Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, August 13, 2017

    चालू घडामोडी : ११ व १२ ऑगस्ट

    Views
    चालू घडामोडी : ११ व १२ ऑगस्ट

    • केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या (सीबीएफसी) अध्यक्षपदी प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    • याशिवाय सेन्सॉर बोर्डाच्या २३ सदस्यांच्या कार्यकारिणीत अभिनेत्री विद्या बालन हिचा समावेश करण्यात आला आहे.

    • केंद्र सरकारने सीबीएफसीचे वादग्रस्त माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरून हटवून त्यांच्याजागी प्रसून जोशी यांची नियुक्ती केली आहे.

    • पहलाज निहलानी त्यांच्या मार्गदर्शक तत्वांसाठी कायम चर्चेत राहिले. त्यामुळे त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला.

    • उडता पंजाब, इंदू सरकार, लिपस्टिक अंडर माय बुरखा तसेच बाबूमोशाय बंदूकबाज या चित्रपटात त्यांनी अनेक दुरुस्त्या सुचवल्या होत्या.

    • या सगळ्या कारणांवरून त्यांच्याविरुद्धचा रोष सातत्याने वाढत होता. यामुळे अनेक दिग्दर्शकांनी पहलाज निहलानींना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली होती.



    पहलाज निहलानी

    • हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक व निर्माता  म्हणून पहलाज निहलानी ओळखले जातात. ते सुप्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचे बंधू आहेत.
    • वयाच्या १४व्या वर्षी चित्रपट त्यांनी वितरक म्हणून कारकीर्दीची सुरूवात केली. १९७५मध्ये त्यांनी स्वत:ची चित्रपट वितरण कंपनी सुरू केली
    • त्यांनतर ९०च्या दशकात त्यांनी गोविंदाबरोबर ‘आँखे’, ‘शोला और शबनम’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली.
    • पहलाज निहलानी यांची १९ जानेवारी २०१५ रोजी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.
    • पहलाज निहलानी यांनी तीन वर्ष सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. या तीन वर्षातील त्यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्त ठरली.

    प्रसून जोशी

    • निहलानींच्या जागी नियुक्ती झालेले प्रसून जोशी नामवंत गीतकार आणि पटकथा लेखक आहेत.
    •तारें जमीन पर, भाग मिल्खा भाग, नीरजा, रंग दे बसंती या चित्रपटांसाठी त्यांनी काम केले आहे.
    •‘तारें जमीन पर’मधील ‘मॉं’ आणि ‘चितगाव’मधील ‘बोलो ना’ या गाण्यासाठी जोशी यांना राष्ट्रीय पुरस्कार ही मिळाला आहे.



     उपराष्ट्रपतीपदी व्यंकय्या नायडू

    • व्यंकय्या नायडू यांनी ११ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे. व्यंकय्या नायडू हे देशाचे १३ वे उपराष्ट्रपती आहेत.तर स्वातंत्र्यानंतर जन्मलेले ते देशाचे पहिलेच उपराष्ट्रपती आहेत. 

    • राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली.

    • उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा पराभव केला होता.

    गोरखपूरच्या सरकारी रुग्णालयात ६३ बालमृत्यू

    • उत्तरप्रदेशमधील गोरखपूरच्या सरकारी बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजनचा साठा संपल्याने गेल्या ५ दिवसांत ६३ जणांचा मृत्यू झाला आहे.

    • याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने बीआरडी कॉलेजचे प्राध्यापक आर के मिश्रा यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई केली आहे.

    • बालरोग विभागात ऑक्सिजनचा तुटवडा आणि संसर्ग, यामुळे हे मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले, तरी हॉस्पिटल आणि जिल्हा प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत.

    • या रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पुष्पा सेल्स कंपनीची ६९ लाख रुपयांची थकबाकी न दिल्याने ऑक्सिजनचा पुरवठा बंद करण्यात आला होता. 

    • या कंपनीने १ ऑगस्टलाच पत्र लिहून रुग्णालय प्रशासनाला थकबाकी न दिल्यास पुरवठ्यावर परिणाम होईल, असा इशारा दिला होता.

    • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ९ ऑगस्ट रोजी या हॉस्पिटलमध्ये भेट दिली होती, त्या दिवशीही ९ रुग्ण मरण पावले होते.

    • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह या घटनेनंतर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करत आहे.

    जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत देवेंद्र सिंह अंतिम फेरीत

    • भालाफेक प्रकारात देवेंद्र सिंहने ऐतिहासिक कामगिरी करत जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

    • त्याने पहिल्या प्रयत्नात ८२.२२ मीटर,
    दुसऱ्यांदा ८२.१४ मीटर तर
    तिसऱ्या आणि शेवटच्या प्रयत्नात सर्वाधिक ८४.२२ मीटर भाला फेकला.

    वरील माहिती आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींना  शेअर करा.