईशान्य व डोंगराळ राज्यांमध्ये अव्वल ठरलेले – सिक्किम राज्य. (त्यापाठोपाठ हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर, जम्मू व काश्मीर ही अव्वल पाच राज्ये)
    • केंद्रशासित प्रदेश / शहर राज्ये / छोट्या राज्यांमध्ये अव्वल ठरलेले - दिल्ली. (त्यापाठोपाठ चंदिगड, गोवा, पुडूचेरी, अंडमान व निकोबार बेटे)
    • दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा आणि उत्तरप्रदेश ही उपलब्धतेला उपयोगी बाबींमध्ये रूपांतरित करण्यासाठी सर्वात कार्यक्षम राज्ये ठरली.
    • मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्य जरी तिसर्‍या क्रमांकावर असले तरीही राज्याने नवकल्पक शोधकार्यांसाठी मनुष्यबळ, गुंतवणूक, ज्ञानी कामगार, व्यवसायासाठी वातावरण, सुरक्षितता व कायदेशीर वातावरण या क्षेत्रांमध्ये सर्वोत्कृष्ट सक्षम वातावरण बनविल्याचे आढळून आले आहे.

    देशातली पशुधन गणना 2019

    देशातल्या पशू संख्येची आकडेवारी स्पष्ट करणारी 20वी ‘पशुधन गणना’ याचा अहवाल केंद्र सरकारने प्रसिद्ध केला आहे. अहवालात असे दिसून आले आहे की, देशात दुभत्या जनावरांची संख्या वाढत असून देशी आणि क्रॉस-ब्रीड मादा गुराढोरांची संख्या वाढत आहे.
    ताज्या आकडेवारीनुसार -
    • सन 2019 मध्ये एकूणच पशुधनाची संख्या 535.78 दशलक्ष एवढी होती. मुख्यत: मेंढ्या व बकरींच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
    • गेल्या वर्षांत घट झाल्यानंतर एकूण जनावरांची संख्या किरकोळ वाढलेली आहे. देशी जनावरांच्या संख्या सन 2012 पासून स्थिर आहे.
    • सन 2019 मध्ये गुराढोरांची संख्या 192.49 दशलक्ष होती (2012च्या गणनेच्या तुलनेत 0.8 टक्क्यांची वाढ). ही वाढ मुख्यत: क्रॉस-ब्रीड गुरांच्या वाढीमुळे झाली आहे ज्यामुळे दुधाचे प्रमाण जास्त आहे.
    • मादा क्रॉस-ब्रीड गुराढोरांची संख्या 46.95 दशलक्षांवर गेली. देशी मादा गुराढोरांची संख्या 98.17 दशलक्ष झाली आहे. म्हशींची संख्या 109.85 दशलक्ष एवढी झाली.
    • दुभत्या जनावरांच्या संख्येत 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
    • सन 2018-19 मध्ये भारतात एकूण 188 दशलक्ष टन दूध उत्पादन झाले. त्यात क्रॉस-ब्रीड प्राण्यांचे जवळपास 28 टक्के योगदान होते, असा अंदाज आहे.
    • घरामागच्या अंगणात होणार्‍या कुक्कुटपालनात वाढ दिसून आली आहे. सन 2019 मध्ये कोंबड्यांची संख्या 851.18 दशलक्ष इतकी होती (2012च्या तुलनेत 17 टक्क्यांनी वाढ).

    No comments:

    Post a Comment