Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, December 11, 2017

    लो सॉल्ट म्हणजे काय ?

    Views


    लो सॉल्ट म्हणजे काय ?

    उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांना 'मीठ खाऊ नका' असा सल्ला डॉक्टर देतात. मिठावाचुन जेवण ही कल्पनाच काही लोकांना करवणार नाही. तुम्हीही एकदा मिठावाचुन जेवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला 'जेवण' काय 'जीवन' सुद्धा अळणी झाल्यासारखे वाटेल. मग या उच्च रक्तदाबवाल्यांचे काय ? त्यांचा हा रोग तर आयुष्यभराचा सोबती. मीठ म्हणजे सोडियम क्लोराइड. यातील सोडीयममुळे शरीरात पाणी जास्त प्रमाणात राखले जाते. सहाजिकच रक्तदाब वाढतो. त्यामुळे मीठ खायला वा बंद करायला सांगतात.
    शरीराला सोडियमचा पुरवठा स्वयंपाकात टाकल्या जाणाऱ्या मीठाखेरीज इतर अनेक अन्नपदार्थातून होत असल्याने मीठ खाणे बंद केले तरी शरीराला योग्य त्या प्रमाणात हा उपयुक्त क्षार मिळत राहतो पण हे जरी खरे असले तरी जेवताना काही जणांना मीठ लागतेच. अशा लोकांसाठी साध्या मिठाऐवजी म्हणजे सोडियम क्लोराईड ऐवजी पोटॅशियम वा मॅग्नेशियम क्लोराईड अर्थात सोडियम नसलेले मीठ उपयुक्त ठरते. पोटॅशियम, मॅग्नेशियम क्लोराईडमुळे चव मिठाचीच लागते पण सोडियम मुळे होणारे दुष्परिणाम होत नाहीत. बाजारात हे मीठ लो सॉल्ट, के साॅल्ट या नावाने उपलब्ध आहे. उच्च रक्तदाबाच्या लोकांसाठी जेवणात व जीवनात रस निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे मीठ करते.

    डॉ. जगन्नाथ

    No comments:

    Post a Comment