Current affairs | Evening News Marathi
Current affairs 6 February 2019 Marathi | 6 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी
‘इंडिया गेट’ जवळ राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारण्यात आले
नवी दिल्लीत ‘इंडिया गेट’ च्या परिसरात देशातले पहिले ‘राष्ट्रीय युद्ध स्मारक’ (National War Memorial) उभारण्यात आले आहे. दिनांक 25 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे ठिकाण देशाला समर्पित केले जाणार आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते कारगील युद्ध आणि त्यानंतरच्या चकमकींमध्ये देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या 26,000 सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हे स्मारक उभारण्यात आले आहे. सुमारे 500 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे.
Current affairs 6 February 2019 Marathi | 6 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी
चीनच्या तुलनेत भारतीय शहरांमध्ये हरितगृह वायूच्या उत्सर्जनात सर्वाधिक वाढ झाली आहे
एन्विरोंमेंटल रिसर्च लेटर्स या नियतकालिकेत प्रसिद्ध केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार, वाढत्या शहरीकरणामुळे भारतात वाहनांमधून निघणार्या हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामध्ये वाढ झाली आहे आणि ते चीनमधील शहरांच्या तुलनेत अधिक आहे, असे दिसून आले आहे.
ठळक बाबी
- कार्बन डायऑक्साइड (CO2) वायूच्या उत्सर्जनाचे प्रमाण गुरुग्राम जिल्ह्यात (हरयाणा) सर्वाधिक (140 किलो) आहे तर श्रावस्ती जिल्ह्यात (उत्तरप्रदेश) सर्वात कमी (1.8 किलो) आहे.
- कामासाठी प्रवास करताना भारतीय दरडोई 20 किलो CO2 उत्सर्जित करतो. चीनमध्ये शहरीकरणात 1% वाढ झाल्यामुळे CO2च्या उत्सर्जनात 0.12 टक्क्यांनी वाढ होत आहे, तर भारतात हे प्रमाण 0.24% एवढे आहे.
- 2017 साली भारतात CO2चे उत्सर्जन अंदाजे 4.6 टक्क्यांनी वाढले आणि ते दरडोई 1.8 टन एवढे होते.
- जगातला चौथा सर्वात मोठा CO2चा उत्सर्जक देश असूनही भारताचे दरडोई उत्सर्जन जागतिक सरासरी (4.2 टन) पेक्षा खूप कमी आहे. परंतु ग्लोबल कार्बन प्रोजेक्टच्या आकडेवारीनुसार, गेल्या दशकात या उत्सर्जनामध्ये 6 टक्क्यांच्या सरासरीने सातत्याने वाढ झाली आहे.
- डिझेलच्या किंमतीत 1 रुपयांची वाढ झाल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये 11 टक्क्यांनी उत्सर्जन कमी झाले. तर काही कमी उत्पन्न असलेल्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण केवळ 3 टक्क्यांनी कमी झाले.
- दिल्लीत दरडोई सर्वाधिक उत्सर्जन होते आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हे प्रमाण मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबादपेक्षा 2.5 पटीने अधिक आहे.
Current affairs 6 February 2019 Marathi | 6 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी
उत्पन्नाविषयी देशभरामधील सर्व शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार
केंद्र सरकारने चालू पीक हंगामासाठी (जुलै ते जून) देशभरामधील सर्व शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (NSSO) या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणार आहे.
शेतकर्यांच्या अडचणींचे आकलन करण्यासाठी, शेतकर्यांचे उत्पन्न आणि त्यांच्यावर आलेले कर्ज यासह इतर समस्यांचे मूल्यांकन करणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे.
चालू कॅलेंडर वर्षात राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या 77व्या फेरीत "सिचुएशन अॅसेसमेंट सर्वे ऑफ अॅग्रिकल्चरल हाऊसहोल्ड्स” या शीर्षकाखाली हे सर्वेक्षण केले जाणार आहे. शेतकरी कुटुंबाची परिस्थिती, त्यांचे उत्पन्न, खर्च आणि कर्जदारपणा यांच्या परिस्थितीचे विस्तृत मूल्यांकन केले जाणार आहे. याआधी असे सर्वेक्षण वर्ष 2012-13 (पीक वर्ष) यासाठी करण्यात आले होते.
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (NSSO)
हा भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेला विभाग आहे, जो अखिल भारतीय आधारावर वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जबाबदार आहे.
Current affairs 6 February 2019 Marathi | 6 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी
कानपूरमध्ये 1984 सालच्या शीख विरोधी दंगली प्रकरणी उत्तरप्रदेश सरकारने SITची स्थापना केली
1984 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर कानपूरमध्ये झालेल्या शीख विरोधी दंगलीच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी उत्तरप्रदेश राज्य सरकारने एक विशेष तपास पथक (SIT) याची स्थापना केली आहे.
चार सदस्य असलेल्या या पथकाचे नेतृत्व राज्याचे निवृत्त पोलीस महानिदेशक अतुल यांच्याकडे दिले गेले आहे. इतर सदस्यांमध्ये सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश सुभाषचंद्र अग्रवाल आणि निवृत्त अतिरिक्त निदेशक योगेश्वर कृष्ण श्रीवास्तव यांचा समावेश आहे. हे पथक 6 महिन्यांच्या आत आपला अहवाल सादर करणार आहे.
1984 साली दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत 2733 जणांचा मृत्यू झाला होता. त्याचा तपास करण्याकरिता, जानेवारी 2018 मध्ये या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्याला विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले होते.
पार्श्वभूमी
31 ऑक्टोबर 1984 रोजी सुवर्णमंदिरात लष्करी कारवाई केल्याने दोन अंगरक्षकांकडून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर उसळलेल्या दंगलीत अनेकांचा बळी गेला. 1985 साली या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका आयोगाची नियुक्ती केली गेली. शिवाय चौकश्यांसाठी आठ समित्यांचीही स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर तपासाच्या विविध टप्प्यात विविध समित्या नियुक्त केल्या गेल्या. अखेरीस डिसेंबर 2018 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेता सज्जन कुमार याला 1984 शीख विरोधी दंगली प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Current affairs 6 February 2019 Marathi | 6 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी
ISROच्या ‘जीसॅट-31’ या दळणवळण उपग्रहाचे फ्रेंच गयाना येथून प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) याच्या ‘जीसॅट-31’ या 40 व्या दळणवळण उपग्रहाचे दिनांक 6 फेब्रुवारी 2019 रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
जीसॅटसोबतच सौदी जियोस्टेशनरी सॅटेलाईट-1/हेलास-4 सॅट या उपग्रहाला देखील अवकाशात प्रस्थापित केले गेले आहे. एरीअनस्पेस या युरोपीय कंपनीच्या ‘एरीयन-5’ या अग्निबाणाच्या सहाय्याने फ्रेंच गयाना येथील प्रक्षेपण केंद्रावरुन या उपग्रहाला प्रक्षेपित करण्यात आले. प्रक्षेपणाच्या 42 मिनिटांनंतर हा उपग्रह पृथ्वीच्या ‘जिओ-ट्रान्सफर’ कक्षेत स्थापित झाला.
जीसॅट-31 चे वजन 2535 किलोग्राम एवढे आहे. हा भारताच्या ‘इनसॅट-4 CR' या जुन्या दळणवळण उपग्रहाची जागा घेईल. हा उपग्रह भू-स्थिर कक्षेत Ku-बँड ट्रान्सपॉन्डरची क्षमता वाढवेल. व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंक, डिजीटल उपग्रह न्यूज गॅदरिंग, डीटीएच टेलिव्हिजन सर्व्हिस, सेल्युलर बॅक-हल संपर्क आणि बऱ्याच सेवांमध्ये या जीसॅटचा वापर केले जाईल. भारताची मुख्य भूमी आणि भारताच्या लगतच्या बेटांना दूरसंचार सेवा प्रदान करण्यासाठी हा उपग्रह उपयोगात येणार आहे. जीसॅट-31 हा उपग्रह 15 वर्षांपर्यंत कार्यरत राहणार.
Current affairs 6 February 2019 Marathi | 6 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी
No comments:
Post a Comment