Current affairs | Evening News Marathi
Current affairs 13 September Marathi |
13 सप्टेंबर 2019 करेंट अफेयर्स मराठी
आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन: 12 सप्टेंबर
‘दक्षिण-दक्षिण सहकार्या’चे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ आमसभा दरवर्षी 12 सप्टेंबरला ‘आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन’ पाळते.
2019 सालासाठीचा दिन विषय - “फ्रॉम कमिटमेंट टू अॅक्शन – फॉलो अप टू ब्युनोस एरर्स प्लान ऑफ अॅक्शन+40”
दक्षिण-दक्षिण सहकार्य म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात विकास घडविण्यासाठी दक्षिणेकडील विकसनशील प्रदेश आणि देशांदरम्यानचे सहकार्य होय.
इतिहास
दक्षिण-दक्षिण सहकार्याचा इतिहास हा 1949 सालापासून सुरू झाला जेव्हा इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिल (ESC) याच्यावतीने प्रथम संयुक्त राष्ट्रसंघ तांत्रिक सहाय्य कार्यक्रमाची स्थापना केली गेली आणि 1969 साली संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) या संस्थेची स्थापना केली गेली होती.
पुढे 1978 साली या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या 138 सभासदांनी "ब्युनॉस एरिस प्लान ऑफ अॅक्शन फॉर प्रोमोटिंग अँड इंप्लिमेंटिंग टेक्निकल को-ऑपरेशन अमंग डेव्हलपींग कंट्रीज (BAPA)” या योजनेचा अंगिकार केला होता. त्याच्या स्मृतीत ‘आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन’ (International Day for South-South Cooperation) पाळला जातो.
BAPA योजनेच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त 20-22 मार्च 2019 रोजी अर्जेटिनामध्ये दक्षिण-दक्षिण सहकार्य विषयावरील संयुक्त राष्ट्रसंघाची द्वितीय उच्चस्तरीय परिषद (BAPA+40) संपन्न झाली. म्हणूनच यावर्षीचा विषय योजनेच्या BAPA+40 मध्ये स्वीकारल्या गेलेल्या वचनबद्धतेच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करण्यात आला आहे.
ब्रिटनचे ऑक्सफोर्ड विद्यापीठ सर्वोत्तम विद्यापीठ आहे: THE विश्व विद्यापीठ क्रमवारीता 2020
लंडनच्या ‘टाइम्स’ या संस्थेच्यावतीने ‘टाइम्स हायर एज्युकेशन (THE) विश्व विद्यापीठ क्रमवारीता 2020’ प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), रोपार या केवळ दोन भारतीय संस्थांनी या यादीत प्रथम 350 क्रमांकामध्ये जागा मिळविलेली आहे. मात्र या यादीत कोणत्याही भारतीय संस्थेला प्रथम 300 मध्ये जागा मिळविण्यात यश आलेले नाही. या दोन संस्थांनी समान गुणासह संयुक्तपणे क्रमांक ‘301-350’ या गटात जागा मिळविलेली आहे.
ठळक बाबी
- जगातले सर्वोत्तम विद्यापीठ - ऑक्सफोर्ड विद्यापीठ, ब्रिटन.
- प्रथम 10 सर्वोत्तम विद्यापीठे (अनुक्रमे) - ऑक्सफोर्ड विद्यापीठ, कॅलिफोर्निया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका), केंब्रिज विद्यापीठ (ब्रिटन), स्टॅनफोर्ड विद्यापीठ (अमेरिका), मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका), प्रिन्सटन विद्यापीठ (अमेरिका), हार्वर्ड विद्यापीठ (अमेरिका), येल विद्यापीठ (अमेरिका), शिकागो विद्यापीठ (अमेरिका), इम्पीरियल कॉलेज लंडन (ब्रिटन)
- जागतिक क्रमवारीत भारताची उपस्थिती सुधारली असून गतवर्षी केवळ 49 संस्था यादीत समाविष्ट होत्या मात्र यंदा 56 संस्थांचा क्रमांक लागला आहे.
- नवीन IIT इंदौर या संस्थेचे 351-400 गटात स्थान आहे, जेव्हा की जुन्या संस्था 401-500 गटात आढळून येत आहेत. पंजाब विद्यापीठ, चंदीगड 601-800 या गटात कायम असून IIT गांधीनगर नव्यानेच 501-600 या गटात प्रवेश केला आहे.
- जागतिक क्रमवारीत समाविष्ट केल्या गेलेल्या भारतीय संस्थांच्या संख्येमुळे, भारत हा आशिया खंडात पाचव्या स्थानावर असून जापान आणि चीन अव्वल आहेत.

No comments:
Post a Comment