Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, October 1, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 1 October Marathi | 1 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 1 October  Marathi | 
     1 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स मराठी


    NITI आयोगाचा शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक:केरळ अव्वल

    NITI Commission's 'School Education Quality Index': Kerala tops

    NITI आयोग, मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि जागतिक बँक यांच्या संयुक्त प्रयत्नांतून 'द सक्सेस ऑफ अवर स्कूल-स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स' (SEQI) या शीर्षकाखाली एक अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात ‘शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक’ देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.
    सन 2015-16 हे आधारवर्ष मानून केलेल्या शैक्षणिक गुणवत्ता मापनात केरळचा अव्वल क्रमांक कायम असून, उत्तरप्रदेश शेवटच्या क्रमांकावर आहे.
    या अहवालात वीस मोठ्या राज्यांचा एक गट, आठ लहान राज्यांचा दुसरा गट आणि सात केंद्रशासित प्रदेशांचा तिसरा गट अशी वर्गवारी करण्यात आली आहे. शैक्षणिक गुणवत्तेच्या मूल्यांकनासाठी दोन श्रेण्या करण्यात आल्या. पहिल्या श्रेणीत शैक्षणिक स्तर, शिक्षणाची संधी, समानता, पायाभूत सोयी-सुविधा यांच्या निष्पत्तीचा आढावा घेण्यात आला, तर दुसऱ्या श्रेणीत या निष्पत्तींना चालना देणाऱ्या प्रशासकीय अंमलबजावणीच्या प्रक्रियांचे निकष निश्चित करण्यात आले. विविध सर्वेक्षणे, राज्यांनी दिलेली माहिती आणि त्रयस्थ पाहणी यांसह 33 निकषांच्या आधारे राज्यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे.
    ठळक बाबी
    • मोठ्या राज्यांमधील कामगिरीसंबंधी एकूणच गुण केरळच्या 76.6 टक्क्यांपासून ते उत्तरप्रदेशच्या 36.4 टक्क्यांपर्यंतच्या मर्यादेत प्राप्त झाली आहेत.
    • देशातल्या वीस मोठ्या राज्यांपैकी 18 राज्यांची गुणवत्ता सन 2015-16 ते सन 2016-17 या कालावधीत सुधारली असून अनुक्रमे हरयाणा, आसाम, उत्तरप्रदेश, ओडिशा आणि गुजरात यांनी साधलेल्या प्रगतीचा वेग सर्वाधिक आहे.
    • मोठ्या राज्यांमध्ये केरळ, राजस्थान, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात आणि आसामने सर्वसाधारणपणे 60 पेक्षा जास्त टक्केवारीची नोंद करून चांगली कामगिरी बजावली आहे. त्यात केरळने 76.6 टक्क्यांसह अव्वल क्रमांक पटकावला असून, 36.4 टक्क्यांसह उत्तरप्रदेश यादीत तळाशी आहे.
    • शैक्षणिक स्तराच्या बाबतीत कर्नाटकने 81.9 टक्क्यांसह पहिला क्रमांक मिळविला आहे, तर उत्तरप्रदेशने 34.1 टक्क्यांसह शैक्षणिक स्तराचा नीचांक नोंदविला आहे.
    • शाळांच्या कामकाजाच्या प्रक्रियांच्या बाबतीत केरळने 79 टक्क्यांसह पहिला क्रमांक पटकावला आहे, तर झारखंडचा 21 टक्क्यांसह शेवटचा क्रमांक लागला आहे.
    • आठ लहान राज्यांमध्ये, अनुक्रमे मणीपूर, त्रिपुरा आणि गोवा हे अव्वल-तीन स्थानांवर आहेत. त्यांच्यापाठोपाठ मिझोरम, नागालँड, सिक्कीम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश असा क्रम लागला आहे.
    • सात केंद्रशासित प्रदेशांमध्ये, चंदीगड अव्वल स्थानावर आला असून, त्याच्यापाठोपाठ दादरा व नगर हवेली, दिल्ली, पुडुचेरी, दमण व दीव, अंदमान व निकोबार बेटे आणि लक्षद्वीप यांचा क्रमांक लागतो आहे.
    • छोट्या राज्यांमधील शैक्षणिक गुणवत्ता कामगिरी मणीपूरच्या 68.8 टक्क्यांपासून ते अरुणाचल प्रदेशाच्या 24.6 टक्क्यांपर्यंतच्या मर्यादेत दिसून आली आहे. तर केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत ही मर्यादा चंदीगडच्या 82.9 टक्क्यांपासून ते लक्षद्वीपच्या 31.9 टक्क्यांपर्यंतच्या दिसून आली आहे.
    अहवालात महाराष्ट्र
    शालेय शिक्षणाच्या एकूण गुणवत्तेच्या बाबतीत महाराष्ट्राची घसरण झाली असून, देशातल्या वीस मोठ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र राज्याची तिसऱ्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
    शैक्षणिक स्तराच्या बाबतीत महाराष्ट्र 60 टक्क्यांच्या वर आहे, तर प्रशासकीय अंमलबजावणीच्या प्रक्रियांच्या आघाडीवर 50 टक्क्यांच्या खाली आहे. शैक्षणिक स्तर, शिक्षणाची संधी, समानता, पायाभूत सोयी-सुविधा यांच्या निष्पत्तीच्या श्रेणीत सन 2015-16 ते सन 2016-17 या कालावधीत 83.1 टक्क्यावरून 83.9 टक्क्यांवर पोहोचलेल्या महाराष्ट्राला केवळ 0.8 टक्क्यांची प्रगती साधता आली आहे. या श्रेणीत महाराष्ट्राचा वीस राज्यांमध्ये तेरावा क्रमांक लागला आहे.
    निष्पत्तींना चालना देणाऱ्या शाळांच्या प्रशासकीय प्रक्रियांच्या बाबतीत सन 2015-16 ते सन 2016-17 या कालावधीत 6.1 टक्के प्रगती साधून 46.9 टक्क्यांवर पोहोचणाऱ्या महाराष्ट्राचा सोळावा क्रमांक लागला आहे. शिक्षणाची संधी प्रदान करण्याच्या बाबतीत महाराष्ट्राने 84.3 टक्क्यांवर पोहोचताना 6.4 टक्क्यांची प्रगती साधली आहे. मात्र, शैक्षणिक पाय़ाभूत सुविधा आणि सोयींच्या बाबतीत महाराष्ट्र कमी पडले असून उणे 3.3 टक्क्यांसह 72.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. शैक्षणिक समानतेच्या बाबतीतही महाराष्ट्राची उणे 4.7 टक्क्यांसह 91.8 टक्क्यांवरून 87.1 टक्क्यांवर घसरण झाली आहे.

