Current affairs | Evening News Marathi
Current affairs 30 September Marathi |
30 सप्टेंबर 2019 करेंट अफेयर्स मराठी
जम्मू व काश्मीरमध्ये विभागीय निवडणुकांची घोषणा
मुख्य निवडणूक अधिकारी शैलेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखालील जम्मू व काश्मीर राज्याच्या निवडणूक आयोगाने 24 ऑक्टोबर 2019 रोजी विभागीय विकास परिषद (Block Development Council -BDC) याच्या निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे.राज्यातल्या 316 विभागांपैकी 310 विभागांसाठी या निवडणुका घेतल्या जाणार आहे. नियोजनाप्रमाणे मतदानाच्या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत निवडणुका घेतल्या जाणार असून दुपारी 3 वाजेपासून मतमोजणी केली जाणार आहे.
युगांडामध्ये ‘64वी राष्ट्रकुल संसदीय परिषद’ संपन्न
64 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेची (CPC) वार्षिक बैठक 22 ते 29 सप्टेंबर 2019 या कालावधीत युगांडा देशाची राजधानी कंपाला येथे आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रकुल संसदीय संघटना (CPA) आणि युगांडा सरकार यांनी संयुक्तपणे ही परिषद आयोजित केली होती.यावर्षी परिषद ‘अडोप्ट, एंगेजमेंट अँड इव्होल्युशन ऑफ पार्लिमेंट्स इन ए रॅपीडली चेंजिंग कॉमनवेल्थ’ या विषयाखाली पार पडली.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment