Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, September 12, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 12 September August Marathi | 12 सप्टेंबर 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 12 September August Marathi | 
      12 सप्टेंबर 2019 करेंट अफेयर्स मराठी

    ‘1995 बेसल प्रतिबंध दुरुस्ती ठराव कायद्यात रूपांतरित

    6 सप्टेंबर 2019 रोजी ‘1995 बेसल प्रतिबंध दुरुस्ती’ ठरावाला क्रोएशियाने (मंजुरी देणारा 97वा देश) मान्यता दिल्यानंतर आता हा आंतरराष्ट्रीय कायदा झाला आहे. ‘1995 बेसल प्रतिबंध दुरुस्ती’ कायदा हा जागतिक पातळीवर कचरा फेकण्याला प्रतिबंध करणारा कायदा आहे. आता हा नवा कायदा 5 डिसेंबर 2019 रोजी जगभरात लागू केला जाणार आहे.

    बेसल प्रतिबंध करारनामा आणि दुरूस्ती

    1995 साली सर्व सदस्य देशांनी बेसल प्रतिबंध करारनामा स्वीकारला. हा करार घातक टाकावू पदार्थांच्या प्रतिकूल परिणामापासून मानवी आरोग्याचे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे या उद्देशाने तयार करण्यात आला आहे

    सुधारित कायद्यानुसार, आर्थिक सहकार्य व विकास संघटना (OECD) समुहाचे सदस्य असलेल्या 29 श्रीमंत देशांकडून OECD-सदस्य नसलेल्या देशांकडे इलेक्ट्रॉनिक कचरा तसेच जीर्ण झालेले जहाज याच्यासोबतच घातक टाकावू पदार्थांची सर्वप्रकाराची निर्यात करण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे.

    या करारात किरणोत्सर्गी टाकावू पदार्थांच्या दळणवळणाची बाबी समाविष्ट करण्यात आलेली नाही.

    राष्ट्रीय पशूरोग नियंत्रण कार्यक्रमला सुरुवात झाली

    दिनांक 11 सप्टेंबर 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मथुरा (उत्तरप्रदेश) येथे पाय व मुखरोग (FMD) आणि ब्रुसेलोसिस अश्या रोगांना लक्ष्य करीत देशव्यापी ‘राष्ट्रीय पशूरोग नियंत्रण कार्यक्रम’ याचा आरंभ करण्यात आला.
    केंद्र सरकारने या योजनेसाठी येत्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजेच 2024 सालापर्यंत 12,652 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
    कार्यक्रमाविषयी
    प्राण्यांमध्ये आढळून येणार्‍या पाय व मुखरोग (FMD) या धोकादायक रोगाला प्रतिबंध करण्यासाठी देशभरातल्या गुरे, म्हशी, मेंढ्या, शेळ्या आणि डुकरे अश्या 500 दशलक्षाहून अधिक जनावरांचे लसीकरण करणे हे या कार्यक्रमाचे लक्ष्य आहे. शिवाय ब्रुसेलोसिस रोगाविरूद्धच्या लढाईत दरवर्षी 36 दशलक्ष गायीच्या मादा वासरांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे.
    कार्यक्रमाचे दोन घटक –
    • 2025 सालापर्यंत रोगांवर नियंत्रण आणणे
    • 2030 सालापर्यंत पाय व मुखरोगांचे (FMD) निर्मूलन करणे
    गुरे, म्हशी, मेंढ्या, शेळ्या आणि डुकर इत्यादी पशूंमध्ये पाय व मुखरोग (FMD) आणि ब्रुसेलोसिस हे रोग सामान्यपणे आढळून येतात. जर दुधावर असलेले पशू रोगाची लागण झाली असेल तर शंभर टक्क्यांपर्यंत दुधाचे नुकसान होऊ शकते जे जवळपास चार ते सहा महिने टिकू शकते. त्यामुळे उत्पादकाला अत्याधिक नुकसानीला सामोरे जावे लागते. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबवविला जात आहे.

    No comments:

    Post a Comment