Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, August 13, 2017

    अहिल्याबाई होळकर

    Views


    अहिल्याबाई होळकर


    अहिल्याबाई होळकर किंवा अहिल्यादेवी होळकर (इ.स. १७२५ ते इ.स. १७९५) या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत. त्यांना पुण्यश्लोक या पदवीने संबोधित करण्यात येते.

    माळवा प्रांताचा कारभार त्यांनी बांधला. त्या मल्हारराव होळकरांच्या सून होत. मुलाचे मृत्युनंतर मल्हाररावांनी त्यांना सती जाऊ दिले नाही. भारतभरात त्यांनी अनेक मंदिरे, घाट बांधली वा त्यांचा जीर्णोद्धार केला. महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. त्यांच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास त्यांचे नाव दिलेले आहे.पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर , यांना भारताच्या “कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट” म्हणुन ओळखतात. (१७२५ – १७९५, राज्यकालावधी १७६७-१७९५) ही भारताच्या,माळवा साम्राज्याची, होळकर घराण्याची ‘तत्वज्ञानी राणी’ म्हणुन ओळखली जाते. तीच जन्म महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. तीने नर्मदातीरी, इंदोर च्या दक्षिणेकडील महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. अहिल्यादेवीचे पती खंडेराव होळकर यांचे सन १७५४ मध्ये,कुम्हेरच्या लढाईत निधन झाले. १२ वर्षांनंतर, तिचे सासरे मल्हारराव होळकर हेही मृत्यु पावले.तिने, आपल्या साम्राज्याचे तुंगांपासुन रक्षण केले. ती लढाईत स्वतः सैन्याचे नेतृत्व केले.तिने,तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणुन नेमणुक केली.ती न्यायदानासा ठी प्रसिद्ध होती,एकदा तर तिने स्वतः च्या मुलास त्याच्या दंड करण्याजोग्या कामांमुळे त्यास हत्तीच्या पायदळी तुडविण्याची शिक्षा केली. राणी अहिल्यादेवी हीने अनेक हिंदू मंदिरांचे बांधकाम केले आणी महेश्वर,इंदोर ची सजावट केली. ती अनेक देवळांची आश्रयदाती होती.त्यात,तीने तिच्या राज्याबाहेरही अनेक मंदिरांचे व इतर अनेक तिर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यापैकी,द्वारका , गुजरात , काशी च्या पुर्वेस गंगातीरावर वाराणसी ,उज्जैन मध्य प्रदेश, नाशिक महाराष्ट्र व परळी वैद्यनाथ महाराष्ट्र याचा प्रामुख्याने समावेश आहे.सोमनाथ चे अपवित्र व ध्वस्त झालेले देउळ बघुन अहिल्यादेवींनी शिवाचे एक देउळ बांधले जे सर्व हिंदूद्वारे अजुनही पूजिल्या जाते.
    बालपण :-

    अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते व धनगर होते. त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर व माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.त्या मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बगत होत्या. मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. मुलाच्या मृत्यूनंतर मल्हाररावांनी त्यांना सती जाऊ दिले नाही. त्यांच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास त्यांचे नाव दिलेले आहे.

    शासक :-
    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे तैलचित्रअहिल्यादेवीचे पती खंडेराव होळकर सन १७५४ मध्ये लढाइत मारले गेले. १२ वर्षानंतर तिचे सासरे मल्हारराव मृत्यू पावले. १७६६ पासुन १७९५ मध्ये तिच्या मृत्युपर्यंत, मल्हाररावांनी तिला प्रशासकीय व सैन्याच्या कामात तिला पारंगत केलेले होते. त्याआधाराने अहिल्याबाईने माळव्यावर राज्य केले. १८व्या शतकात, सत्तेसाठीच्या युद्धादरम्यान, मल्हाररावांनी सन १७६५ मध्ये तिला लिहिलेल्या पत्रावरुन त्यांचा तिच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसुन येते.

    “चंबळ पार करुन ग्वाल्हेर येथे जावा.तेथे तुम्ही ४-५ दिवस मुकाम करु शकता.तुम्ही मोठे सैन्य ठेवु शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा…..कुच करतांना,मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा.”  पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्याबाईंनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्याबाई सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत,असे म्हणतात. पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होती त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्याबाईंनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्याबाईंनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदूमंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली., माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या. भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवी सोडवू शकल्या नाहीत. तरीही, त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा ‘कर’ घेण्याचा अधिकार दिला. याही बाबतीत, (आंग्ल लेखक) ‘माल्कम’ यांच्यानुसार, अहिल्याबाईंनी ‘त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले’.

