सावित्रीबाई फुले - (१२ जानेवारी १८३१ - १० मार्च १८९७)या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपलया नायगांव या गावाविषयावरील त्यांची कविता अप्रतिम आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रसार केला.काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला.पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ‘गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत.सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा ‘बालिकादिन’ म्हणून साजरा केला जातो.
ठळक घटना/घडामोडी
१५२६: सम्राट चार्ल्स पाचवा याचा पोर्तुगीझ राजकन्या इसाबेला हिच्याशी विवाह.
१८४९: अब्राहम लिंकन यांचा पेटंट साठी अर्ज; अमेरिकन राष्ट्रपतींचा पहिलाच असा अर्ज.
१९५२: पिंपरी येथे हिंदूस्थान अॅंटिबायोटिक्स या पेनिसिलिन कारखान्याचे काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते उदघाटन.
१९५७: ओसामा बिन लादेन, अल कायदा नामक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेचा संस्थापक.
१८६२: अमेरिकेत सर्वप्रथम कागदी चलनांची अर्थात नोटांची सुरूवात.
१९६९: अतिशय हुषार व धाडसी वृत्तीची महिला गोल्डा मायर यांची इस्त्राईलच्या पंतप्रधानपदावर नियुक्ती झाली.
१८७६: पहिला दूरध्वनी संपर्क (अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल ने थॉमस वॅटसन शी संपर्क साधला).
जन्म/वाढदिवस
१५०३: फर्डिनांड पहिला, जर्मनीचा राजा.
१६२८: कॉन्स्टॅन्टाईन हायगेन्स, जुनियक, डच कवि, चित्रकार, व्यंगचित्रकार.
१७७२: फ्रेडरिक व्हॉन स्लेगेल, जर्मन लेखक.
१८१२: विक्टर तेश, बेल्जियन वकील व कायदा मंत्री.
१८९७: सावित्रीबाई फुले,शिक्षणप्रसारक, समाजसुधारक,कवयित्री.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
१७९२: जॉन स्टुअर्ट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
१८३२: मुझियो क्लेमेंटी, इटालियन संगीतकार.
१८६१: टारस शेव्चेन्को, युक्रेनियन कवी.
१८७२: ज्युसेप्पे मॅझिनी, इटालियन राजकारणी.
१९१३: हॅरियेट टबमन, अमेरिकन क्रांतिकारी.
१९३७: येवगेनी झाम्यातिन, रशियन लेखक.
१९४०: मिखाइल बुल्गाकोव्ह, रशियन लेखक.
१९४२: विल्यम हेन्री ब्रॅग, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
१९५१: किजुरो शिदेहारा, जपानी पंतप्रधान.
१९६६: फ्रित्स झेर्निके, नोबेल पारितोषिक विजेता डच भौतिकशास्त्रज्ञ.
१९८५: कॉन्स्टान्टिन चेरनेन्को, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
१९९८: लॉईड ब्रिजेस, अमेरिकन अभिनेता.
No comments:
Post a Comment