Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, October 2, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 2 October Marathi | 2 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views


    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 2 October  Marathi | 
     2 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स मराठी

    इम्फाळ येथील राष्ट्रीय क्रिडा विद्यापीठाच्या संदर्भात क्रिडा मंत्रालयाचा NBCC सोबत सल्लागार करार

    Advisory Agreement of Ministry of Sports with NBCC in relation to National Sports University at Imphal

    NBCC (इंडिया) लिमिटेड या संस्थेनी केंद्रीय युवा कल्याण व क्रिडा मंत्रालयाच्या क्रिडा विभागासोबत एक सामंजस्य करार केला आहे, ज्याच्या अंतर्गत मणीपूर राज्याच्या इम्फाळ या शहरात ‘राष्ट्रीय क्रिडा विद्यापीठ’ याच्या विकासासाठी प्रकल्प व्यवस्थापनाच्या बाबतीत सल्लागार सेवा प्रदान केली जाणार आहे.
    या विद्यापीठामुळे क्रिडा क्षेत्रातले शास्त्र, चिकित्सा, तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि प्रशिक्षण अश्या विविध विषयांच्या शिक्षणास प्रोत्साहन मिळणार. हे एक राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र म्हणून देखील काम करेल. प्रकल्पाची अंदाजे किंमत 400 कोटी रुपये असणार आहे.
    NBCC (India) Limited has entered into a MoU with the Sports Department of the Ministry of Youth Welfare and Sports, under which advisory services will be provided for project management for the development of 'National Sports University' in Imphal, Manipur state.

     The university will promote the education of various subjects such as science, medicine, technology, management and training in sports.  It will also serve as a national training center.  The estimated cost of the project is Rs 400 crore.

    NBCC (इंडिया) बाबत
    About NBCC (India)


    NBCC (इंडिया) लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीचा सार्वजनिक क्षेत्रातला नवरत्न उपक्रम आहे. त्याचे कार्य संपूर्ण भारतात आणि परदेशात देखील पसरलेले आहे. त्याची स्थापना 1960 साली झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. ही संस्था अभियांत्रिकी खरेदी व बांधकाम क्षेत्रात आपली सल्लागार सेवा प्रदान करते.

    NBCC (India) Limited is a public sector innovation initiative owned by the Government of India.  His work has spread all over India and abroad.  It was founded in 1960 and is headquartered in New Delhi.  This organization provides consulting services in the field of engineering procurement and construction.

    महात्मा लाईव्ह” : UNESCO आणि दूरदर्शन यांचा संयुक्त कार्यक्रम"

    Mahatma Live": a joint program of UNESCO and television


    राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेनी (UNESCO) आणि दूरदर्शन (DD) यांच्या संयुक्त विद्यमाने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
    ‘महात्मा लाईव्ह’ / 'बापू झिंदा हैं' हा द्विभाषिक कार्यक्रम 1 ऑक्टोबर 2019 रोजी रात्री 10 वाजता ‘डीडी न्यूज’ या वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे आणि पुन्हा 2 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रसारित केला जाणार.
    हा दूरदर्शन कार्यक्रम तासाभराचा असून त्यात महात्मा गांधीजींच्या जीवन काळातल्या क्वचितच ऐकलेल्या ध्वनिफिती प्रदर्शित केल्या जाणार आहेत.
    ध्वनिफितींमध्ये 29 नोव्हेंबर 1947 रोजी गाधीजींनी केलेल्या भाषणाचीही ध्वनिफिती देखील समाविष्ट केली जाणार आहे, ज्यामधून त्यांनी उद्योग क्षेत्रातल्या नेत्यांना संबोधित करीत समाजाच्या कल्याणासाठी आपली संपत्ती दान करण्याचे आवाहन केले होते. तसेच गाधीजींनी संगीत, शिक्षण, जातीव्यवस्था आणि सनातन कर्तव्य (सनातन धर्म) अश्या विविध विषयांबाबत त्यांचे विचार स्पष्ट करणार्‍या ध्वनिफिती एकविल्या जाणार आहेत.


    A program has been organized by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization (UNESCO) and Television (DD) in celebration of the 150th birth anniversary of Father Mahatma Gandhi.

     The bilingual program 'Mahatma Live' / 'Bapu Zinda Hain' will be broadcast on 'DD News' channel on October 1, 2019 at 10pm and again on October 2, 2019 at 5pm.

     This television program is an hour long and will feature the rarely heard soundtracks of Mahatma Gandhi's life.

     The soundtrack will also include a speech by Gandhiji on November 29, 1947, in which he addressed business leaders and urged them to donate their wealth for the welfare of the community.  Also, Gandhiji is going to unite with his voice to clarify his views on various topics like music, education, caste system and Sanatan Duty (Sanatan Dharma).

    दूरदर्शन बाबत

    About Doordarshan

    दूरदर्शन हे एक स्वायत्त सार्वजनिक प्रसारक आहे, जी भारत सरकारद्वारे स्थापित केली गेली आहे आणि प्रसारण मंत्रालयाच्या मालकीचे आहे व ते प्रसार भारतीच्या दोन विभागांपैकीचे एक विभाग आहे. त्याची स्थापना 15 सप्टेंबर 1959 रोजी झाली. त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
    1965 साली ‘ऑल इंडिया रेडिओ’चा भाग म्हणून नियमितपणे दैनंदिन प्रसारणाला सुरूवात झाली, त्यात प्रतिमा पुरी यांनी वाचलेल्या पाच मिनिटांच्या न्यूज बुलेटिनचा देखील समावेश होता. 1 एप्रिल 1976 रोजी दूरदर्शन सेवा रेडिओपासून विभक्त झाली.

    Doordarshan is an autonomous public broadcaster, established by the Government of India and owned by the Ministry of Broadcasting, which is one of the two departments of India.  It was founded on September 15, 1959.  It is headquartered in New Delhi.

     As a part of 'All India Radio', regular daily broadcasts started in 1965, including a five-minute news bulletin read by Chitma Puri.  On April 1, 1976, television services were separated from the radio.

    UNESCO बाबत 
    About UNESCO


    संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस या शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो. या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.

    The United Nations Educational, Scientific and Cultural Organization (UNESCO) is a specialized organization working in five major areas of the United Nations Education, Natural Sciences, Social / Anthropology, Cultural and Communication / Information in the French city of Paris.  Places are given the 'World Heritage' status by UNESCO.  Establishment of this organization  Held on November 16, 1945 in London (UK).  195 countries including India are members of this organization and 10 are members.

    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स, 

    No comments:

    Post a Comment