    अहिल्याबाईंनी जनतेच्या/रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी प्केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्याबाईच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्याबाईंनी दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी तिच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला. भारतीय संस्कृती कोशात अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे-काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे. अहिल्यादेवींस, सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता, असे दिसते.

    एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील, भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की, अहिल्यादेवी होळकरांस, माळवा व महाराष्ट्रात, त्या काळी व आताही, संताचा सन्मान दिला जातो. इतिहासाच्या कोणाही अभ्यासकास ते मत खोडून काढण्याजोगे आजवर काहीही सापडलेले नाही.
    त्यांच्याबद्दलची मते :-
    परळी वैद्यनाथ येथील अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक”अहिल्याबाईंचा मध्य भारताच्या इंदोर मधील राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत् काळ होता ज्यात योग्य राजक व कायद्याचे राज्य होते.त्यात जनतेची भरभराट झाली.ती एक अतिशय योग्य शासक व संघटक होती.तीला तिच्या जीवनकालात सन्मान मिळाला व मृत्युनंतर, तिने उपकारीत लोकांकडुन, तीला संताचा दर्जा देण्यात आला.” “ज्याप्रमाणे अकबर हा पुरुषांमधला उत्तम राजा तसेच अहिल्याबाई ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती. जिच्या चांगल्या बुद्धीचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते. अशी अहिल्याबाई ही एक महान स्त्री होती.”

    आणखी मते :-
    अहिल्याबाई होळकर ह्या एक खरोखरीच विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सूक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या. सन १७७२ मध्ये पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ब्रिटिशांबरोबर हात मिळवणी करण्याबाबत एक ताकीद दिली होती. त्यांना कवटाळणे हे अस्वलास कवटाळण्याजोगे असल्याचे त्यांनी नोंदले आहे :” वाघासारखे इतर प्राणी हे शक्ती वा युक्तीने मारले जाऊ शकतात, परंतु अस्वल मारणे हे फारच कठीण असते. सरळ त्याच्या चेहऱ्यावर वार केल्यासच ते मरते. एकदा त्याच्या मजबूत पकडीत सापडल्यावर ते त्याच्या शिकारीस, गुदगुल्या करून ठार मारते. असाच इंग्रजांचा मार्ग आहे. हे बघता, त्यांच्यावर मात करणे कठीण आहे.कोणतेही प्रकरण राणीच्या निदर्शनास आले की ते कडकपणे हाताळले जाई. अहिल्याबाईंना आपल्या प्रजेचा उत्कर्ष आवडत असे. तसेच ती प्रजा राजा हिसकावून घेईल म्हणून आपली संपत्ती उघड करण्यास घाबरत नाही, हे बघणे आवडत असे. दूरदूरपर्यंत, रस्त्यांच्या कडेला, दाट छायादार वृक्ष लावण्यात आले होते, विहिरी केल्या होत्या, पथिकांसाठी विश्रांतीगृहे. गरीब,घर नसलेले व अनाथ या सर्वांना त्यांच्या जरुरीनुसार, सर्व मिळत होते. बहुत काळापासून, भिल्ल लोक पहाडांतून सामानाची नेआण करत असतांना लूटमार करीत असत. अहिल्याबाईंनी त्यांना त्यातून मुक्ती मिळवून दिली व प्रामाणिकपणे शेती करण्याची संधी त्यांना देऊ केली. सर्व समाजाला अहिल्याबाई आवडत असत आणि तो त्यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करी. त्यांच्या कन्येने तिचा पती, यशवंतराव फानसे यांच्या मृत्यूनंतर सती जाणे हे अहिल्याबाईंच्या आयुष्यातले शेवटचे सर्वात मोठे दुःख होते.
    वयाच्या ७०व्या वर्षी अहिल्याबाई होळकरांची प्राणज्योत निमाली.
    राजे-रजवाड्यांचे इतिहास जगभर घडले आहेत. पुरुष-प्रधान व्यवस्थांत केवळ भारतातच नव्हे तर जगभर स्त्रीयांचे दमनच झाले असल्याचे आपल्याला दिसते. जगात राण्या-महाराण्या झाल्या असल्या तरी त्या शेवटी कर्तुत्वाने म्हणा कि कोणा महाराजाची पत्नी होती म्हणुन म्हणा प्रसिद्ध आहेत पण त्या इतिहासावर स्वत:चा असा स्वतंत्र ठसा उमटवू शकलेल्या नाहीत. यच्चयावत जगात अपवाद असनारी एकमेव महाराणी म्हणजे अहिल्यादेवी होळकर. यात कसलीही अतिशयोक्ती नाही. होळकर घराण्याचा कट्टर शत्रू माल्कम आपल्या मध्यप्रदेशातील आठवणींत म्हणतो…” सर्व प्रकारच्या मर्यादा पेशव्यांपासून ते हिंदू सनातन्यांनी घातलेल्या असुनही अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीने २८ वर्ष प्रजेच्या हिताचे उत्कृष्ठ प्रशासन केले त्याला जगात तोड सापडनार नाही. माळव्यातीलच नव्हे तर जिथे तिचा प्रत्यक्ष कारभारही नव्हता अशा हिंदुस्थानातील सर्वच प्रजा तिला दैवी अवतार मानते. याचे कारण म्हनजे अहिल्याबाइंची प्रजानिष्ठा, आत्मशुद्धता आणि सर्व कल्याणासाठीची अविरत धडपड होय!” प्रख्यात इंग्रजी कवयत्री जोआना बेलीने तर अहिल्यादेवींवर नितांत सुंदर कविताच लिहिली. एक लक्षात घ्यायला हवे कि एकोणिसाव्या शतकात युरोपात स्त्रीमुक्तीची जी चळवळ सुरु झाली तिला अहिल्यादेवींपासून प्रेरणा मिळाली. याचा आम्हाला अभिमान वाटायला हवा.