    उत्तरप्रदेशात प्राचीन नदीचे उत्खनन

    Excavation of ancient river in Uttar Pradesh

    केंद्रीय जल मंत्रालयाने प्रयागराज (पूर्वी अलाहाबाद) येथे गंगा आणि यमुना नदींना जोडणार्‍या जुन्या व कोरड्या पडलेल्या नदीचे उत्खनन केले आहे. संभाव्य भूजलाचा पुनर्भरण स्त्रोत म्हणून या भागाला विकसित करणे हा या उत्खनन करण्यामागे हेतू होता.
    नदीचे अस्तित्व
    शोधलेली नदी ही प्रयागराज या शहराजवळ गंगा-यमुना संगमाच्या सुमारे 26 किलोमीटर दक्षिणेस दुर्गापूर गावात यमुना नदीला जोडणारी पुरलेली पालेओ वाहिनी होती.
    वर्णन केल्याप्रमाणे ही प्राचीन नदी सुमारे 4 किलोमीटर रुंद, किलोमीटर लांबीची असून, नदीचे अवशेष मातीखाली 15 मीटर जाडीचा थरात दिसून येतात. एक पालेओ वाहिनी (paleochannel) प्रयागराज (पूर्वी अलाहाबाद) जवळ गंगा आणि यमुना नदींना जोडते.
    नदीचा शोध कसा लागला?
    उत्तरप्रदेशात प्रयागराज आणि कौशांबी प्रदेशाच समावेश असलेल्या भौगोलिक सर्वेक्षणादरम्यान CSIR-NGRI (नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) आणि केंद्रीय भूजल मंडळाच्या शास्त्रज्ञांना डिसेंबर 2018 मध्ये या नदीचा शोध लागला. प्रदेशात असलेल्या पालेओ वाहिन्या (paleochannels) अस्तित्त्वात नसलेल्या नद्यांचा मार्ग उघडकीस आणतात.
    अहवालात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की पालेओ वाहिन्यांच्या पुराव्यांनुसार पौराणिक ‘सरस्वती’ नदी अस्तित्त्वात आहे.

    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स, 

    No comments:

    Post a Comment