Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, December 8, 2018

    Evening News : 8 December 2018 Marathi-Current Affairs | इवनिंग न्यूज़ 8 डिसेंबर 2018 मराठी_करंट अफेयर्स

    Views

    Marathi | मराठी



    वर्ष 2023 हा आंतरराष्ट्रीय धान्य वर्ष म्हणून पाळण्याचा भारताचा प्रस्ताव मान्य

    संयुक्त राष्ट्रसंघाची अन्न व कृषी संघटना (FAO) कडून वर्ष 2023 हा आंतरराष्ट्रीय धान्य वर्ष (International Year of Millets) म्हणून पाळण्याचा भारताने मांडलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. धान्य गटात ज्वारी, बाजरी, रागी आणि अन्य छोट्या खाद्यबिया मोडतात.

    नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाला यावर्षीच्या ‘स्कोच’ पुरस्कार मिळाला

    देशात 73 गिगावॅट (GW) नवीकरणीय ऊर्जा क्षमता प्रस्थापित करण्यातल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाला यावर्षीच्या ‘स्कोच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एकूण प्रस्थापित क्षमतेच्या 21% सह एका वर्षातच देशात 1 अब्ज युनिट वीज पुरवण्याचे काम नवीकरणीय ऊर्जा विभागाने केले आहे.

    कृष्णमूर्ती सुब्रमण्यम: भारताचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार

    डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांसाठी ते या पदावर कार्यरत राहतील. ही नियुक्ती अरविंद सुब्रमण्यम यांच्या जागी केली गेली आहे. अरविंद सुब्रमण्यम यांनी जुलै-2018 मध्ये मुख्य आर्थिक सल्लागार पदाचा राजीनामा दिला होता.

    परदेशी कामगारांना स्वीकारण्यासाठी जपानच्या सरकारने नवीन कायदा आणला

    जपानच्या सरकारने देशामधील कामगारांच्या दीर्घकालीन कमतरतेच्या संबंधात ब्ल्यू कॉलर परदेशी कामगार देशात आणण्यासाठी एक नवीन कायदा केला आहे. नवीन कायद्यान्वये जपानने बांधकाम, अन्न, सेवा, परिचारिका आणि इतर क्षेत्रांमध्ये 3 लक्ष 45 हजार परदेशी कामगारांना देशात आणण्याचे ठरविले आहे.

    वर्तमानात निम्मी जागतिक लोकसंख्या ऑनलाइन झाली आहे: UN

    आज सुमारे 39.9 अब्ज लोक इंटरनेटचा वापर करीत आहेत आणि पहिल्यांदाच निम्मी जागतिक लोकसंख्या ऑनलाइन झाली आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) परिषदेच्या अहवालात दिसून आले आहे.

    दहशतवादाचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचा नवा पुढाकार

    संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवाद विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर लढा देण्यासाठी ‘UN ग्लोबल काउंटर-टेरेरिझम कॉर्डिनेशन कॉम्पॅक्ट’ या नावाने एक नवीन कार्यचौकट तयार केली आहे. नव्या पुढाकारांतर्गत जगभरात शांती आणि सुरक्षा, मानवतावाद, मानवाधिकार आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करण्यासाठी सर्व देश एकत्रितपणे कार्य करणार.

    दिल्ली-गुरूग्राम-SNB रेल्वे मार्गिका तयार करण्यासाठी मंजुरी मिळाली

    दिल्ली-गुरूग्राम-SNB (शाहजहांपूर-नीमरणा-बेहरोर अर्बन कॉम्प्लेक्स) रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (RRTS) मार्गिकेच्या बांधकामाला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाने (NCRTC) त्याची मंजुरी दिली आहे. दिल्ली-गुरूग्राम-SNB रेल्वे मार्गिकेमधून दिल्ली-गुरूग्राम-अलवर मार्गिका तयार केली जाणार, ज्यामुळे प्रवास वेळेत घट होण्यास मदत होणार.

    No comments:

    Post a Comment