    अहिल्यादेवींची राजकीय कारकीर्द तेंव्हापासुनच सुरु झाली. खंडेरावाची जागा अहिल्यादेवींनी घेतली. मल्हारराव देशभर मोहिमांत व्यस्त असत. सासरा-सुनेतील पत्रव्यवहार हा अहिल्यादेवींच्या राजकीय विचारकतेचा उत्कृष्ठ नमुना होय. अहिल्यादेवींना मल्हारराव तोफा-दारुगोळ्याची मागणी ते ज्या मार्गाने ते मोहिम चालवणार आहेत त्याच्या रक्षणाच्या सुचना अहिल्यादेवींना जसे देतांना दिसतात तसेच अहिल्यादेवी आपल्या सास-याला सल्ले देतांनाही दिसतात. सासरा सुनेचे ऐकेल हा तो काळ नव्हता…आताही फारसा नाही…परंतू मल्हाररावांसारखा मुत्सद्दी अहिल्यादेवींचे सल्ले अंमलात आणत होता यावरुनच अहिल्यादेवींची योग्यता लक्षात येते.

    हैदराबादचा निजाम म्हणतो… “Definitely no woman and no ruler is like Ahilyabai Holkar.” अहिल्यादेवींबद्दल लिहावे तेवढे कमीच असते. अहिल्यादेवींना आम्ही करंट्या अभिमन्यांनी “एक धार्मिक महिला” असे त्यांचे रुप रंगवले आहे. त्या नक्कीच धार्मिक होत्या. महान शिवभक्त होत्या. पण धर्माच्या पलीकडेही मानवी जग असते याचे भान त्यांना होते. मोरोपंत (केकावलीप्रसिद्ध) ते अनंत फंदी यासारख्यांच्या जीवनात एका शब्दाने बदल घडवून आणण्याचे नैतीक सामर्थ्य त्यांच्यात होते. स्त्रीयांना शक्ती द्यायची तर त्यांना शस्त्रही चालवता आले पाहिजे असा क्रांतिकारी विचार करणा-या त्या पहिल्या पुरोगामी महिला होत्या. स्वत: त्या लिहा-वाचायला शिकलेल्या होत्याच, सर्व स्त्रीयांनाही लिहा-वाचायला यायला हवे हा त्यांचा हट्ट होता. पुढे क्रांतिज्योति सावित्रीबाइंनी त्यांची परंपरा अविच्छिन्न ठरवली.

    स्वतःचे कौटुंबिक जीवन दुःखीकष्टी असतानाही अहिल्यादेवी धीरोदात्तपणे प्रजेच्या सुखशांतीसाठी जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत कार्यरत राहिल्या. धवलचारित्र्य आणि पावित्र्याची चैतन्यमूर्ती अहिल्यादेवी म्हणजे मानवी जीवनातील अज्ञान, अंधःकार व दुःख करून त्यास प्रकाशमान करणारी दीपज्योत होय.